satyanarayan puja vidhi पौर्णिमेला करावयाची सत्यनारायण पूजा संपूर्ण विधी व 5 टिप्स

दर पौर्णिमेला सत्यनारायण (satyanarayan puja) का करावा ?

आज आपण पौर्णिमेला करावयाची सेवा (satyanarayan puja) पाहणार आहोत ही सेवा जर बारा पौर्णिमा सलग केली तर नक्कीच त्याचे फायदे तुमच्या जीवनात दिसतील . तर चला आपण पाहूया या सत्यनारायण पूजेची सेवा व मांडणी कशी करतात .

जन्म मृत्यु देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात व जन्म ते मृत्यु पर्यंत पालनपोषण करण्याचे काम, जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्युनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणुन मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान श्री शंकराच्या स्थानी असते.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो.

आपल्या घरात अन्न पुरेसे न पडणे, अनेक आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन समाधान न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते खूप लवकर संपणे, घरातिल पैसा हा अनेक व्यर्थ असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला तर त्याला वाटा फुटुन अनाठायी पैसा खर्च होत राहणे . वरील या सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाहीत .

असे प्रश्न ज्या वेळेस लोक केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा (satyanarayan puja)दर पौर्णिमेला घरच्याघरी करण्याचा सल्ला दिला जातो.

satyanarayan puja


सतत १२ पौर्णिमांनंतर त्या; व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात. बरेच असे चांगले अनुभव हे अनेक लोकांना आलेले दिसतात आणि याचे कारण म्हणजे की, आपण जी सत्यनारायण पूजा (satyanarayan puja)करतो ती ही संपूर्ण धान्याची पूजा असते.

जुनी मंडळी अशी म्हण म्हणत की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही; कारण विकतचे आणलेल धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्याने जाणकार मंडळी असे म्हणत असत की, जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात हे लक्षात येते .


घरातली माणसे हे एकविचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, तसेच पैसा पुरे न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पुर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा याचसाठी घालून आहे. आपल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णु यांचेकडे असल्याने, भगवान विष्णुंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातुन जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहिसे होतात.

तसेच तो पैसा धन, धान्य, पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख, शांती, आनंदी, प्रसन्न वातावरण राहण्यास सत्यनारायण पूजा (satyanarayan puja) ने सुरूवात होते.

satyanarayan puja

पौर्णिमेला करावयाची सत्यनारायण पूजा (satyanarayan puja) संपूर्ण विधी :



सत्यनारायण पूजा (satyanarayan puja) ही दर पौणिमेला प्रदोषसमयी (सूर्यास्ता आधी व नंतर २४ मि.) करावयाची असते. ऐश्वर्य, धन, संपत्ती साठी भगवान विष्णु व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्याघरी पूजा करावी. मकर संक्रांतीच्या दिवशीपण सत्यनारायण करावा.

साहित्य – १ पाट, १ चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे चार डहाळे, चौरंगावर अर्धा मिटर पांढरे कापड, ताम्हणात तांदुळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा. तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात (पहिली सुपारी-गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरूणाची) वरील पध्दतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी.

नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य, धूप, दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करून प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तिंनीच खावा बाहेरच्या कुणालाही प्रसाद देऊ नये. नातेवाईकांना सुध्दा देऊ नये.
यानंतर पूजेतील उरलेले गहु-तांदुळ, त्या त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे जे दोष असतील तर ते नाहीसे होऊन पवित्र होतात. कारण जेव्हा धान्य दुकानातुन विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागले असतात. त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी, ते पवित्र होण्यासाठी दरपौर्णिमा, संक्रातीला सत्यनारायण करावा.
या विधीमुळे घरात सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक स्थिती सुधारते.

satyanarayan puja
श्री स्वामी चरित्र सारामृत

  • श्री स्वामी सेवा मार्गातील नित्याच्या उपासनेचा असा हा महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात ओवीरुपात महाराजांच्या विविध लीला ओवीरुपात वर्णन करण्यात आल्या आहे. रोज क्रमश: ३ अध्यायांचे पठन व ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हा नित्यसेवेत केला पाहिजे. या लहानशा ग्रंथाचे संकल्पीत १०८ पाठ केल्याने महत्वाची समस्या मार्गी लागते, एवढे या ग्रंथाचे महत्व आहे. याचे पारायण पाऊण ते एक तासात सहज होवू शकते. हा ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराथी,इंग्रजी व तेलगु भाषेत उपलब्ध आहे. भारतातील १४ भाषांमध्ये याचे प्रकाशन झालेले आहे.
  • त्याचप्रमाणे तुम्हाला श्रवण सेवा करायची असेल तर तुम्ही या खालील यूट्यूब चॅनल श्रवण तरंग ला नकीच भेट देऊ शकता आणि वेगवेगळ्या सेवांचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकता .

 

Leave a Comment

EMAIL
Facebook