8 most effective Pranayamsअत्यंत महत्वाचे योग |मुख्य आठ प्राणायाम कोणते ? | हे प्राणायाम बदलतील तुमचे आरोग्य

8 most effective Pranayams प्राणायामाच्या आठ संपुर्ण प्रक्रियाँ :

प्राणायामाच्या वेगवेगळ्या विधि शास्त्रांमधे सांगितलेल्या आहेत आणि प्रत्येक प्राणायामाचं विशेष असे महत्व आहे परंतु सर्व प्राणायामांचा अभ्यास दररोज न चुकता केला गेला पाहिजे तरच आपल्याला त्याचे असंख्य लाभ दिसतील . चला तर मग जाणून घेऊया हे आठ प्राणायाम  केल्याने काय बदल होतील तुमच्या शरीरात :

  • वात, पित आणि कफ, ह्या तिन्ही दोषांचं संतुलन होते.
  • पाचनतंत्र पुर्णपणे चांगलं होतं आणि पोटाचे समस्त रोग दूर होतात.
  • हृदय, फुफ्फुस आणि मस्तिक (मेंदू) संबधी सर्व रोगदूर होतात मोटापा, मधुमेह, कॉलेस्ट्रॉल, अपचन, आमलपित, श्वसन रोग, एलर्जी, माइग्रेन, रक्तदाब, किडनीचे रोग, पुरूष आणि स्त्रियांचे संपुर्ण यौन रोग, सामान्य रोगा पासून ते कँसर पर्यंत सर्व साध्य असाध्य रोग बरे होतात.
  • रोग-प्रतिरोधक क्षमता अत्याधिक चांगली विकसित होते .
  • अनुवांशिक डायबटीज आणि हृदयरोग इत्यादींपासून बचाव केला जाऊ शकतो.
  • केस गळणे आणि पांढरे होने, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, नेत्रज्योतीचे विकार, स्मरण शक्ती कमी होणे इत्यादी टाळता येऊ शकतात , म्हणजे वृद्धावस्या उशिरा येईल आणि आयुष्य वाढेल.
    चेहऱ्यावर तेज आणि शांती येईल.
  • चक्रांच्या शोधन, भेदण आणि जागरणाने अध्यातमिक शक्तीची कुंडलिनी जागरण प्राप्ती होईल.
  • मन अत्यंत स्थिर, शांत, प्रसन्न आणि उत्साहित राहील. निराशे सारख्या रोगांपासून दूर राहता येईल.
  • ध्यान आपोआप लागेल आणि अनेक तास ध्यान करण्याचा सामर्थ्य प्राप्त होईल.
  • स्थूल आणि सूक्ष्म देहाचे समस्त रोग आणि काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार इ दोष दूर होतात.शरीरातील सर्वविकार, विजातीय तत्व, टॉक्सिन्स नष्ट होतात.
  • नकारात्मक विचार समाप्त होतात आणि प्राणायामाचा अभ्यास करणारी व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार, उर्जा आणि आत्मविश्वास यांनी भरपूर असते.
8 most effective Pranayams

Table of Contents

प्रथम प्रक्रियाः भस्त्रिका प्राणायाम (8 most effective Pranayams)

” भस्त्रीका म्हणजे काय तर एखाद्या ध्यानोपयोगी आसनात सोयीनुसार बसून दोन्ही नसिकांनी श्वास पुर्ण आत डायाफ्रामपर्यंत भरणं आणि बाहेर सहजपणे सोडणं याला भस्त्रिका प्राणायाम म्हणतात. “
भस्त्रिके च्या वेळी आपल्या मनामध्ये असा शिवसंकल्प करावा –
भस्त्रिका प्राणायामात श्वास आत मधे घेतांना मनात विचार (संकल्प) करायाला पाहीजे की, ब्रहमांडातील विधमान दिव्य शक्ती, उर्जा, पवित्रता, शांती आणि आनंद इत्यादी जे काही शुभ आहे ते प्राणाबरोवर माझ्या देहात येत आहे. मी दिव्य शक्तींनी भरून जात आहे. अशाप्रकारे दिव्य संकल्पाबरोबर केलेला प्राणायाम विशेष लाभदायक असतो.

