वातींचे प्रकार.
🔹१) नंदादीप वात– किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी- ही ५, ७, ९ पदरी असते शक्यतोवर ५ किंवा ७ पदरी असते. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.
🔹२) बेल वात– ह्या श्रावणात महिनाभर लावतात. एकाला जोडून एक अश्या ३ वाती करतात (४+४+३ पदरी) एकूण अकरा पदर. अशी वात काही जन रोज महिनाभर ११ वाती लावतात तर काही जन फक्त सोमवारी लावतात.
🔹३) शिवरात्र वात– महाशिवरात्रीला ११०० पदराची वात तुपात भिजवून लावतात.
🔹४) वैकुंठ वात– ३५० पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशीला लावतात. एक पुस्तक किंवा वही मोजून मग त्यावर गुंडाळतात.
🔹५) त्रिपूर वात– तीन पदराच्या जोडून (३६५ +३६५) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.
🔹६) अधिक महिन्याची वात– ३३ पदरी ३३ वाती, ३३ फुलवाती तुपात भिजवून लावतात. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.
🔹७) कार्तिकी वात– एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत ३ पदरी १०५ वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच १०५ वाती लावतात.
🔹८) काड वाती-या प्रकरात तुळशीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळून ती वात गणपतीला, होमहवन, पुरण आरती करतात.
🔹९) श्रावण वात– रोज महिनाभर ११ पदराच्या ११ वाती लावतात.
🔹१०) फुलवाती– ह्या निरंजनात रोज लावतो आरतीच्या वेळी.
🔹११) लक्ष्मी वात – ही वात शीघ्र लक्ष्मीप्राप्तीसाठी कुंकू लावलेली लाल रंगाची फुलवात, ह्या निरंजनात आरतीच्या वेळी लावली जाते .
🔹१२) कुबेर लक्ष्मी वात– शीघ्र लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी कुंकू लावलेल्या लाल फुलवाती सोबत एक लवंग शुद्ध तुपासोबत चांदीच्या निरंजनीत ठेवतात.
🔹१३) अनंतवात– ह्यामधे एक वशाची एक वात, दोन वशाच्या दोन वाती, तीन वशाच्या तीन, असे १०८ वशाच्या १०८ वाती करतात व तुपात भिजवून श्रीकृष्णाला ओवाळतात.
🔹१४) देह वात– देह वात ही आपल्या डोक्यावर टाळुपासून ते पायाच्या अंगठ्या पर्यंतची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची १०८ किंवा ३६५ पदरी अशी वात करतात व ती तेलात भिजवून ज्याच्या मापाची केलीय त्या व्यक्तीने लावायची असते.ही सर्वात शेवटची वात असते . त्यांनंतर ती व्यक्ति वात करत नाही अशी प्रथा काही ठिकाणी असते .
🔹१५) ब्रम्हांड वात- आपण आपल्या कपाळावर जेथे कुंकू लावतो त्या जागेपासून पुर्ण डोक्याला फेर घेऊन ते मोजून तेवढ्या लांबीची २५० पदरी वात बनवतात आणि ज्याच्या मापाची आहे त्यांच्या हातून तीळ तेलात भिजवून लावतात.
🔹१६) काकडा– काळ्या कपड्याचे बारीक तुकडे करून त्याच्या वाती करून काकड आरतीला लावायच्या, दृष्ट काढणे किंवा नजर उतरणे यासाठीही या वाटेचा उपयोग केला जातो.
🔹१७) दिवटीची वात -ही वात खंडोबाच्या नवरात्रात दिवट्या बुधल्यां साठी ही वात तयार केली जाते.
🔹१८) मशाल आणि टेंभे – ही वात जागरण आणि गोंधळ, या कार्यक्रमांसाठी मशाल आणि टेंभें यांच्या वाती तयार करतात.
🔹१९) कंदील वात– दिवाळीच्या वेळेस दीपमाळ, आकाश दिवे, काचेचे कंदील, शेगडी इत्यादींसाठी सुती धाग्यांच्या वीणीच्या जाड चपट्या सुतासारख्या वाती.
🔹२०) दारुगोळा वात– फटाके आणि तोफांच्या दारूगोळ्याच्या कामी येणारी ही वेगळ्या प्रकारची वात असते.
🔹२१) रथ सप्तमी– ला ७ पदरी.
🔹२२) कृष्णाला– ८ पदरी.
🔹२३) रामनवमीला– ९ पदरी.
🔹२४) दशावतारीवात– विष्णूला– १० पदरी.
🔹२५) शंकराला– ११ पदरी.
🔹२६) सूर्याला– १२ पदरी.
🔹२७) वैकुंठ चतुर्दशीला– १४ पदरी.
🔹२८) गणपतीला– २१ पदरी.
वरील वाती संपूर्ण वर्षभर करायचे असेल , तर नेम म्हणून तर त्या त्या दिवसापासून परत त्या दिवसापर्यंत व्रत करतात करणारे, जसे रथसप्तमी ते रथसप्तमी, गोकुळष्टमी ते गोकुळाष्टमी…
वरील सगळ्या वाती या काही तरी वसा काढूनच करतात, आणि जितकी पदरी पाहिजे तितके पदर गुंडाळायचे. या वाती करताना फक्त जोडवाती म्हणजे एकाला एक आशा दोन वाती जोडायच्या जोडवात करायच्या असतात .
३ पदरी असते ही वात… ३+३ पदर..
बेलवाती पण एकाला एक जोडून ३ वाती म्हणजे चार चार पदरच्या दोन आणि तीन पदरची एक अशी ४,४,३ पदरी असते ती बेलवात असते .[तुम्हाला माहीत आहेत का वातीचे विविध प्रकार कोणते व त्यांचा वापर !]
“हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी “
संस्कृत तसेच मराठी गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ | Ganapati Athrvashirsh Meaning
Ozar Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक अष्टविनायक संपूर्ण माहिती व 2 कथा जाणून घ्या
अष्टविनायक व्यतिरिक्त महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने | 21 Famous Ganesh Temple
“हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी “