महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने (Famous 21 Ganesh Temple ):
१) गणपतीपुळ्याचा गणपती :
समुद्राकाठचे हे अत्यंत प्रसिद्ध, जागृत आणि स्वयंभू स्थान आहे. असे सांगतात की, परशुरामाला दृष्टांत होऊन त्यांनी स्वयंभूमूर्ती स्थापिली. इथला सबंध डोंगरच गणेशरूप असून गणेशाला प्रदक्षिणा घालायची तर संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालावी लागते. (महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने (21 Famous Ganesh Temple )
2) कसबा गणपती – पुणे :
पुण्याची ग्रामदेवता, जिजाबाईंनी याची स्थापना केली. लग्न, मुंजीत पहिली अक्षत देतात. सार्वजनिक गणेशोत्सवात मानाचा पहिला गणपती.
3) श्रीगणपती देवस्थान – सांगली :-
कृष्णेच्या काठावर, सांगलीतील प्रेक्षणीय भव्य मंदिर, सांगलीचे आराध्य दैवत, थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी याची स्थापना केली. (१८४३)
४) कडावचा दिगंबर सिद्धीविनायक :-
कडाव, ता. कर्जत (रायगड) कण्व मुनींनी या गणेशाची स्थापना केली. ही मूर्ती वस्त्रविहीन आहे म्हणून दिगंबर गणेश असे नाव आहे. कर्जतपासून ९ कि.मी. अंतरावर आहे.
५) श्रीमोदकेश्वर – नाशिक :
शिवशापदग्ध कामदेवाला येथे पूर्ववत शरीर प्राप्त झाले. म्हणून कामवरद महोत्कट या नावाने प्रसिद्ध. मोदकासारखा याचा आकार आहे. मोद देतो (आनंद) तो मोदकेश्वर.
६) राजूर गणपतीचे राजूर :-
सिंदुरासुराचा वध केल्यानंतर वरेण्यराजाला विनायकाने इथेच “ गणेश गीता ” सांगितली. भारतातील साडेतीन गणेशपीठांपैकी पूर्ण पीठ. औरंगाबादपासून २४ कि.मी. अंतरावर वसलेले आहे .
७ ) केळझरचा एकचक्रा गणेश :-
बकासुराचा वध करण्यापूर्वी पांडवांनी एकचक्रा नगरीत विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली. वर्ध्यापासून २४ कि.मी. वरचे सांप्रतचे केळझर म्हणजे एकचक्रा नगरी आहे .
८) नांदेडचा त्रिकुट गणेश :-
बाळ गजाननाने पित्याच्या आज्ञेनुसार येथे अनुष्ठाने केली. येथील गणेशतीर्थात स्थान केल्याने चर्मरोग बरे होतात.
९) श्रीगणपती – सीतावर्डी नागपुर :-
मूर्ती उजव्या सोंडेची, कडक नवसाला पावते, नागपूरच्या भोसले घराण्याने याची स्थापना केली असे म्हणतात.
१०) श्रीविज्ञान गणेश :-
राक्षसभुवन (मराठवाडा) जालन्यापासून ३६ मैलांवर. गोदावरीच्या काठावर श्री दत्तात्रयाने इथे तपस्या करून विज्ञानगणेशाची स्थापना केली.
११) वेरुळ – लक्षविनायक क्षेत्र :-
या क्षेत्राचे प्राचीन नाव एलापूर. येथील घृष्णेश्वराच्या मंदिरातही गणेशमूर्ती आहे. कार्तिकेयाने तारकासुराला मारण्यास समर्थ • होण्यासाठी, शंकराच्या उपदेशाप्रमाणे याठिकाणी विनायकाची
स्थापना केली.
१२ ) तळ्यातील गणपती –
पुणे सारसबागेत पर्वतीच्या पायथ्याशी, पुण्यातील एक आकर्षण, उजव्या सोंडेची मूर्ती. मूळ स्थापना श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी केली (१७७४) नवसाला नक्की पावतो.
१३) साक्षी तथा मोक्षी गणपती – कोल्हापूर –
अगस्ती ऋषींनी करवीराची यात्रा केली. त्यावेळी येथे ह्या गणपतीची स्थापना करून त्याच्या साक्षीने तप केले म्हणून साक्षी व मोक्ष देणारा म्हणून मोक्षी गणपती..
१४) भालचंद्र गणेश क्षेत्र :
परभणीपासून २६ मैल दूर सैलू नावाचे स्टेशन आहे. तेथून सुमारे १५ मैलांवर गोदावरीच्या मध्यभागी भालचंद्र गणेश मंदिर आहे. चंद्राने इथे आराधना केली होती.
१५) मंगलमूर्ती -चिंचवड (पुणे) :-
पुण्यापासून जवळ, पी.एम.टी. च्या बसेस जातात. जागृत स्थान, मोरया गोसावींनी स्थापना केली.
१६) दशभुज लक्ष्मी गणेश :-
हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी.
१७) श्री वक्रतुंड – आवास :-
अलिबागच्या उत्तरेला १२ कि.मी. अंतरावर आहे. अभिजीत राजा व राणी यांनी कनकेश्वराचे उग्र तप केले. त्यांना वक्रतुंड मंत्राचा उपदेश लाभून पुत्रप्राप्ती झाली. त्यांच्या प्रार्थनेनुसार गणपतीने येथे कायमचे वास्तव्य केले. पूर्वेला ५ कि.मी. अंतरावर कनकेश्वर डोंगर आहे.
१८) श्रीमुद्गल गणेश मंदिर :
परभणी जिल्ह्यात मानवत रोड स्टेशनजवळील मुद्गल क्षेत्रात आहे. मुद्गलपुराणाची रचना करणाऱ्या मुद्गलऋषींनी ह्या गणेशमुर्तीची स्थापना केली.
१९अ) श्रीसिद्धीविनायक – प्रभादेवी (मुंबई)
नवसाला पावतो म्हणून भक्तांच्या लांबच लांब रांगा चतुर्थीला व मंगळवारी लागतात. मूळच्या छोट्याशा मंदिराचे आता भव्य मंदिरात रूपांतर करून सोनेरी कळस चढवला आहे.
ब) गिरगावातील फडके गणपती :-
या मंदिरास १९९६ साली १०० वर्षे पूर्ण झाली.
२०अ) श्रीसिद्धीविनायक –
आंजर्ले, ता. दापोली (रत्नागिरी) डोंगरात आहे.
२० ब) श्रीगणपती बाळगीर –
महाराजांचा मठ, नांदेड : नवसाला पावतो.
२१) महागणपती (टिटवाळा):
कण्व मुनींनी स्थापिलेल्या ह्या गणेशमूर्तीच्या उपासनेमुळे, शकुंतलेचे दुष्यंत राजाशी पुर्नमिलन झाले. त्यांचा विवाहही येथेच झाला होता. नंतर महाभारतकालीन मूळ मूर्ती नाहीशी झाली. थोरले माधवराव पेशवे येथे एक तलाव बांधून घेत होते त्यावेळी पाया खोदतानसरदार रामचंद्र मेहेंदळे यांना सांप्रतची मूर्ती सापडली. त्यांनी पेशव्यांना कळवले. तेव्हा श्रीमंतांनी ह्या महागणपतीची स्थापना केली. येथे आराधना केली असता व नियमित दर्शन घेतले असता, इच्छुकांचे विवाह जमतात म्हणून याला विवाह गणपती असेही म्हणतात. येथील मूर्तीला तीन डोळे आहेत. ह्या गणेशाच्या आराधनेने पती पत्नीला नांदवत नसेल तर पुनः नांदवतो, ज्यांना पुत्र नसेल त्यांना पुत्रप्राप्ती होते. टिटवाळा गणपती मंदिरात प्रवेशद्वारापासून आत शिरताच उजव्या हातास प्रथम शंकराचा गाभारा लागतो. त्या गाभाऱ्यात प्रवेश करताना उजव्या हातास श्रीगणेशभक्त कै. वेणगावकर जोशी यांच्या पादुकांची स्थापना केली आहे. या पादुकांचे भक्तांनी अवश्य दर्शन घ्यावे. महागणपतीच्या मूर्तीची प्राचीन ऋषीमुनींच्या हस्ते यथायोग्य व शास्त्रशुद्ध अर्चा झाल्यामुळे मूर्ती सजीव आहे. मूर्तीसमोर उभे राहिले असता त्यातील जीवंतपणा प्रत्यक्षात दिसून येतो.
टिटवाळा येथे महागणपती मंदिराजवळ वैश्य समाजाचे विठ्ठल- रखुमाई मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातून एक पत्र्याची नळी गाभाऱ्याबाहेर सोडण्यात आली आहे. पंढरपूरच्या मंदिरात चालेल्या भजनाचा आवाज या नळीतून ऐकू येतो असे काहींचे म्हणणे आहे.
सतीचे स्मारक, एकनाथ उर्फ जयपाल महाराजांची समाधी, वासुंद्री गावातील पेशवेकालीन शिवमंदिर या स्थळांना अवश्य भेट द्यावी. टिटवाळा, मुंबई-नाशिक, लोहमार्गावर कल्याणपासून तिसरे स्टेशन आहे. बोरीबंदरहून, टिटवाळा, आसनगाव कसारा लोकल असतात. [महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने (21 Famous Ganesh Temple )]
Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती
Ashtvinayak Lenyadri ganapti | अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती संपूर्ण माहिती
Ashtvinayak Lenyadri ganapti | अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती संपूर्ण माहिती
krushnjanmbhumi history मंदिराचा इतिहास: तोडफोड आणि पुनरुज्जीवन
10 thoughts on “अष्टविनायक व्यतिरिक्त महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने | 21 Famous Ganesh Temple”