[ संक्रांतीचा उत्सव संपूर्ण माहिती ]उत्सव संक्रांतीचा :
संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणुन तर या उत्सवाला ‘मकरसंक्रांत’ असे म्हणण्यात येते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणुन त्या काळाला ‘उत्तरायण’ ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्यादेखील महत्व आहे.
संक्रांत हे मोठे धार्मिक व्रत आणि सण आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन. अशा एकूण १२ संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मोठी मानतो. संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे, या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य पुन्हा परत करत असतो असे मानतात.
सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात याचे वर्णने हेमाद्रीनी वर्णन केले आहे की, सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्रातीच्या पूर्वी आणि नंतर १६ घटीकापर्यंत असतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिकांत असते. या दिवशी कोणत्याही शुभकार्याला आरंभ केला जात नाही. सौराष्ट्रामध्ये या सणाला ‘उत्तरायण’ असे म्हणतात किंवा ‘उतराण’ म्हणतात . या दिवसानंतर सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो.
‘संक्रांत’ म्हणजे संक्रमण पुढे जाणे. आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते त्या वेळेचा हा सण आहे. संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो. भोगी क्रिकांत हा सण रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा करण्याची पध्दत आहे. संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. धनु संक्रांतीपासुन मकर संक्रांतीपर्यंच्या काळाला धनुसंक्रांत म्हणतात.
सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो म्हणून थंडी पडत असते. सूर्य मेष राशीत आला की, त्याचा प्रभाव वाढतो म्हणून गरम होत असते. मिथून राशी ही कोरडी राशी आहे. सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो, कन्येत गेला की पाऊस संपतो,
दिवसभर उकाडा व रात्री थंडी अशी स्थिती असते, त्यालाच आपण ‘ऑक्टोबर हीट’ म्हणत असतो.सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात. मकर संक्रांतीच्या वेळेस किरण लंबरूपाने पडायला लागतात. [संक्रांतीचा उत्सव संपूर्ण माहिती ]
![संक्रांतीचा उत्सव संपूर्ण माहिती](https://guruofwisdom.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-11-at-6.52.16-PM-1.jpeg)
मकरसंक्रांतीला चुकूनही करू नका ही कामे –
या दिवशी काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे . :
- या दिवशी सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी काहीही खाऊ नये याच्या आधी किंवा नंतर खाऊ शकतात .
- या दिवशी कोणतेही अन्न दान असेल तर नक्कीच केले पाहिजे ते तुम्हाला खूप पुण्याकरक ठरते .
- या दिवशी जो काही नैवेद्य असतो तो पूर्णपणे कांदा , लसूण विरहीत असावा किमान या दिवशी तामसिक भोजन बनवू नये . सात्विक भोजन बनवावे .
- या दिवशी सुगडामध्ये भरायचा जो ववसा असतो , फुले असतात तो भोगीच्या आदल्या दिवशी तोडला गेला पाहिजे त्या दिवशी झाडाचे तोडून काही आणू नये . विकत आणायचे असल्यास कधी ही आणले तरी चालेल .
- या दिवशी आपल्याकडून बोलण्यात होणाऱ्या कळत नकळत चुका टाळा कारण हा सण आपल्या नात्यामध्ये गोडवा आणणार असावा कटुता असणार नसावा .एकमेकांशी नेहमी संयमाने आणि प्रेमाने वागावे .कोणाशीही भांडणे , वाद ,क्लेश झालेले असतील तर ते मिटवले गेले पाहिजे . म्हणून या दिवशी आनंदी रहाण्यासाठी प्रयत्ंन करावे .
- या दिवशी सुवासीनी स्त्रीया वाण देतात व घेतात अशी पध्दत आहे.
![[ संक्रांतीचा उत्सव संपूर्ण माहिती ]उत्सव संक्रांतीचा :](https://guruofwisdom.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-11-at-4.55.11-PM-1-2.jpeg)
भिष्म उत्तरेकडील स्वर्गद्वारे उघडेपर्यंत शरपंजरी पडून राहिले व तद्नंतर देह सोडला म्हणून या दिवशी पितर, सवाष्ण जेवायला घालतात. आर्यांनीच सूर्यांचे शक्तीमुळे विश्वातील सर्व कारभार चालू असल्याचा शोध लावला. सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वामित्राला स्वतः सूर्याने विश्वाच्या कल्याणासाठी दिला होता .
