“हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी “

श्री हरीतालिका पूजन !!☆

भाद्रपद मधील शुध्द तृतीयेचे हरीतालिका हे व्रत कूमारीकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतीराज दिर्घायूषी , आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जुन करायाला हवे असा आपल्याकडे प्रघात फार पूर्वीपासून आहे. [“हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी “]

"हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी "
“हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी “

आपल्याला माहीत नसेल की हरितालिका हे एक माता पार्वती मातोश्रींचेच एक नाव , त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने आणि अत्यंत खडतर अशी तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले.,याचीच आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते..

● या व्रताचे दिवशी सूर्योदयाआधी उठून अभ्यंग तेल व उटण्याने स्नान केले जाते .

● शूभ्र वस्त्र परीधान करावे…

● उगवनार्या सूर्यनारायणांकडे पाहून अर्घ्य देऊन पुढील मंत्र उचचार करत ‘ ओम असवादित्य ब्रह्म ‘ म्हणत स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा घालाव्या.

● आपल्या घरातील देवपूजा तसेच नित्यसेवा पूर्ण करावी आणि पूजेची मांडणी पुढील प्रमाणे करावी.

श्री हरीतालिका पूजन संपूर्ण व्रत विधी 2024
श्री हरीतालिका पूजन संपूर्ण व्रत विधी 2024
पूजेची मांडणी :

■ पूजेसाठी जी जागा आहे ती झाडून व गोमूत्राने स्वच्छ व साफ पूसून घ्यावी तसेच सर्वत्र गोमूत्र शिंपडावे.

■ स्वच्छ आशा त्या जागेवर बेलपत्रे आणि रांगोळी काढून त्यावर चौरंग ठेवावा त्यावर पांढरे सूती किंवा रेशमी वस्त्र अंथरुन त्याच्या मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी..,

■ त्या पिंडीच्या बरोबर अगदी पूर्वेला अशी एक दूसरी छोटी पिंड किंवा देवीच्या आकारातील मातीची प्रतिमा जणू श्री हरितालिका/श्री पार्वती मातोश्रींची स्थापना करावी.

■ छोट्या पिंडीच्या समोर दोनही बाजूंना 2 शाळूंका (श्री जया व श्री विजया) देखील तयार कराव्यात.

■ त्यानंतर तेथे महादेवांच्या या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर श्री गणेशांची मूर्ती नसेल तर सूपारी दोन्ही पैकी एक ठेवावी तसेच श्री गणपतीं च्या समोर एका छोट्या वाटीत गूळखोबरे नैवेद्य ठेवावे.

■ त्यांनंतर आपल्या गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी तसेच डाव्या बाजूला शंख ही ठेवावा.

■ आशा प्रकारे तेथे मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची ( पुस्तक )पोथी ठेवावी.,पूजेभोवती रांगोळी काढावी…

■ अष्टगंध , अक्षता , भस्म , हळदी-कुंकु , पूजनाची फूले , पत्री , दूर्वा , निवडलेले बेलपत्र – 130 , धूप , शूध्द तूपाचे निरांजन , खडीसाखर , तांब्याचा तांब्या , ताम्हण , पळी , पेला , विड्याची पाने , खारीक , बदाम , सूपारी , सूटी नाणी , यथाशक्ती दक्षिणा , खण ,गळेसरी , बांगड्या इ. साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे.. [श्री हरीतालिका पूजन संपूर्ण व्रत विधी 2024]

पूजनाचा क्रम

■ श्री स्वामी स्तवन वाचन

■ मंगलतिलक

” ओम भद्रं कर्णेभि: ” हा शांतीमंत्र म्हणत कपाळाला हळदी-कुंकू लावावे…

■ आचमन

आचमन करण्यासाठी प्रथम पुढील 3 नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे.

1) ॐ केशवाय नमः !
2) ॐ नारायणाय नमः !
3) ॐ माधवाय नमः !

