Devhara Rules: आपण सर्वजण जीवनातील सुख-दुःखाची सुरूवात देवघरापासूनच करतो . घरात देवघर व देव्हारा असणे हे अत्यंत महत्वपूर्ण व आवश्यक आहे. नाहीतर देवघराशिवाय घर हे स्मशान मानले जाते. कारण जेथे देवघर तेथे देवांचा वास असतो, भक्ती असते अशा ठिकाणीच शांती सुख समृध्दी नांदते.
बहुतांशी लोकांच्या घरातील देव हे माशी लागलेले असतात. अर्थात काहींना नाक डोळे स्पष्ट नसतात. काहींना पाठी नसतात तर काही अती जुनाट झालेले असतात. तर काही देवांना चेहराच नसतो. देव पोकळ असणे, देवांच्या बैठकीस रिबीट मारलेले असणे यामुळे भक्त कितीही पूजा करतील परंतु त्या देवांचे कोपच होत असतात. अनेक व्यंग निर्माण होतात. दोष निर्माण करतात शुभकार्यात अडथळे येणे सतत आजार उद्भवणे विनाकारण वादविवाद होणे शिक्षण, आर्थिक समस्या इ. या समस्या निर्माण होण्याला कारण देवांचा कोप असणे हे आहे.
देवघरात (Devhara) उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो नको कारण, उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे खूपअसते. त्यामुळे त्यांची पूजा, व्यवस्थित सोवळे न पाळल्यामुळे दोष लागतात. नंदी नाग असलेली पिंड असणे यामुळे संकटे उद्भवतात. नंदीनागासहीत महादेवाची पिंड ठेऊ नये कारण ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व शिष्याचा कोप होतो. म्हणून अशी पिंड ठेऊ नये; नागही नको कारण, शेषनागाने पृथ्वी डोक्यावर धारण केली आहे, त्यामुळे त्यांची जागा घरात नको. वर्षातून एक दिवस आपण त्यांची पूजा देव्हाऱ्यात करतो (त्याला नागपंचमी म्हणतात ).
कुलदैवत व कुलदेवता या विषयी बऱ्याच लोकांना माहीत नसते तेव्हा जवळच्या केंद्रात जाऊन आपल्या आडनावावरून कुलदेवता यांची माहिती करून घ्यावी. कुलदेवता माहीत नसेल तर विविध संकटांना तोंड द्यावे लागते. कारण बरेचसे प्रश्न हे कुलदेवतेच्या अधीन असतात. मारुतीची मूर्ती देव्हाऱ्यात (Devhara)नसावी कारण तिसऱ्या पिढीत वंश खंडीत होतो. तसेच शनिदेव, सेंद्रिय दैवते, मुंजा ही दैवते देव्हाऱ्यात नसावीत. त्यामुळे त्यांचा कोप होतो व संकटांनातोंड द्यावे लागते.
- याचप्रमाणे सापडलेले देव, भेट म्हणून आलेले देव, बुडीत घराण्याचे आलेले देव ठेऊ नये. कारण, आपण जी काही सेवा करतो ती सर्व ज्यांचे देव असतील त्यांना लागू पडत असते.
- देव स्वतःच्या पैशाचे असावेत. शोभेसाठी देव ठेऊ नये ते आपली शोभा करतात.
- देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे कारण ईशान्य दिशा ही देवांची दिशा असते. देवघराला कळस नसावा. कारण आपले प्रश्न कळसापर्यंत पोहचतात.
- देवघराशिवाय देव ठेऊ नये. नुसत्या चौरंग-पाट यावर देव ठेऊ नयेत तसेच भिंतीवर टांगलेल्या स्थितीत देवघर नसावे.
- देवघरचा रंग शक्यतो फिक्कट पिवळाच असावा. देवघर शक्यतो लाकडी असावे. तसेच प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी एकाच देवाच्या अधिक मुर्त्या असतील तर कोणतेच देव काम करीत नाही. म्हणून प्रत्येक देवाची फक्त एक व एकच मूर्ती असावी. एक फोटो व त्याच देवाची एक मूर्ती चालू शकेल.
- तुटलेले ,खराब झालेल देव , खंडीत देव यांना पाटावर ठेऊन त्यांना नैवेद्य दाखवावा व एका लाल कापडात सव्वा मुठ तांदुळ व सव्वा रूपया ठेऊन त्यांना प्रार्थना करावी की आतापर्यंत झालेली सेवा तुमच्या चरणी रूजु करून घ्या व आपल्या तीर्थक्षेत्री जावे असे म्हणुन ते देव त्या कापडात बांधुन नदीत विसर्जन करावेत. शास्त्रोक्त पध्दतीने विसर्जन केल्यास दोष लागत नाही.
