Mahashivratri :जाणून घ्या 2 कथा महाशिवरात्रीची | महाशिवरात्रीची सेवा कोणती व कशी करावी ?

Table of Contents

Mahashivratri महाशिवरात्री प्रस्तावना :

माघ वद्य चतुर्दशीस महाशिवरात्र (Mahashivratri) म्हणतात. तसे तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी म्हणजे देखिल शिवरात्र च असते. पण माघ कृ. पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपवास करतात. शंकराला अभिषेक लघुरूद्र, महारूद्र करतात, बेलाची पाने भक्तीभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथाही सांगितली जाते आणि एकली जाते . एक पुरातन कथा ती अशी पुढीलप्रमाणे –

Mahashivratri

कथा महाशिवरात्रीची (Mahashivratri)-

एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्र (Mahashivratri) होती त्याला महाशिवरात्रीचे महत्व माहीत नव्हते . जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते. काही ओं नमः शिवाय’ असा जप करीत होते ते पाहुन तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो ‘शिव शिव’ असे म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडुन नकळत शिवोपासना घडु लागली, तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यांसमोर पानांचे झुबके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज निट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरूवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती, त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातून नकळत शिवोपासना घडत होती.

तेवढ्यात हळू हळू हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तिरकामठा सज्ज करून एका हरीणीवर नेम धरला. हरिणीला चाहुल लागली, ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली,’हे व्याधा, थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस, माझी मुले-बाळे वाट पाहत असतील, मला त्यांना भेटू दे, मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार!
हरिणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला “वाss ! काय पण सांगत आहे, म्हणे मी परत येईन. हातात आलेली शिकार सा द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरंबाळं उपाशी ठेऊन तुला सोडून देऊ, अन तुझ्यावर विश्वास ठेऊ!”
“व्याधा, मी खरच सांगते माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे!” हरिणी कळवळुन म्हणाली.


ते ऐकुन व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास पडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणुन तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती.

दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहुन व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरिणीच्या १ प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहिसा होतो त्याप्रमाणे शुध्द चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला.
हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होतांच, भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले.

रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशात हे मृग नक्षत्र दिसत असते , त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे . अशी ही कथा आहे .

Mahashivratri


शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातुन सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की, ‘शिव’ म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहचले पाहिजे. शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या योग्य मार्गावरून जातांना अनेक ठिकाणी चढ उतार येतात . कठीण प्रसंग येतात . कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही.

जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही.
समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच कोणी आले नाही सर्व जण दूर गेले . त्यावेळी शंकर भगवान आले आणि सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले.

अमृत पितो तो ‘देव’ विषपान करतो तो ‘महादेव’ म्हणून भगवान शंकराला निलकंठ म्हणतात. भगवान शंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातुन ठिपकणारे थेंबथेंब पाणी हेच सुचवते. स्वामी महाराजांवरील आपला अभिषेक सतत चालु राहिला पाहिजे.

Mahashivratri
अशा भगवान शंकराची सेवा महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी करावी ती अशी –

सेवाकेंद्रात भगवान श्रीदत्त महाराजांच्या शेजारी भगवान शंकराचा फोटो सकाळी ८ आरतीआधी ठेवावा. सकाळी ८ वाजताच्या आरती नंतर यज्ञविधी ग्रंथाप्रमाणे महादेवाच्या पिंडीची षोडशोपचार पूजा करावी. अभिषेक सुरू झाल्यावर पुढील क्रमाने अभिषेक स्तोत्र व मंत्राचे पठन करावे-
१) १ वेळा गणपती अथर्वशीर्ष
३) गायत्री मंत्र २४ वेळा / १ माळ
५) अमृत संजीवनी मंत्र ११ वेळा
७) कालभैरव अष्टक १ वेळा
२) संस्कृत/मराठी रूद्र १ वेळा
४) संजीवनी मंत्र ११ वेळा
६) महामृत्युंजय मंत्र ११ वेळा
८) शिवकवच १ वेळा
९) शिवमहिम्न संस्कृत/मराठी १ वेळा १०) द्वादश ज्योर्तिलिंग स्तोत्र १ वेळा
११) रामरक्षा १ वेळा
१२) श्री सूक्त १ वेळा
१३) शिवअष्टोत्तर नामावली १ वेळा
१४) ‘शिवहर शंकर’ हा मंत्र ११ वेळा.

सकाळी १०:३० वा. च्या आरतीला सकाळच्या ३ आरत्या, सायंकाळच्या २ व भगवान शंकराची आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना जयजयकार करून प्रसाद द्यावा. उपवासाचे ६ नैवेद्य समर्पण करावेत. शिवरात्रीस सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी उपवास करावा. महाशिवरात्रीस (Mahashivratri) भगवान शंकराच्या पिंडीवर दहीभात लेपन करू नये.
दहिभात लेपनाचा कर्यक्रम आपण फक्त श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशीच करावा. अभिषेक सुरू करण्यापुर्वी एका पाटावर भगवती पार्वती मातेसाठी ८ फुट लांब व ३२ इंच रुंद अशी हिरवीसाडी, खण, नारळ त्यांची ओटी एका पाटावर काढून ठेवावी. अशा पध्दतीने महाशिवरात्रीस (Mahashivratri) भगवान शंकराची सेवा तुम्ही रूजु करु शकता .

Leave a Comment

EMAIL
Facebook