महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे (महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे : | Famous Ganesh Temple):
आत्ता काही दिवसात मुलांच्या शाळेला सुट्ट्या सुरू होतील आणि कुठे फिरायला जायचे यावर घरात सर्वांची मतंन्तरे एकावे लागतील आपल्या भारतीय संस्कृति चा वसा पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर मुलाना आशा धार्मिक तसेच छान पर्यटन देखील असलेल्या ठिकाणी नक्की घेऊन जावे . आता धार्मिक म्हटल्यावर मुलांचे चेहरे नक्कीच बघण्यासारखे होतील परंतु त्यांना महाराष्ट्र बाहेरील ठिकाणे फिरायचे आणि त्यांचे सर्वांच्या आवडीच्या गणपती बाप्पा च्या दर्शन घेण्यासाठी जायचे म्हटल्यावर कोणीही नाही म्हणणार नाही म्हणजेच या यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तुम्ही भारतातील काही प्रसिद्ध आणि प्राचीन गणेश मंदिरांना भेट देऊ शकता. या निमित्तानं चल तर मग आपण देशातील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिरांविषयी जाणून घेऊयात… (महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे : | Famous Ganesh Temple)
अ) मध्यप्रदेश :-
१) इंदूर शहरातील बडे गणेश – १२ फूट उंचीची गणेशमूर्ती येथे आहे.
२) इंदूर पासून ६ कि.मी. अंतरावर मांडवगड पासून जवळच प्रगारा क्षेत्रातला वक्रतुंड गणेश.
३) उज्जैनचा चिंतामणी.
ब) राजस्थान :-
१) जोधपूरजवळच्या घटियाला येथील एका प्राचीन पाषाणस्तंभावर गणेशस्तुती लेख कोरला आहे.
२) बळीराजाने स्थापलेला बळी गणपती.
३) तापी नदीच्या काठी रामकुंड आहे. तेथे श्रीरामाने त्राटिका राक्षसीवधापूर्वी स्थापलेला रामजी गणेश.
क) उत्तर प्रदेश :-
१) ओंकारगणेश (प्रयाग) : इथे आदिकल्पाच्या आरंभी ॐकाराने मूर्तिमंत होऊन गणपतीची आराधना केली होती.
२) ढूंढीराज गणेश (काशी) : काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या परिसरातच शंकरपुत्र गणेशचं मंदिरही आहे.
ड) हिमाचल प्रदेश :-
१) षड्भुजगणेश (वैजनाथ जि. कांगडा) – ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत गणेशाचं वर्णन करताना त्याच्या सहा हातातील आयुधांची जी माहिती दिली आहे नेमकी तशीच आयुध ह्या षड्भुज गणेशाच्या हाती आहेत.
२) अमरनाथ गुफेतील बालगणपतीचे हिमलिंग.
३) गणेशाने जेथे महाभारत लिहून घेतले तो गणेशगुफेतील गणेश.
इ) बंगाल :-
हुबळी नदीकिनारी असलेल्या वडनगर गावी अष्टभुजागणेशाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
य) बिहार :-
राजगृह, मंदार पर्वत, रामगढ इ. टिकाणी गणेश मंदिरे आहेत.
र ) ओरिसा :-
१) पुरीच्या जगन्नाथ मंदिरात ” अजाननाथ ” गणेशाची मूर्ती आहे.
२) ओरिसातील खंडगिरी येथील प्राचीन लेण्यांमध्ये ” गणेशगुफा ” हे लेणे आढळते.
ल) आंध्र :-
भद्राचलम, विजयवाडा, कालहस्ती इ. ठिकाणी गणेशस्थाने आहेत.
व) केरळ :-
१) त्रैगर्त राजा धर्मगुप्त याने श्रीमदनंत मंदिरात गणेशाची स्थापना केली. या मंदिराचा विध्वंस करण्यासाठी टिपू सुलतान आला असता येथील विहीरीचे पाणी प्यायल्यावर त्याचे मन पालटले व त्याने देवाच्या सेवेसाठी व्यवस्था करून दिली.
२) मधुपुरचा गणेश – याला उडपा नावाचे पक्वान्न प्रिय आहे.
स) कर्नाटक :-
१) हंपीचा विघ्नांतक विनायक – हा विनायक गजमुखी नसून ह्याचे तोंड मनुष्यासारखेच आहे. गजमुखासुराचा वध याच विनायकाने केला अशी कथा आहे.
२) कोलार जिल्ह्यात कुरडुमळे येथे कौंडिण्य महागणपतीचे स्थान आहे. येथील महागणपतीची मूर्ती नऊ फूट उंचीची आणि हिरव्या संगमरवराची आहे. तसेच कारवार जिल्ह्यात इडगुंजी येथे “पंचखाद्यप्रिय महागणपती ” आहे. येथे माघ शुद्ध सप्तमीला रथोत्सव असतो.
३) गोकर्ण महाबळेश्वर – येथे बटु वेषातील गणपती आहे याला दोन हात आहेत. गोकर्ण महाबळेश्वराचे पूजन करण्यापूर्वी या गणेशाचे पूजन करतात. रावणाच्या हातून शंकराचे आत्मलिंग वाचवणारा हाच तो बटु गणपती. या मूर्तीच्या डोक्यावर रावणाने ठोसा मारल्याची खूण आहे.
श) तामिळनाडू :
१) कुंभकोणमचा कुरूंबिथर विनायक – या विनायकाला सुधागणेशही * म्हणतात. कारण अमृतमंथनाच्यावेळी जेव्हा खूप परिश्रम करूनसुद्धा अमृत मिळेना, तेव्हा देवांनी इथे विनायकाची स्थापना करून त्याची पूजा प्रार्थना केल्यावर अमृत मिळाले. कुंभकोणम हे दक्षिण भारतातले प्रसिद्ध क्षेत्र आहे.
२) तसेच श्वेत विनायक, तोंडी विनायक, आदिविनायक इ. अनेक राऊळे आहेत.
ह) गुजरात :-
१) अहमदाबादचे भद्रगणेश मंदिर पेशवेकाळापासून आहे.
२) बडोदे येथील सिद्धनाथ मंदिर, गिरनार पर्वतातील रेवती गणेश.
३) नवसारी जिल्ह्यातील सिसोद्रा येथे असलेले गणेशवड मंदिर येथे वडाच्या झाडातून ४०० वर्षापूर्वी गणपती प्रकटला अशी आख्यायिका सांगितली जाते. विशेष म्हणजे या देवस्थानला औरंगजेबाने इनाम दिले होते.
४) दुर्गासारख्या असुराचे कूट करणारा तो दुर्गकुट गणेश – सोरटी सोमनाथजवळ आहे.
देशातील सर्वात मोठे गणेश मंदिर गुजरातमध्ये आहे, जे गुजरातमधील अहमदाबादपासून 25 किमी अंतरावर 6 लाख स्क्वेअर फूट पसरलेले आहे. मुंबईच्या सिद्धी विनायक मंदिरातून आणलेली ज्योत येथे बसवण्यात आली आहे. त्यामुळे या मंदिराला सिद्धिविनायक असेही नाव पडले आहे. ( महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे : | Famous Ganesh Temple )
https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg
अष्टविनायक व्यतिरिक्त महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने | 21 Famous Ganesh Temple
Ozar cha Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक अष्टविनायक संपूर्ण माहिती व कथा जाणून घ्या
5 thoughts on “या सुट्ट्यात नक्की भेट द्या महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे : | Famous Ganesh Temple”