देवघराचे (Devhara) स्वरूप कसे असावे?
- देवघरात (Devhara) ३ ते ४ पायऱ्या असाव्यात.
- वरच्या पहिल्या पायरीवर- महाराजांचे अधिष्ठान मांडावे (मूर्ती) नंतर कुलदेवतेचा फोटो महाराजांच्या डाव्या बाजुस व उजव्या बाजुस कुलदैवताचा फोटो असल्यास ठेवावा. दुसऱ्या पायरीवर- डावीकडून दक्षिणेकडून कुलदेवतेचा, देवीचा टाक ठेवावा या प्रमाणे टाक मांडावेत.
- तिसऱ्या पायरीवर- इष्टदैवत, इष्टदेवतांमध्ये डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णामाता, महादेवाची पिंड (नंदी नाग विरहीत) शंख, घंटा एवढेच देव असावेत.
- चौथ्या पायरीवर- पितरांचे टाक ठेवावेत. पितरांच्या टाकांच्या खालच्या पायरीवर यंत्रे ठेवावीत.
- पितरांचे टाक ठेवण्याची पूर्वापार पद्धत असेल तरच पितरांचा टाक देव्हाऱ्यात ठेवावा. अन्यथा नवीन पद्धत पाडू नये.
पितरांचा टाक:
- यामध्ये स्वर्गवासी आई-वडीलांचाच टाक ठेवावा. पुरुष (वडील) आधी गेले असल्यास फक्त त्यांचा टाक ठेवावा. आई नंतर गेल्यास तिचा टाक ठेवू नये. जर आई सवाष्ण गेली असल्यास तिचा टाक ठेवतात. इतर पितरांचे म्हणजे त्यांच्या आधीच्या पितरांचे, भाऊ, काका, बहिण, मुलगा (मुंजा गेला असल्यास) त्यांचे टाक ठेवू नये. वडील गेलेले असल्यास आधीच्या आजोबांच्या टाकात नवीन भर घालून तो वडिलांच्या नावाने पुजावा. देवघरात (Devhara) अधिक पितरांचे टाक ठेवू नये.
- देवघरातील घंटेला तडा रिबीट, हनुमान, गरूड, नाग नसावेत. देवघर पश्चिमाभिमुख असल्यावर त्यावेळेस उजव्या बाजूचा विचार करावा. स्वामींच्या उजव्या बाजूस उत्तर अथवा पुर्व-पश्चिम येईल असा शंख ठेवावा. तो पाण्याने भरून ठेवावा. स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी.
- वास्तुच्या पूर्व दिशेस देवघर (Devhara) असल्यास आपणास ऐश्वर्य प्रतिष्ठा, लाभ होतो .
- वास्तुच्या उत्तर दिशेस देवघर (Devhara) असल्यास धनलाभ होतो .
- वास्तुच्या दक्षिण दिशेस देवघर (Devhara) असल्यास शत्रुपिडा होऊ शकते .
- वास्तुच्या पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य-धन हानी होते .
- वास्तुच्या वायव्य दिशेस देवघर असल्यास रोगबाधा होते .
- वास्तुच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रु-पिशाच्च पिडा उद्भवते .
- वास्तुच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होमहवनाशिवाय बाकी उपासना
निष्फळ ठरते. - देवपूजेतील देव एकमेकास पहात आहेत असे समोरासमोर मांडू नये.
- पैसे, धन, देव्हाऱ्यात ठेऊ नये. यंत्रे ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडून ठेवू नयेत.
- जमीनिशी समांतर मांडावीत. देव्हाऱ्यात शंकराची मूर्ती किंवा फोटो पुजू नये अन्यथा घराचे वातावरण स्मशानवत होईल.
- गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी कारण त्याच घरात पावित्र्य खूप सांभाळावे लागते. मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असते.
- देव्हाऱ्यात (Devhara) म्हसोबा पुजू नये कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. देवांच्या मूर्ती शोकेसमध्ये शोभेसाठी ठेऊ नये, आपली शोभा होते.
- देव्हाऱ्यात (Devhara)सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवावा. जे कुटुंब देवांना महाराजांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांच्या जीवनात अन्नाची कधिच कमतरता पडत नाही. घरात बरकत राहते, अन्नाचे दोष नाहिसे होतात तसेच कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष महाराजच आपल्या घरी आहेत तर त्यांना उपाशी ठेवणे योग्य नाही. म्हणुन सकाळ संध्याकाळ जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवितांना त्यावर तुळस ठेवावी.
अशा प्रकारे आपल्या मार्गातील मार्गदर्शनानुसार देवघर देव्हाऱ्याचे स्वरूप असावे.
अशीच नवनवीन माहिती पाहणीसाठी आमच्या यूट्यूब चॅनल ला भेट दया.