त्यांनीही तो स्वत: जवळ न ठेवता तमाम मानव जातीस देऊन संबंध विश्वाचे मित्रत्व व भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवला. सूर्य हा संबंध विश्वाचा खरा निरपेक्ष मित्र आहे. त्याच्या पूजेचा हा दिवस आणि याच आदर्शातून मित्रत्वाची वाढ व्हावी म्हणून या दिवशी मोठ्यांनी लहानास तिळगूळ देऊन स्नेह व गोडी तत्वरूपाने करतात.
कोणार्क येथे फार मोठ्या रथावर बसलेल्या सूर्याचे मंदीर आहे. अरुणाचल, मेघालय अशी सूर्याच्या संबंधीत नावे भारतातील प्रदेशांनाच आहे. यादिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्ये, फळे (ओला हरबरा, बोर, ऊस) वगैरे लुटण्याची पध्दत देशकाल परत्वे पडली आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या नावानेसाजरा करतात.
भारतीय संस्कृतीत स्त्रिया या उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग म्हणजे लाल असलेले कुंकू माथी लावतात. त्यामुळेही हा सूर्याचा सण मानतात. या दिवशी केंद्रावर किंवा घरोघरी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ करतात. तसेच तिसरा डोळा किंवा सूक्ष्मबुद्धिचे उगमस्थान असते. तसेच ध्यानयोगात सूर्यज्योत प्रगट होते. त्यांचीच बाहेरून प्रतिकात्मक पूजा, सतत स्मरण म्हणुनही हळदकुंकू, गंध हिंदू संस्कृतीत लावतात.
सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रावर “सा विद्या या विमुक्तये” या आर्य संस्कृतीतील ब्रीदाचे पालन करतांना, गायत्री मंत्रापासून अनेक मंत्र महत्वाची स्तोत्र, ग्रंथ वाचण्याची पध्दती अनेक दुर्लभ उतारे, दृष्टी, तोडगे, अती आजारातील उपचार, वाढदिवसाची भारतीय पध्दती यांचे सुबोध संकलन असलेले नित्यसेवा, नावाचे अनमोल भांडार लुटले जाते. ज्ञानदानासारखे श्रेष्ठ दान कुठलेच नाही हे वरील विवेचनावरून सर्वाना समजावे या शिवाय ऐपतीप्रमाणे स्वामीचरित्र, दुर्गासप्तशती श्री गुरूचरित्र, विवाहसंस्कार, ज्योतीषशास्त्र, माळ, क्षात्रधर्म, आयुर्वेद, मराठी अस्मिता असे ग्रंथ व पुस्तक उपलब्ध आहे याचे त्या दिवशी दान करावे. सर्व सेवा केंद्रात प्रत्येकाने आणलेला तिळगुळाचा नैवेद्य दाखवुन या विश्वाचे चालक, पालक, मालक श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणुन तिळगुळ वाटतात. रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकु केव्हाही करतात.
संक्रातीचे हळदीकुंकू –
-
मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांती नंतरच्या दुसऱ्या दिवसापासुन रथसप्तमीपर्यत हळदीकुंकुवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो. सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात सुवासीनींनी वाण लुटायचे असते. याचे सामाजिक महत्वही आहे.
-
या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना, इष्ट सोयरे मैत्रीणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपुस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करता येतात. आपल्या ऐपतीनुसार वाण लुटता येते. विनाकारण पैशाचा बडेजाव करू नये.
-
पूर्वीच्या काळी खेड्यांमध्ये शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या ओंब्या, बोरे, ऊसाचे तुकडे, गाजर, हरभऱ्याचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जात असे. पेशव्याच्या काळात हळदकुंकवाचा कार्यक्रम बायकांमार्फत पेशवे करून घेत असत त्यामुळे चांगले संबंध प्रस्थापित करून आपआपसातली बंडाळी मोडून काढीत असत. यासाठी गोपीकाबाईंनी केलेले हळदीकुंकु प्रसिध्द आहे.
-
कोणतीही वस्तू देण्यापेक्षा आपण आजच्या काळाची गरज ओळखुन लोकांना संस्कारीत केले पाहिजे. प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून देईल, माणुसकी व ईश्वरसेवा घराघरात रूजवेल असे अल्पमोली बहुगुणी घ्यायला सर्वाना निश्चित आवडेल. हणुन या संक्रातीला आपण सर्व सेवेकरी महिलांनी केंद्रात असो वा घरी हळदीकुंकवासाठी आपल्या केंद्राचे छापील साहित्य, दिनदर्शिका, आयुर्वेद उत्पादने, शुभ अशा ५ वनस्पतींचे (पांढरी रूई, जास्वंद, कण्हेर, शेवंती, भुईरिंगणी) वाण लुटावे.
