आपल्या संस्कृतीमध्ये तीन 3 नवरात्री कोणत्या व का साजऱ्या करायचे माहीत आहे का !

आपल्या संस्कृतीमध्ये तीन 3 नवरात्री कोणत्या व का साजऱ्या करायचे माहीत आहे का !

तीन प्रकारच्या नवरात्री  : संपूर्ण वर्षभरात आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या आणि किती प्रकारच्या नवरात्री आहेत हे आपण या लेखात पाहणार आहोत .

पुढील तीन नवरात्री आपण साजऱ्या का करतो याची कथा क्रमाणे पाहुया !

1)आश्विन नवरात्रीची 

2)चैत्र नवरात्र 

3)शाकंभर नवरात्र 

आपल्या संस्कृतीमध्ये तीन 3 नवरात्री कोणत्या व का साजऱ्या करायचे माहीत आहे का !

1] आश्विन नावरात्रीची कथा :

महिषासुर नावाचा एक रक्षस होता . त्रिभुवणातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी ,त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हाटवले आणि त्याच राज्यकारभारच आपल्या हाती घेतला . त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला . एवढे मोठे पराक्रमी देव देखील भयबीत झाले . काय करावे त्यांना सुचत नव्हते म्हणून सर्व देव एकत्र आले आणि ते ब्रह्म , विष्णु , महेश यांना शरण गेले .

महिषासुरच्या अन्यायाच्या ,अत्याचारच्या गोष्टी त्यांनी देवाजवळ सांगितल्या आणि त्या त्रासापासून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली ते सारे एकूण ब्रह्मा , विष्णु , महेश संतापले त्या तिघांणी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली . तिला वेगवेगळ्या शस्त्रानि सन्मानित करून महिषासुरचा नाश करण्यासाठी पाठविले .

देवी आणि रक्षसाचे घनघोर युद्ध झाले . आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस हे युद्ध चालले होते . अखेर शक्तिदेविने त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवाना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले . म्हणून शक्तीदेवीला महिषासुरमर्दिनी असे मानले गेले . महिषासुरचा नाश करण्यासाठी परमेश्वराच्या शक्ति रूपाने पूजन केले जाते . ब्रह्मदेवापासून सरस्वती , विष्णुपसून महालक्ष्मी , शंकरपासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे मानले जाते .

माता शक्तीची मुख्य रुपे प्रसिद्ध त्यातील काही सौम्य आहेत . चैत्रातील देवी अन्नपूर्णा ,भद्रपदातील हरितालिका , श्रवणातील मंगळागौर , अश्विनातील ललितागौर ही सौम्य रुपे आहेत . एश्वर्याची  देवी महालक्ष्मी आणि विदयेची देवी महासरस्वती ही टी रुपे आहेत . रुपे अनंत असले तरी ईश्वर एकच आहेत हा त्याच देवीचा उत्सव आहे . या नवरात्रात देवी युद्ध खेळून थकलेली असते म्हणून नऊ दिवस तिची सेवा करावी व दसऱ्याला दर्शनाला यावे .

2] चैत्र नवरात्रिची कथा :

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुडीपाडव्यापासून सुरू होते ते रामनवमीपर्यंत नऊ दिवस असते . सर्व लोक या दिवसात चैत्र नवरात्र साजरा करतात त्याची कथा पुढीलप्रमाणे :

दक्षराजाच्या यज्ञाच्या वेळी सतीने आपला देह यज्ञात जाळून घेतला होता हे आपल्या सर्वाना माहीतच आहे  . त्यानंतर त्रिपुरासुर , तरकासुर या दैत्याच्या नाशासाठी आदिशक्तीला भूतलावर अवतार घ्यावयाचा होता त्यासाठी तिने हिमालयाची पत्नी मैनावती हिला प्रेरणा दिली व तिच्या पोटी जन्म घेण्याचे ठरवले .

त्याप्रमाणे  सती नष्ट झाल्यानंतर मैनावतीने सतीची मातीची मूर्ती तयार केली व गंगा कीनारी उग्र तपश्चर्येला प्रारंभ केला . आदिशक्तीने आपल्या पोटी जन्म घ्यावा असा तिचा हेतु होता . तिची चिकाटी आणि तपश्चर्या पाहून प्रसन्न होऊन आदिशक्तीने मैनावतीच्या उदरी जन्म घेतला तो दिवस होता चैत्र शु प्रतिपदेचा त्यानंतर त्या मुळीच नाव पार्वती ठेवण्यात आले .

हिमालय पर्वताची कन्या पार्वती कशी ? असा प्रश्न सर्वसाधारण माणसाच्या मनात सहज उभा राहतो . कुलाची नावे आडनावे अनेक प्रकारची असतात जसे की रेडे , वाघ तसेच पर्वते नावाचा उल्लेख आढळतो . आजही पर्वते आडनावे आहेत मग हिमवान नावाचा पर्वत आडनाव असलेल्याच्या पोटी पार्वतीचा जन्म झाला . पार्वती मातेचा जन्म चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला झाला म्हणून या दिवशी नवरात्र साजरी केली जाते व देवीचे पाठ करून हवंन केले जाते .

आपल्या संस्कृतीमध्ये तीन 3 नवरात्री कोणत्या व का साजऱ्या करायचे माहीत आहे का !

3] शाकंभरी नवरात्रीची कथा :

शाकंभरी नवरात्र हे पौष महिन्याच्या अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत ही नवरात्र साजरे करतात . या नवरात्रात देवीची पूजा करतात .याची कथा पुढीलप्रमाणे :
प्राचीन काली दुष्काळ पडल्यावर ऋषीमुनिणी देवीची आराधना केली तेव्हा डीव्हीआय प्रकट झाली आणि शंभर डोळ्यानी ऋषिकडे पाहू लागली तेव्हा तिला शताक्षी ही नाव पडले मग तिने स्वतच्या शरीरातून सर्व प्रकारच्या भाज्या अन्न धान्य निर्माण केले म्हणून तिला शाकंभारी म्हणतात . त्यामुळे पर्जन्यवृष्टि  झाली आणि प्रथम ‘शाक‘ म्हणजे पालेभाज्या उगवल्या व त्या पलेभाज्यांचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून घेतला आणि दुष्काळ संपला या प्रसंगाची आठवण म्हणून या देवीला शाकंभरी देवी म्हणतात .

या देवीचे नवरात्र पौष अष्टमीपसून सुरू होते व पौर्णिमेला या उत्सवाची संगता होते .

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की संगा .[आपल्या संस्कृतीमध्ये तीन 3 नवरात्री कोणत्या व का साजऱ्या करायचे माहीत आहे का !]

आपल्या संस्कृतीमध्ये तीन 3 नवरात्री कोणत्या व का साजऱ्या करायचे माहीत आहे का !

 

satyanarayan puja vidhi पौर्णिमेला करावयाची सत्यनारायण पूजा संपूर्ण विधी व 5 टिप्स

vasant panchami seva वसंत पंचमी महत्व व 2 सेवा |

श्री मकर संक्रांतीचे महत्व व पूजेची संपूर्ण माहिती | चला तर जाणून घेऊ

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

Leave a Comment

EMAIL
Facebook