भस्त्रिका प्राणायामाची वेळ:

अडीच सेंकदात श्वास आतमधे घेणं आणि अडीच सेंकदात श्वास, एक लयेनं वाहेर सोडणं. अशा प्रकारे न थांबता एका मिनिटांत १९ वेळा भस्त्रिका प्राणायाम होतात. एका वेळा भस्त्रिका प्राणायाम पाच मिनिटं करायला पाहीजे. सुरूवातीळा थोडं थांबवं लागेल. जवळपास एका आठवडयात सतत पाच मिनिटं न अडखळता अभ्यास होऊ शकतो.
निरोगी आणि सामन्य रोगग्रस्त व्यक्तींना दररोज ५ मिनिटं भस्त्रिकेचा अभ्यास करायला पाहीजे. कैंसर, लंग फाइब्रोसिस, मस्क्यूळर, डिस्ट्रॉफी. एम. एस., एस.एल.ई. आणि इतर असाध्य रोगांमधे दहा मिनिटां पर्यंत अभ्यास करायला पाहीजे.

भस्त्रिका एक मिनियत १२ वेळा, अशा प्रकारे पाच मिनिट त ६० वेळा करता येते. कॅसर सारख्या असाध्य रोगांत २ भागांत केल्यावर १२0 वेळा प्राणायाम होते. सामन्यतः प्राणायाम काहीही न खाता केलं तर ते अधिक उत्तम आहे. काही कारणांनी जर सकाळी प्राणायाम करू शकत नसलातर दुपारच्या जेवणानंतर पाच तासांनंतर प्राणायाम करता येतो.

ज्यांना असाध्य रोग झाला आहे अशा रोग्यांनी जर सकाळ-संध्याकाळ २ वेळा प्राणायाम केला तर लवकरच अधिक लाभ होईल.

अशीच नावीन्यपूर्ण माहिती पाहणयासाठी आमच्या यूट्यूब चॅनल ला विजिट करा
 
भस्त्रिका प्राणायमाचे चे काही नियम :
  • ज्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग आहे, अशाव्यक्तींनी जलद वेगात भस्त्रिका करू नये.
  • हा प्राणायामा करत असताना जेव्हा श्वास आतमधे घेता तेव्हा पोट फुगवू नये . फासळ्यापर्यंत छातीच फुगेल. श्वास डायाफ्राम पर्यंत भरावं त्यामुळं पोट फुगणार नाही,
  • ग्रीष्म ऋतूत हा प्राणायाम सावकाश करा.
  • कफ अधिक झाल्यामुळे किंवा आईनस इत्यादी रोगांमुळे ज्यांचे दोन्ही नसीका छिद्र व्यवस्थित पणे उघडत नाहीत त्या लोकांसाठी अगोदर उजव्या स्वराला बंद करून डाव्या स्वरानं रेचक आणी पूरक करावं आणि नंतर डाव्या स्वराला बंद करून उजण्या स्वरानं शक्य तितक्या मंदपणे, मध्यम किंवा तीव्र गतिनं रेचक आणि पूरक करायला पाहीजे. शेवटी दोन्ही स्वर इडा आणि पिंगळानं रेचक पूरक करत भस्त्रिका प्राणायाम करावं. ह्या प्राणायामाला दररोज पाच मिनिटं करावं. प्राणयामाच्या क्रिया करत असताना डोळे बंद ठेऊन, मनात प्रत्येक श्वासाबरोबर ओऊम याचं मानसिक रूपानं चिंतन आणि मनन करावं.
भस्त्रिका प्रणायमाचे चे लाभ :
  • सर्दी-पडसे, श्वसनरोग, दमा, जुना नजला, साइनस इत्यादी सर्व कफ रोग दूर होतात. फुफ्फुस बलवान होतात आणि हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायु मिळाल्यामुळे आरोग्य लाभ होतात.
  • थायरॉयड आणि टॉन्सिल इत्यादी गळयाशी संबधित सर्व रोग दूर होतात.
  • त्रिदोष सम होतात. रक्त परिशुद्ध होते आणि शरीराचे विषाक्त, विजातीय द्रव्यांचं निवकासन होते.
  • प्राण आणि मन स्थिर होतात. हे प्राणोत्थान आणि कुण्डलिनी जागरणात सहायक आहे.

द्वितीय प्रक्रिया : कपाळभाति प्राणायाम (8 most effective Pranayams)


कपाळ चा अर्थ होतो मस्तिष्क आणि भाति याचा अर्थ होतो दीप्ती, आभा, तेज , प्रकाश इत्यादी. म्हणजेच जो प्राणायाम केल्यामुळे मस्तिकावर (कपाळावर) आभा, ओज आणि तेज वाढते ते प्राणायाम आहे कपालभाति. ह्या प्राणायामाचा विधि भस्त्रिके पेक्षा थोडा वेगळा आहे. भस्त्रिकेत रेचक आणि पूरक यांच्यात समानपणे श्वासच्छोवास वर दबाव टाकतात, तर कपाळभाति मधे फक्त रेचक अर्थात श्वास बाहेर सोण्यावरच पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात येतं.

श्वास भरण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत, साहजिकच श्वास आतमधे जातो, आणि जाऊ देण्यात येतो, पुर्ण एकाग्रता श्वास बाहेर सोडण्यातच आहे. हे करत असताना स्वाभाविकपणेच पोटात आकुंचन आणि प्रसारणच्या क्रिया होतात आणि मुळाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्र यांच्यावर विशेष व भर पडतो.


कपालभातिच्या वेळी शिवसंकल्प :


कपालभाति प्राणायाम करत असताना मनात हा विचार आणायाला पाहीजे की मी श्वास बाहेर सोडत आहे, ह्या इच्छावासाबरोबरच माझ्या शरीरातील सर्व रोग बाहेर पडत आहेत .

ज्यांना जे शारिरीक रोग असतील, दोष, विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, ईष्या, राग, द्वेष इत्यादी बाहेर सोडण्याची इच्छा ठेवत रेचक करायला पाहीजे. अशाप्रकारे रोग नष्ट होण्याचा विचार श्वास सोडताना केल्यामुळे विशेष लाभ होतात.


कपालभाति प्राणायामाची वेळ :


एका सेंकदात एका वेळा श्वास लयेनं सोडणं आणि सहजपणे ध्यायला पाहीजे. न थांबता एका मिनिटात ६० वेळा आणि पाच मिनिटात ३०० वेळा कपालभाति प्राणायाम होते. अधिक आजारी असलेली किंवा अशक्त व्यक्ती सुरूवातीच्या २-३ मिनिटातच शकते. परंतू १० ते १५ दिवसांत प्रत्येक मिळवू शकते. एका वेळा कपालभाति ५ मिनिटांचीच असायला पाहीजे.

याच्यापेक्षा कमी केल्यामुळे पुर्ण लाभ प्राप्ती होऊ शकणार नाही. दीर्घकाळा पर्यंत कपाल भाति करत-करत सामर्थ्य वाढल्यामुळे पंधरा मिनिटांपर्यंत कपालभाति करू शकते. निरोगी आणि सामान्य रोग ग्रस्त व्यक्तीनं कपालभाति १५ मिनिटं करावं. १५ मिनिटात ९ वेळा केल्यामुळे १०० वेळा कपालभाति होते.
कॅसर, एडस्, हेपेटाईटस, पांढरे डाग, सोरायसिस, अत्याधिक मोटापा, इन्फर्टीलिटी, गर्भाशय, ओवरी, ब्रेष्ट किंवा शरीरात कुठेही गाठ झाल्यावर आणि एम.एस. आणि एस.एल.ई सारख्या असाध्य रोगांनी ग्रस्त रुग्णांनी अर्धा तास कपालभाती करावं.

असाध्य रूग्णांनी सकाळ – संध्याकाळ दोन्ही वेळा कपालभाति अर्धा-अर्धा तास करावं. निरोगी आणि सामान्य रोगग्रस्त व्यक्तीनं दिवसातून एक वेळा प्राणायाम करणं पुरेसं आहे.