तसेच पूढील दोन नावे म्हणत पाणी हे सरळ हाताने ताम्हणात सोडावे.

4) ॐ गोविंदाय नमः !
5) ॐ विष्णवे नमः !

पूढील नावे ही लक्ष्यपूर्वक म्हणावी.

6) ॐ मधूसूदनाय नमः !
7) ॐ त्रिविक्रमाय नमः !
8) ॐ वामनाय नमः !
9) ॐ श्री धराय नमः !
10) ॐ ऋषीकेषाय नमः !
11) ॐ पद्मनाभाय नमः !
12) ॐ दामोदराय नमः !
13) ॐ संकर्षणाय नमः !
14) ॐ वासूदेवाय नमः !
15) ॐ प्रद्यूम्नाय नमः !
16) ॐ अनिरुद्धाय नमः !
17) ॐ पूरूषोत्तमाय नमः !
18) ॐ अधोक्षजाय नमः !
19) ॐ नारसिंहाय नमः !
20) ॐ अच्यूताय नमः !
21) ॐ जनार्दनाय नमः !
22) ॐ उपेन्द्राय नमः !
23) ॐ हरये नमः !
24) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः !

■ प्राणायाम्

गायत्री मंत्र म्हणत 1 प्राणायाम करावा..

गणपतींचे पूजन :–

श्री गणेशांना ” ॐ गं गणपतये नमः ! ” या मंत्राचा जप करत गूळ-खोबर्याचा नैवेद्य दाखवून हात जोडून नमस्कार करावा .

■■ श्री वालूका शिवलिंगांचे पूजन■■

प्राणप्रतिष्ठा :—

एक बेलपत्र तूपात बूडवून शिवलिंगावर ठेवावे..
डोळे मिटून एकाग्रचित्ताने 15 वेळा “ॐ” म्हणावा..

ध्यान :—

( हात जोडून खालील ध्यान म्हणावे..)

“ॐ पीतकौशेय वसनां हेमाभां कमलासनाम् !
भक्तानां वरदां नित्यं पार्वतीं चिंतयाम्यहम् !!”

“विधाय वालूकालिंगम् अर्चयंतीम् महेश्वरम् !
“पूर्णेन्दुवदनां ध्यायेध्दरितालीं वरप्रदाम् !!”

“मंदारमाला कुलितालकायै कपालमालांकित शेखराय !”
“दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय !!

” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ” ध्यायामी नमस्काराणि समर्पयामी !!

श्री हरीतालिका पूजन संपूर्ण व्रत विधी 2024
श्री हरीतालिका पूजन संपूर्ण व्रत विधी 2024
■ आवाहन :–

( खालील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना बेलपत्र वहावेत…)

” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
आवाहनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!

■ आसन :—

( खालील नाममंत्राने चौरंगावर बेलपत्र वहावे…)

” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
आसनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!

अभिषेक :—

( पुढील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना गंधाक्षता आणि फूल वाहून नमस्कार करावा… )

” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
अभिषेकार्थे गंधाक्षता पूष्पाणि समर्पयामी !!

( खालील स्तोत्र मंत्र म्हणत
फूलाने पाणी शिंपडत अभिषेक करावा…)

श्री गणपती अथर्वशिर्ष – 1 वेळा
श्री रात्री सूक्त – 1 वेळा
श्री रूद्राध्याय – 1 वेळा

” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
अभिषेकं समर्पयामि !

खालील मंत्र म्हणत दोनही वालूकालिंगांना जानवे वहावे…

” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
यज्ञोपवितं समर्पयामि !

 

☆☆☆मुख्य विशेष पूजा☆☆☆
● अथ अंगपूजनम् :—

माता पार्वती च्या पिंडीवर पुढील प्रत्येक नाममंत्राने त्या-त्या अवयवांची भावना करत अक्षता वहाव्यात.

