श्री मकर संक्रांतीचे महत्व व पूजाची माहिती :
[संक्रांतीचे महत्व व पूजेची संपूर्ण माहिती ]मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयासाठी अतिशय महत्त्वाचा सण आहेत , यावर्षी दिनांक १४ ला भोगी, १५ ला मकर संक्रांति, १६ ला किंक्रांत हे मंगलमय सण हा तीन दिवशी साजरा करण्यात येणार आहेत .
संक्रांतीचे पौराणिक महत्त्व :-
फार वर्षापुर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देत असत . त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. यानंतर संक्रांतीदेवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य हा धनू राशीमधून मकर राशित प्रवेशा करतो, हा काळ अत्यंत पुण्यकाळ असतो.
या तीन दिवशी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना या उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो. [संक्रांतीचे महत्व व पूजेची संपूर्ण माहिती ]
मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतींनी पूजा कशी करावी:-
जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच् मकर संक्रांत हा आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची ही पारंपारिक पद्धत असते . प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यामध्ये साजरी केली जाते .
भोगी:-
दि. १४/०१/२०२४ रोजी रविवार पौष शुक्लपक्ष ४ ह्या दिवशी भोगी हा सण आहे.
ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (12 भाज्यपासून बनवलेली मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसेच घरासभोवतालचा ईतर परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली या भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी आनंदाने माहेरी येतात. कुटुंबातील सगळे जण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत या दिवशी केलेला असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवला जातो सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
श्रीसुर्यनारायण मकर राशी प्रवेश करतो :
शके १९४५ शोभन नाम संवत्सर,उत्तरायण , हेमंतऋतु , पौष शु (४) दि-१४/०१/२०२४ रोजी रविवार शततारका नक्षत्रावर वरूयान योगावर बव करणावर उत्तररात्री २६:४३ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. [ संक्रांतीचे महत्व व पूजेची संपूर्ण माहिती ]
मकर संक्रांती माहिती :
या वर्षीची मकर संक्रात शके १९४५ दिनांक १५/०१/२०२४ रोजी सोमवार पौष शुक्लपक्ष पंचमी
पुण्यकाल:-
संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार १५ जानेवारी २०२४
सुर्योदय सकाळीः-०७ः०४ मी पासुन ते
सुर्यास्त संध्याकाळीः- ०६ः२० मी पर्यंत आहे.
या अशा अत्यंत पुण्य काळामध्ये धार्मिक कृत्य दान धर्म इत्यादी आवर्जून करावीत. या संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे.
वस्त्र परिधाण:-
या संक्रांतिने काळे वस्त्र परिधाण केले आहे. हातात भाला घेतलेली आहे. म्हणून या संक्रांतीला आपण काळे वस्त्र घालू नये .
टिळा:-
हळादीचा टिळा लावला आहे.
वय:-
ती वयाने वृद्ध असून बसलेली आहे.
पुष्प:-
वासाकरीता दुर्वा घेतलेला आहे.
आहार:-
चित्रान्न भक्षण करीत आहे व मोती अलंकार धारण केले आहे.
संक्रांति ही जातीने सर्प आहे.
तिचे वारनांव ब्राह्नण असून नाक्षत्रनाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त १५ आहेत.
दिशा:-
ही संक्रांत उत्तरे कडून दक्षिणे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे.
संक्रांत ही ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होत असते व ज्या दिशेकडे जात असते व पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख व पिडा अशी फले प्राप्त होतात.
संक्रांति पर्वकाळात स्नान , दान धर्म आदी पुण्य कृत्य केले असता त्याचे फल शतगुणित होत असते .
या पर्वकाळात जी काही दाने दिली ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात व जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होत असते .
पुजा साहित्य:- [ संक्रांतीचे महत्व व पूजेची संपूर्ण माहिती ]
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.
पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यात उसाचे काप, तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचाच अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये असा असतो .
संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवला जातो . घरासमोर अंगणात सडा घालून रांगोळी काढली जाते.
मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून हलव्याचे दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा कोणतेही फळ वाण म्हणून दिले जाते.
मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची असते .
संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे.ही प्रथा पाच वर्षाच्या आतील मुलांसाठी किंवा मुलींसाठी असते , ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यात चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटाणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक केला जातो . हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असा साजरा केला जातो . सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेत असतात .
संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी कीक्रांत असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणते ही काम करायचे नसते .
किंक्रांत माहिती :-
दि १६/०१/२०२४ रोजी मंगळवार
पौष शु ६ ला दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नसतात ह्या दिवशी अजुन किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.आणि संक्रांतीचा आनंद लुटतात
यंदा १५ जानेवारीला मकर संक्रांत आहे
इ स १९७२ या सालापासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. तसेच सन २१०० पासून मकर संक्रांत १६ जानेवारीला येईल. तर ३२४६ मध्ये मकर संक्रांत चक्क १ फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी मजेदार माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासकाची यांची आहे असे समजते .
त्यामुळे मकर संक्राती पुण्यकाळ यावेळी १४ जानेवारी रोजी आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे . मकर संक्रांती ही साधारणतः १४-१५ जानेवारीलाच येते. सुर्याने एकदा जर मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास, नऊ मिनिटे व दहा सेकंद असा कालावधी त्याला लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या वर्षी `लीप वर्ष’ धरले जात नाही. आणि त्या कारणामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो, अशी माहिती आपणास मिळते .
सन १८९९ मध्ये मकर संक्रांती ही १३ जानेवारीला आली होती. सन १९७१ पासून सन निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे सरकत सरकत ३२४७ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार असल्याचे समजते .
मकर संक्रांती ही वाईट नसते. `संक्रांत आली’ हा शब्दप्रयोगही आपण कायम चुकीच्या अर्थाने वापरत असतो. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करत असतो . मकर संक्रांतीच्या वेळी काहीही अफवा पसरवितात त्यावर कृपया आपण विश्वास ठवू नये , तसेच अफवा पसरवू नये सर्वानि आनंदाने हा सन साजरा करावा .
सर्व सुवासिनिना हळदी कुंकू समारंभ रथ सप्तमी पर्यंत करता येतो .
संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:-
या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक बघा -.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।
( मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवांला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान करण्याची अशी प्रथा आहे.
शास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो .आणि या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनूसार काही उपाय करावेत. या उत्तरायणात राशीनूसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही नक्कीच मालामाल व्हाल.
मेष –
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तीळ आणि मच्छरदानीचे दान करावे.
वृषभ –
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे.
मिथुन –
या राशीचा स्वामी बुध आहे. हिरवे कापड, तीळ, मच्छरदानीचे दान करावे.
कर्क –
या राशीचा स्वामी चंद्र आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी शाबूदाणा आणि लोकरीचे वस्त्र दान करावे.
सिंह –
या राशीच स्वामी सूर्य आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी माणिक , लाल कापड, लाल फूल , गुळ , सोने, तांबे, गहू,चंदन दान कले पाहिजे .
कन्या –
या राशीचा स्वामी बुध आहे, राशीच्या स्वामी ग्रहानुसार तेल, उडीद, तिळाचे दान करावे.
तूळ –
या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, रुई, वस्त्र, तांदूळ दान करावेत.
वृश्चिक –
या राशीचा स्वामी मंगळ आहे. गरिबांना तांदूळ खिचडी, कोणतेही धान्य दान करावे.
धनु –
या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी तीळ व हरभ-याची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल.
मकर –
या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांना तिळ, तेल, काळी गाय, काळे वस्त्र यांचे दान करावे.
कुंभ –
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे. त्यामुळे या राशीच्या तीळ, साबण, वस्त्र, कंगवा आणि अन्नदान करावे.
मीन –
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी मध, केशर, हळद, पिवळे वस्त्र यांचे दान करावे.
या सुट्ट्यात नक्की भेट द्या महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे : | Famous Ganesh Temple
Shree Swami samarth adhyatmic marg[कमला एकादशीचे महत्व 11 ऑगस्ट 2023] |