8 most effective Pranayams

कपालभाती चे लाभ :
  • मस्तिष्क आणि चेहयावर ओज, तेज, आभा आणि सौंदर्य वाढतं. समस्त कफरोग, दमा, श्वास, एलर्जी, साईनस इत्यादी रोग नष्ट होतात. हृदय, फुफ्स आणि मस्तिष्काचे (मेंदूच) सर्व रोग बरे होतात.
  • मोटापा, मधुमेह, अपचन, आम्लपित, किडनी, आणि प्रॉस्टेटशी संबधित सर्व रोग निश्चितपणे दूर होतात.
  • उपचन सारखा रोग हे प्राणायाम दररोज ५ मिनिटं केल्यामुळे बरा होतो. कोणतही औषध न घेता मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो आणि एका महिन्यात पोटाचं वाढळेळं वजन ४ ते ६ किलो पर्यंत कमी करता येतं. हृदयाच्या नाडीतले (arteries) आलेले अडथले (blocage) दूर होतात.
  • मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहते. नकारात्मक विचार दूर होतात, त्यामूळे निराशेपासून सुटका मिळते.
  • चक्रांचं शोधन आणि मुळाधार-चक्र यांच्यामुळे सहस्त्र-चक्रा पर्यंत सर्व चक्रांमधे एका दिव्य शक्तींच संचरण होऊ लागते.
  • हे प्राणायाम केल्यामुळे आमाशय, अगन्याशय, (पेन्क्रियाज, यकृत, प्लीहा, आतडे, प्रॉस्टेट, आणि किडनीचं आरोग्य विशेष करुन वाढते. पोटासाठी अनेक आसन करुन ही जे लाभ होत नाहीत ते लाभ हे प्राणायाम केल्यामुळे सर्व आसनांपेक्षा जास्त लाभ होतात. दुर्बल आतडयांना बलवान करण्यासाठी ही हे प्राणायाम सर्वोत्तम आहे.

तिसरी प्रक्रिया : बाहय प्राणायाम (त्रिंबधाबरोबर) (8 most effective Pranayams)

विधि: सिद्धासन किंवा पदमासनात विधिवत बसून श्वास एकाच वेळी पूर्णपणे बाहेर काढा. श्वास बाहेर काढून मुळबंध, उड्डीयान बंध आणि जालंधर बंध लाऊन श्वासाला शक्यतितकं बाहेरच रोखून ठेवा.जेव्हा श्वास घेण्याची इच्छा होईल तेव्हा बंधाना दुर करत घ्या.
हळू-हळू श्वास आतमधे घेऊन त्याला न थांबवताच पुन्हा पुर्वी सारय्याच श्वसन-क्रियेनं बाहेर काढा.


बाहय प्राणायामाच्या वेळी शिवसंकल्प:

हया प्राणायामात ही वरील कपालभाति प्रमाणेच श्वास बाहेर काढते वेळी सर्व विकार, दोष बाहेर जात आहेत अशा प्रकारची मानसिक चिंतन करायला हवं. विचार-शक्ती जितकी प्रबळ असेल सर्व कष्ट मितक्याच प्रबळतेनं दूर होईल हे निश्चित आहे. मनात शिव संकल्प असणं प्रत्येक व्याधिला संहारक आणि शीघ्र बरं करणारं असतं.


बाहय प्राणायामाची वेळ :
३ ने ५ सेंकदातच श्वासाला सहजतेने पूर्ण आतमधे भरणं आणि ३ ने ५ सेंकदातच सहजतेने श्वासाला बाहेर सोडून श्वास बाहेरच १० ते १५ सेंकद अडवून धरणे आणि पुन्हा ३ ते ५ सेंकदांत श्वासमधे भरून, बाहेर सोडून बाह्य प्राणायाम करणं अशाप्रकारे २० ते २५ सेंकदात बाह्य प्राणायाम पुर्ण होतं. एकी नंतर दुसरं प्राणायाम न थांबता लगेच. केलं तर उतम आहे.
सुरूवातीला जर दोन प्राणायाममधे १ ते २ सामन्य श्वास घ्यावे लागले तर घेऊ शकता. २ मिनिटांत बाह्य प्राणायाम ५ वेळा व्यवस्थितपणे होऊ शकते आणि ५ वेळा बाह्य प्राणायाम करणं पुरेसं आहे. गुदा भ्रंश, पाईल्स, फिशर, फिस्टुला, योनिभंश, बहुमुत्र, मूत्रकृच्छ आणि यौन रोगांचे रूग्ण ११ वेळा हे प्राणायाम करू शकतात. कुंडलिनी जागणाचे इच्छुक साधक आणि ऊर्ध्वरेता होण्याची इच्छा ठेवणारे साधक हे प्राणायाम जास्तीत जास्त २१ वेळा करू शकतात.

