श्रावणात 7 सातही दिवशी आवर्जुन करावे असे नियम :
श्रावणात आवर्जुन करावे असे काही नियम :
1] रविवारी काय कराल :-
तांब्याच्या लोट्याने सुर्यास अर्घ्य देणे, श्रीराम मंदिरात व श्री खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन घेणे .
प्रसाद अर्पण करणे. सुर्य सहस्रनाम् , आदित्य हृदय स्तोत्र पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
नारिंगी, लाल रंगाच्या वस्तू दान करणे.
लाल चंदन स्वतःस लावणे.
गाय व बैल यांना ओले गहू द्यावे. / श्रावणात 7 सातही दिवशी आवर्जुन करावे असे नियम
2] सोमवारी :-
शिवलिंगावर शिवामुठ वहाणे, दुधाने अभिषेक करणे.
वटवृक्षाखालील व बेलाच्या झाडा खालील शिवलिंग असल्यास अतिउत्तम.
शिव सहस्रनाम्, रूद्र सूक्त पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
पांढऱ्याशुभ्र, मोती रंग, हलक्या निळ्या रंगाच्या वस्तू दान करणे.
त्रिपूंड, चंदन स्वतःस लावावे.
गाईला बत्तासे देणे.
3] मंगळवारी :–
गणपती मंदिरात, दुर्गा मंदिरात, मारूती मंदिरात दर्शनास जाणे.
गणपतीला २१ दुर्वांचा हार, जास्वंद, मोदक अर्पण करणे.
ऋणहर्ता गणेश स्तोत्र पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
मारूतीला ११ प्रदक्षिणा घालणे. गणपती सहस्रनाम् पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
विचित्र वीर हनुमान माला मंत्र, हनुमान चालीसा पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
कुंकू स्वतःस लावणे.
दुर्गा मंदिरात दुर्गा स्तोत्र, दुर्गा सूक्त, दुर्गा चालीसा पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
गडद लाल, लाल रंगाच्या वस्तू दान करणे.
गाईला गुळ द्यावा.
4] बुधवारी :-
श्री विठ्ठल, विष्णु मंदिरात जाऊन तुळस, फुले अर्पण करावी.
विष्णु मंदिर अश्वथ (पिंपळाच्या) झाडाखाली असल्यास अतिउत्तम.
शक्य असल्यास मंदिराच्या आवारात केळीची झाडे लावावी., विष्णु सहस्रनाम् , विष्णु सूक्त, पुरूष सूक्त पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
पंचमुखी मारूती मंदिरात जाणे हनुमान वडवानल स्तोत्र पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
झाडे लावावी.
बुक्का स्वतःस लावणे.
निळ्या, हलक्या हिरव्या रंगाच्या वस्तू दान करणे.
गणपतीला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवणे.
गाईला हिरवा चारा घालणे.
पाण्यातील माशांना कणीक घालणे.
5] गुरूवारी :-
श्री दत्तात्रेय व त्यांच्या पूर्णावतार व अंशावतारी सद्गुरूंच्या दर्शनास जावे.
औदुंबराला दूध, खडीसाखर अर्पण करणे व ११ प्रदक्षिणा घालणे. बेसनाचे लाडू वाटणे व गाईला देखील देणे.
दत्तबावन्नी, नारद विरचित दत्तात्रेय स्तोत्र, दत्त चित्त स्थिरीकरण स्तोत्र, दत्त माला मंत्र, इंदुकोटी तेज किरण स्तोत्र, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, सिद्धमंगल स्तोत्र, तारक मंत्र इ. पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
केशराचा गंध स्वतःस लावणे.
पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करणे.
ब्राह्मणांना दान करणे.
सद्गुरूंना दान करणे.
गाईला बेसन लाडू देणे.
6] शुक्रवारी :-
सरस्वती, लक्ष्मी, पार्वती मंदिरात जाऊन दर्शन घेणे. ३ प्रदक्षिणा घालणे. ओटी भरणे.
सुक्यामेव्याचा नैवेद्य दाखवणे. कडुलिंबाला दिवसा पाणी व गुळ घालणे. श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त, देवी सूक्त
, ललिता सहस्रनाम्, लक्ष्मी सहस्रनाम्, खडक माला स्तोत्र, प्रत्यंगिरा स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
ओले कुंकू स्वतःस लावणे.
हिरव्या, पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करणे.
गाईला बत्तासे व खीर घालणे.
सरबत वाटणे.
नेत्रहीन लोकांना मदत करणे.
7] शनिवारी :-
अश्वथ (पिंपळाखालील) मारूतीचे दर्शन घेणे, तेल, खडेमीठ, काळे उडीद, रूईच्या पानाची माळ वाहणे. नारळ अर्पण करणे किंवा वाढवणे.
नवग्रह मंदिरात जाऊन नवग्रहांना तेल अर्पण करणे. शनी महाराजांना तेल, खडेमीठ, रूईच्या पानाची माळ अर्पण करणे.
नवग्रह स्तोत्र, एकादश मुख हनुमत्कवचम्, मारूती स्तोत्र, हनुमान बाहुक, भैरव चालीसा पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
काळभैरवनाथ यांच्या दर्शनास जाऊन काळभैरवाष्ट व महाकाळभैरवाष्टक पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
नृसिंह मंदिरात दर्शनास जाऊन ऋणमोचन नृसिंह स्तोत्र पठण करणे किंवा Audio श्रवण करणे.
बुक्का, त्रिपूंड स्वतःस लावणे.
काळ्या, गडद निळ्या, जांभळ्या रंगाच्या वस्तू दान करणे.
उडदाच्या डाळीचे वडे गाईला देणे.
पिंपळाखाली तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे.
कुत्रा, मांजर यांना खायला घालणे.
- शिवाय गरजुंना अन्न, वस्त्र, द्रव्य दान केले तर अतिउत्तम.
- विद्यार्थी, वयोवृद्ध, अनाथ, अपंग, मूकबधिर, अंध अशा सर्व बांधवांना आपले समजून मदत करावी.
- पशु, पक्षी, किटक यांना शक्य तेवढे कायम खायला घालावे.
- गोसंवर्धनास, गोपालनास सहाय्य करणे, आर्थिक मदत करणे.
- वृक्ष, वनस्पती यांचे संवर्धन करणे.
- नेहमी देवयज्ञ, निदान अमावस्या व पौर्णिमेला तरी करणे.
वरील उपाय आपण श्रावणातच नाही तर इतर दिवसांतही केले तरी आपली ग्रहबाधा कायमची संपली म्हणून समजावे. पण श्रावणात केले तर याचे १०० पट फल प्राप्त होते. म्हणून श्रावण महिन्याचे खूप महत्व आहे . तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुमच्या मित्राना पाठवा . /[ श्रावणात 7 सातही दिवशी आवर्जुन करावे असे नियम ]
Chaturthi Mahatv | तर यामुळे करतात महाराष्ट्रीयन लोक चतुर्थी चा उपवास..
Ashtvinayak Lenyadri ganapti | अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती संपूर्ण माहिती
Siddhtek cha Sidhivinayak सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक अष्टविनायक गणपती संपूर्ण माहिती
Ramjanmbhumi श्री रामजन्मभूमीबद्दल संस्कृतमधील हरि-विष्णू शिलालेख काय सांगतो.