* ॐ श्री उमायै नमः ! पादौ पूजयामि ! (पाय)

* ॐ श्री गौर्यै नमः ! गुल्फौ पूजयामि ! (पोटर्या)

* ॐ श्री पार्वत्यै नमः ! जानुनी पूजयामि ! (गूडघे)

* ॐ श्री जगध्दात्र्यै नमः ! जंघे पूजयामि ! (मांड्या)

* ॐ श्री जगत्प्रतिष्ठायै नमः ! ऊरू पूजयामि ! (ऊर)

* ॐ श्री शांतिरूपिण्यै नमः ! कटी पूजयामि ! (कंबर)

* ॐ श्री हरायै नमः ! गुह्यं पूजयामि ! (गुह्य भाग)

* ॐ श्री माहेश्वर्यै नमः ! नाभिं पूजयामि ! (नाभि)

* ॐ श्री शांभव्यै नमः ! ह्रदयं पूजयामि ! (ह्रदय)

* ॐ श्री शूलपाणये नमः ! कंठं पूजयामि ! (कंठ)

* ॐ श्री पिनाकधृषे नमः ! बाहूं पूजयामि ! (बाहू)

* ॐ श्री शिवायै नमः ! मुखं पूजयामि ! (मुख)

* ॐ श्री पशुपतिप्रियायै नमः ! नेत्रे पूजयामि ! (नेत्र)

* ॐ श्री गंगायै नमः ! ललाटं पूजयामि ! (कपाळ)

* ॐ श्री महालावण्यायै नमः ! शिरः पूजयामि ! (डोके)

* ॐ श्री सच्चिदानंदरूपिण्यै नमः ! सर्वांगं पूजयामि ! (सर्व अंग)

अथ पत्री पूजनम् :—

आपण बनवलेल्या माता पार्वती च्या पिंडीवर खालीलप्रमाणे मंत्र म्हणून पाने / पत्री वहावीत.

* ॐ अशोकाय नमः ! अशोक पत्रं समर्पयामि ! (अशोकाचे पान)

* ॐ जगध्दात्र्यै नमः ! धात्री पत्रं समर्पयामि ! (आवळीचे पान)

* ॐ माहेश्वर्यै नमः ! दूर्वांकूरान् समर्पयामि ! (दूर्वा)

* ॐ कपर्दिन्यै नमः ! करवीर पत्रं समर्पयामि ! (कन्हेराचे पान)

* ॐ कपालधारीण्यै नमः ! कदंबपत्रं समर्पयामि ! (कदंबाचे पान)

* ॐ पार्वत्यै नमः ! ब्राह्मी पत्रं समर्पयामि ! (ब्राह्मीचे पान)

* ॐ धूर्जटायै नमः ! धत्तूर पत्रं समर्पयामि ! (धोत्र्याचे पान)

* ॐ त्रिपूरांतकायै नमः ! अपामार्ग पत्रं समर्पयामि ! (आघाड्याचे पान)

* ॐ सर्वेश्वर्यै नमः ! नानाविध पत्राणि समर्पयामि ! (पंचपल्लव)

"हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी "
“हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी “
अथ पूष्प पूजनम् :—

माता पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे मंत्र म्हणत फूले वहावीत.

* ॐ चतुर्वर्गप्रदायै नमः ! चंपक पुष्पं समर्पयामि ! (चाफ्याचे फूल)

* ॐ बुध्दिप्रियायै नमः ! केतकी पुष्पं समर्पयामि ! (केवडा)

* ॐ कौमार्यै नमः ! करवीर पुष्पं समर्पयामि ! (कण्हेराचे फूल)

* ॐ कुमार्यै नमः ! बकुल पुष्पं समर्पयामि ! (बकुळीचे फूल)

* ॐ धनदायै नमः ! धत्तूर पुष्पं समर्पयामि ! (धोतर्याचे फूल)

* ॐ शांभव्यै नमः ! शतपत्र पुष्पं समर्पयामि ! (सूर्यफुल)

* ॐ चामुण्डायै नमः ! पद्मं समर्पयामि ! (कमळाचे फूल)

