भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India

[ भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती ] परदेशातील प्रसिद्ध गणेशमंदिरे, गणेशमूर्ती आणि स्वरूप :-

परदेशातील गणपती विविध नावांनी ओळखला जातो. नेपाळमध्ये गणपतीला सूर्यगणपती म्हणतात. ब्रह्मदेशात महापिनी, मंगोलियातील गजमुखाला धोतकार म्हटलं जातं. तिबेटमध्ये सोकप्राक, तर कंबोडियात प्रहगणेश किंवा प्रहकनेस असा उल्लेख केला जातो. जपानमध्ये गणपतीला विनायकशा म्हटलं जातं. जावा बेटावर तो कालांतक या नावाने प्रसिद्ध आहे. [भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती]

 

भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India

जपान :

जपानमध्ये कांगितेन म्हणजे जपानी पद्धतीच्या गणेशमंदिरात जाऊन लोक प्रार्थना करतात.

सम्राट अशोकाची कन्या चारूमती हिने नेपाळमध्ये गणेशमंदिर बांधले अशी कथा आहे. नेपाळमधील गणेशमूर्तीतहेरंब गणेश लोकप्रिय असून या सिंहासनाधिष्ठीत गणपतीला दहा हात व पाच मस्तके आहेत. काठमांडूपासून जवळच असलेल्या भाटगांव येथे सूर्यविनायकाचे मोठे मंदिर आहे. सूर्यविनायकास एक मस्तक व चार हात असून हा विनायक दोन मूषकांवर बसला आहे.

कंबोडियातील :

कंबोडियातील ब्राँझची गणेशमूर्ती १३ व्या शतकातील आहे. मूर्तीच्या उजव्या हातात हत्तीचा मोडका सुळा व डाव्या हातात एक ग्रंथ आहे. मुकुट मात्र कंबोडियन पद्धतीचा नक्षीदार आहे.

 

जावा :

जावामध्ये असलेला गणपती “;बोरोचा गणेश ” म्हणून ओळखला जातो. या मूर्तीचे मस्तक खूप मोठे असून हातातील प्रसाद सोंडेने ग्रहण करत आहे असे स्वरूप आहे. मूर्तीच्या पायांचे तळवे परस्परांना चिकटलेले असून आसनाच्या समोरच्या बाजूस नररूंड चितारलेली आढळतात. हा प्रकार केवळ जावाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India
बाली :

बाली बेटावरील गणेशमूर्ती पाषाणाची आहे. तेथे गणपतीला अग्निदेवता मानले जाते. मूर्ती ज्वालास्वरूप सिंहासनावर बसली असून, मूर्तीच्या उजव्या हातात मशाल व डाव्या हातात खाद्यपात्र आहे.

व्हिएतनाम :

व्हिएतनाममध्ये प्राचीन सयामी पोथी सापडली. त्यात गणपतीची सहा रेखाचित्रे आढळली. त्यात कासवावर उभी असलेली विघ्नेश्वर
गणपतीची चित्रेही आहेत.

भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India

बोर्नियो :

बोर्नियो येथील गणेश चतुर्भुज व जटाधारी आहे. शंकरासारख्या जटा व भाळी चंद्र असं बोर्नियातील गणेशस्वरूप दिसते.

इराण:

इराणमध्ये (त्यावेळचा पार्शिया) लुरिस्थान येथील उत्खननात खड्गधारी गजानन सापडला. हे शिल्प सध्या पॅरिसच्या वस्तुसंग्रहालयात आहे. हे शिल्प इ.स.पूर्व १२०० वर्षापूर्वीचे असावे. या योद्धा गणेशाच्या डाव्या हातात नाग असून उजव्या हाती त्रिशूळ आहे. या गणेशाला दाढी आहे हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य.

अफगाणितस्थान :

अफगाणितस्थानात “अलिधारूना” रूपातील गणेशमूर्ती सापडली आहे. काबुलचे लोक तिची पूजा करतात. या उभ्या मूर्तीच्या चौथऱ्यावर संस्कृतमध्ये जे वाक्य कोरले आहे त्यावरून ही मूर्ती ६ व्या शतकातील असावी असा अंदाज आहे.

भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India

मेक्सिको :

दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोतील लोक आजही गजमुख व मनुष्यदेहधारी अशा देवाची पूजा करतात. तेथील कोपानच्या मंदिरात सापडलेली गणेशाची मूर्ती वरूणदेवता म्हणून ओळखली जाते. तिच्या दोन्ही हातात विजेचे प्रतीक असलेल्या प्रकाशरेखा आहेत.

ग्रीक : 

ग्रीक पुराणांमध्ये “नॅनस” ह्या बुद्धीदेवतेचा उल्लेख येतो. ती गजमुखी व दोन सोंडाची आहे. कोणत्याही मंगलकार्याच्या सुरूवातीला नॅनस ची पूजा केली जाते. आपणही गणेशाला बुद्धीदाता म्हणतो आणि कार्यारंभी त्याची पूजा करतो. “;नॅनस” व “गणेश” मध्ये प्रारंच साम्य आहे.

भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India

श्रीलंकेत:

श्रीलंकेत कोलंबोपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या कदरगाम सुब्रमण्यम मंदिरात श्रीगणेशमूर्ती आहे. तेथे आजही वैदिक पद्धतीने पूजाअर्चा होते. अमेरिकेत नॅशविलेस्टेट येथे गणेश मंदिर आहे. जगभरच्या श्रीगणपतींची अशी ही कहाणी. [भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India ]

अष्टविनायक व्यतिरिक्त महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने | 21 Famous Ganesh Temple

Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती

Travel Ashtvinayak 2024 |श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक जाणून घ्या इतिहास मूर्ती व मंदिर ची संपूर्ण माहिती

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

 

Leave a Comment

EMAIL
Facebook