-
आपल्या मार्गाच्या सर्व ग्रंथातून, दिनदर्शिकेतुन, श्री स्वामी सेवा मासिकातून गृहस्थ जीवनाचे मार्गदर्शन दिले आहे. आध्यात्मिक प्रश्नांचे संसारातील अडचणींचे योग्य उपाय दिले आहेत बालसंस्कार, पालकसंस्काराचे उत्तम कार्य ही ग्रंथसंपदा सातत्याने करीत आहेत. म्हणुन त्यांना सौभाग्यवान रूपात सेवेकरी नसलेल्या असलेल्या घरात पोहचवणे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ मार्गाचा प्रचार होईल व ज्ञान प्राप्त होईल. बाजारातल्या महागड्या व निरूपयोगी वस्तू न आणता आपले साहित्य मनामनापर्यंत पोहचविणे आद्य कर्तव्य आहे. जेणेकरून •
-
महाराजांच्या प्रचार प्रसार कार्याला हातभार लागेल असेच दान द्यावे. अशा दानाचे महत्व प.पु.गुरुमाऊलींनी सांगितले आहे.
या उत्सवात तीळाच्या लाडवांना अत्यंत महत्व मिळाले त्याचे नैसर्गिक कारणही आहे. निसर्ग ऋतुनुसार फळे व वनस्पती देतो. ज्या ऋतुत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना * असते त्या ऋतुत या रोगानुसार औषधी वनस्पती फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. रक्तवहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. तीळात स्निग्धतेचा गुण आहे व गुळ हा उष्ण मानला जातो, त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते. घरात शेतातून ताजे तीळ आलेली असते म्हणुन या दिवशी तिळगुळ खातात.
-
शेतकरी या दिवशी शेतात सीतामातेला नैवेद्य देत असतो. त्या दिवशी एक व्यक्ती जेवेल एवढे अन्न शेतात मधोमध खड्डा करून टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी. की माझे तू घे, तुझे मला दे.’ अशा पध्दतीने संक्रांतीसण साजरा करतात व या दिवशी तिळगुळ देऊन म्हणतात.- “तिळगुळ घ्या गोडगोड बोला !
रथ सप्तमी –
रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे. या दिवसाला सूर्याचे महत्त्व आहे. कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज आहे. यासाठी यासूर्य नवरात्रीची प्रथा आहे. संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत सूर्याचे पूजन अर्चन, दान, धर्म, अर्घ्य, गंगास्नान केले जाते. सूर्याच्या पूजेने, आराधनेने, दर्शनाने, सौरस्नानाने अनेक व्याधी, रोग नाहीसे होतात. डोळ्यांचे, त्वचेचे, हाडांचे आरोग्य सुधारते.
त्वचेचे तेज वाढते, सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार, सामर्थ्य याचे प्रतिक आहे. आपल्या जीवनातील अज्ञान, अंधार तो नाहिसा करतो. त्याची कृपा, सातत्य, परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा हे उद्दीष्ट आहे.
सूर्य हा सर्व प्राणीमात्रांचा प्राणदाता आहे, त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते, वृक्षवेली वाढतात, सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो, घाणीचा, कोंदटपणाचा वास यांचा नाश होतो. आरोग्य लाभते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हे नवरात्र साजरे करतात. यात स्तोत्र मंत्रांचे पठन करून आरोग्य, बुद्धिचे तेज वाढवितात.
सूर्य हा महान कर्मयोगी आहे. कर्मयोगाचा आदर्श, प्रेरणा देणारा आहे. निरपेक्षपणे कर्तव्य करणारा, उपकारदाता आहे. सूर्यचा हा गुण आपण शिकला पाहिजे. अनंत उपकार करूनही तो निर्विकार, नम्र आहे. विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवतेत गर्वाचा अभाव आहे, त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो. मन, बुद्धी, शरीर विकसीत होते. बुद्धी तेजस्वी, प्रतिभासंपन्न होते. सूर्यपूजा हे भावाचे द्योतक आहे. मानव जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करु शकतो? म्हणून त्याचे सूर्याला पूजनीय मानून अर्घ्य द्यावे, भाववंदना करावी व जीवनशक्ती जागृत करून कर्मयोगाचा प्रकाशपुंज होण्याचा आदर्श घ्यावा.
या सुट्ट्यात नक्की भेट द्या महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे : | Famous Ganesh Temple
अष्टविनायक व्यतिरिक्त महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने | 21 Famous Ganesh Temple
Ramnavami Facts श्रीरामांची मोठी बहीण ते लक्ष्मणाचा मृत्यू तुम्हाला माहीत नसलेले रामायणातील 9 तथ्य