* ॐ जगध्दात्र्यै नमः ! जपाकुसुमं समर्पयामि ! (जास्वंदाचे फूल)

* ॐ माहेश्वर्यै नमः ! मल्लिका पुष्पं समर्पयामि ! (मोगर्याचे फूल)

* ॐ मेरूमंदारवासिन्यै नमः ! मांदार पुष्पं समर्पयामि ! (पांढर्या रूईचे फूल)

● आपण बनवलेल्या महादेवांच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तरशत नामावली म्हणत 108 बेलपत्र अर्पण करावे अष्टरोत्तर नामवलीचा विडियो आपण पाहू शकता

3) दोनही आपण बनवलेल्या वालूका लिंगांना खालील मंत्र म्हणत धूप ओवाळावा.

“ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”

धूपं आघ्रापयामि !

4) दोनही आपण बनवलेल्या वालूका लिंगांना खालील मंत्र म्हणत शूध्द तूपाच्या निरांजनाने ओवाळावे…

“ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”

दिपं दर्शयामि !

5)आपल्या दोनही त्या वालूकालिंगांना फळे व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच
विडा , दक्षिणाही अर्पण करावी…

“ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”

नानाविध फलानी शर्करा खंड खाद्यानी नैवेद्यं समर्पयामि !

पूगीफलं स तांबूलं तथाच दक्षिणां समर्पयामि !

श्री हरीतालिका व्रताची कथा वाचावी…

पूढील प्रत्येक मंत्र म्हणत अर्घ्य आपल्या उजव्या हाताने ताम्हणात सोडावे..

1) ॐ शिवरूपे शिवे देवि शंकर प्राणवल्लभे !
उमे सर्वार्थदे देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!

“ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
इदमर्घ्यं समर्पयामि !

2) ॐ नमस्तेsस्तु मृडानीश अपर्णा प्राणवल्लभ !
भक्त्याssनीतं मया हीदं गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!

“ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
इदमर्घ्यं समर्पयामि !

3) ॐ व्रतसंपूर्ति सिद्धयर्थं यथाशक्ती मयाssह्रतम् !
आलिभि:सहिते देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!

“ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
इदमर्घ्यं समर्पयामि !

■ हात जोडून मनोभावे पूजा करून झालेल्या चूकांबद्दल क्षमा मागावी…

■ खालील प्रार्थना म्हणावी…

हरितालिके नमस्तेsस्तु सशिवे भक्तवत्सले !
संसारभय भीताsहम् त्वमेव शरणं मम !
जन्मजन्मनि सौभाग्य मक्षय्यं देहि मेsव्ययम् !!

● सायंकाळी पूजेसाठी धूप दिप दाखवून दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.

● दूसर्या दिवशी पूजा विसर्जन साठी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोनही वालूकालिंगांना गंध , भस्म , अक्षता , हळदी-कुंकु , फूले व बेलपत्र वहावेत ;
धूप , दिप ओवाळून दही आणि भाताचा नैवेद्य दाखवावा.

●त्यानंतर श्री गणपतींची , श्री हरितालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी.
आरतीनंतरआपण स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा आणि मंत्रपूष्पांजली म्हणून फूले-बेलपत्र दोनही वालूकालिंगांवर अर्पण करावी…

● विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दहीआणि भाताच्या एकत्र नैवेद्यासह सर्व पूजा कोणत्याही पण्याच्या प्रवाहात विसर्जीत करावी.

● आणि शेवटी पतीराजांचे पाद्यपूजन करून उपवास सोडावा..[श्री हरीतालिका पूजन संपूर्ण व्रत विधी 2024]

 

 

Chaturthi Mahatv | तर यामुळे करतात महाराष्ट्रीयन लोक चतुर्थी चा उपवास..

संस्कृत तसेच मराठी गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ | Ganapati Athrvashirsh Meaning

भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India

 

 

 

 

 

Leave a Comment

EMAIL
Facebook