बाह्य प्रणायमाचे लाभ :
  • हे प्राणायाम हानिरहित आहे. हे प्राणायाम केल्यामुळे मनाची चंचलता दूर होते.
  • जठराग्नि प्रदीप्त होते.
  • पोटाच्या विकारांसाठी हे लाभदायक आहे.
  • बुद्धि सुक्ष्म आणि तीव्र असते.
  • शरीराची शोधक असते.
  • वीर्याची ऊर्ध्व होऊन स्वप्नदोष, शीग्रपतन इत्यादी धातु-विकार दूर होतात.
  • बाध्य प्राणायाम केल्यामुळे पोटाच्या सर्व अवयवांवर विशेष ताण पडतो आणि सुरूवातीला पोटाच्या अशक्त किंवा रोगग्रस्त भागात किचिंत त्रास होऊ शकतो. त्यामुळे, पोटाला विश्रांती आणि आरोग्य देण्यासाठी त्रिवंध-पुर्वक हे प्राणायाम करायला पाहीजे.

चौथी प्रक्रिया : उज्जायी प्राणायाम (8 most effective Pranayams)


ह्या प्राणायामात पूरक करताना गळयाला आंकुचित करता, आंकुचित करुन श्वास आतमधे भरताना, घोरताना जसा आवाज येतो तसा आवाज पूरक करताना कंठातून आवाज येतो. ध्यानोपयोगी. आसतात बसून दोन्ही नाकपुडयांनी हवा आतमधे ओढा.

कंठ थोडा संकुचित केल्यामुळे कंठात हवेचा स्पर्श झाल्याचा अनुभव येईल. हवेचं घर्षण नाकात होऊ नये. कंठात घर्षण झाल्यामुळे एक ध्वनी उतपन्न होईल. प्रारंभी, कुंभक न करता केवळ रेचकच करायला पाहीजे. पूरक केल्यानंतर हळू-हळू कुंभकाची वेळ इतकीच किंवा काही दिवस केल्यानंतर कुंभकाची वेळ पूरकच्या वेळेपेक्षा दुप्पट करा.

कुंभक दहा सेंकदा पेक्षा जास्त करायचं असेल तर जालंधर बंध आणि मुळबंध ही करा. ह्या प्राणायामात नेहमी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीनंच रेचक करायला पाहीजे.


उज्जयि प्रणायमाचे लाभ :
ज्यांना वर्षभर सर्दी, खोकला, होतो आणि ज्यांना थायरॉईड, स्नोरिंग, स्लीपएप्निया, हृदयरोग, अस्थमा, फुफ्फुस, कंठाचे विकार, टॉन्सिल, अनिद्रा, मानसिक तणाव आणि रक्तदाब, अजीर्ण, वात, जलोदर, क्षय, ज्वर प्लीहा इत्यादी रोगांवर लाभदायक आहे. गळ्याला निरोगी आणि मधूर करण्यासाठी हे नियमित करायला पाहीजे. कुंडलिनी जागरण, अजपा-जप, ध्यान इत्यादींसाठी प्राणायाम उत्तम आहे. ह्यामुळं मुलाचां बोबडेपणा दूर होतो.

पाचवी क्रिया : अनुलोम-विलोम प्राणायाम (8 most effective Pranayams)

नाकपुडया बंद करण्याचा विधी
उजवा हात उचलून उजण्या हाताच्या अंगठयाने उजवा स्वर (पिंगळा नाडी) आणि अनामिका आणि मध्यमा बोडांनी डावा स्वर बंद करा. हाताचं तळवं नाकपुडयासोर न ठेवता पार्श्वभागावर ठेवावं.

अनामिका
इडा नाडी (वाम स्वर) सोम, चंद्रशक्ती किंवा शांती यांचां प्रतीक आहे त्यासाठी, नाडी-तपासताना अनुलोम-विलोम प्राणायामाची सुरूवात डाव्या नाक पुडयानं सुरूवात करतात.

अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीनं श्वास हळू हळू आतमधे घ्या. श्वास पुर्ण मधे भरल्यावर, आणि मध्यमानं डावा स्वर बंद करून उजव्या नाकपुडीनं पुर्ण श्वास बाहेर सोडायाला पाहीजे. हळू हळू श्वाच्छो श्वासाची गती वेगवान करायला पाहीजे.

तीव्र वेगानं पुर्ण शक्तीनिशी श्वाच्छोश्वासाबरोबर गति मंद, मध्यम आणि तीव्र करा. तीव्र गतिनं पूरक, रेचक केल्यामुळे प्राणाची तेज ध्वनी होते. श्वास पुर्ण बाहेर काढल्यावर डावी नाकपुडी बंद ठेवत उजव्या नाकपुडीनं श्वास पुर्ण भरून डाण्या नाकपुडीनं बाहेर सोडा. इथं एक प्रक्रिया पुर्ण होते.

अशाप्रकारे हा विधि नेहमी करत राहणं म्हणजे डाव्या नाकपुडीनं श्वास घेऊन उजव्या नाकपुडीनं बाहेर सोडणं, पून्हा उजव्या नाकपुडीनं होऊन डाण्या नाकपुडीनं श्वास बाहेर सोडा. अशाप्रकारे पाच मिनिटं प्राणायाम केल्यावर थकवा जाणवतो. थकवा जाणवल्यावर थोडा वेळ विश्रांती घेऊन थकवा दूर झाल्यावर पून्हा प्राणायाम करा.

अशाप्रकारे हे प्राणायाम ९ मिनिटांपासून सूरू करून दहा मिनिटांपर्यंत करता येऊ शकते. काही दिवसांपर्यंत नियमित सराव केल्यावर साधकाचं सामर्थ्य वाढीला लागतं आणि जवळपास एका आठवडयात तो न थांबता पाच मिनिचांपर्यंत हे प्राणायाम करू शकतो.


अनुलोम-विलोम यांचा निरंतर सराव केल्यामुळे मुळाधार-चक्रात सन्निहित शक्तीचं जागरण होऊ लागते. थालाच वेदांमधे ‘ऊर्ध्वरेतस्’ होणं आणि आर्वाचीन योग भाषेत कुंडलिनी जागरण म्हणतात हे प्राणायाम करत असताना प्रत्येक श्वाच्छोश्वासाबरोबर ‘ओउम्’ चं मानसिक रूपानं चिंतन ही करत रहा. असं करण्यानं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेत येतं.


अनुलोम-विलोम करताना शिवसंकल्प :
हे प्राणायाम करत असताना मनात असा विचार आणा की, इडा आणि पिंगळा नाडयांमधे श्वासाचं घर्षण आणि मंथन झाल्यामुळे सुषुम्णा नाडी जागृत होत आहे. अष्ट चक्रांपासून सहस्रार चक्रापर्यंत एका दिव्य ज्योतीचं उर्ध्वस्कुरण होत आहे. मासा पुर्ण देह दिव्य आलोकानं दीपमान होत आहे. चित्र क्रमांक १६ प्रमाणे शरीराच्या बाहेर आणि आतमधे दिव्य आलोक, ज्योति आणि शक्तीचं ध्यान करत ओ खं ब्रह्मा ची अनुभुती करा.
विश्वाचा परमश्वर आपल्या दिव्यशक्ती, दिव्य ज्ञानानं मळा ओतप्रोत करत आहे असा विचार करा शक्तीपाताच्या दीक्षेनं स्वतःला ओतप्रोत करा शक्तीशाठी गूरू एक प्रेरक आहे, गूरू फक्त दिव्य संवेदनांबरोबर जोडत असतो.

अशाप्रकारे दिव्य संवेदनांनी ओतप्रोत होऊन केलेल्यां अनुलोम-विलोम प्राणायामामुळे विशेष शारीरिक, मानसिक आणि आध्यातमिक लाभ मिळते. मुळाधार-चक्रामुळे स्वतःला एक ज्योती स्फुर्ती मिळते, कुंडलिनी जागरण होईल, तुम्हो उर्ध्वरेता बनाल आणि शक्तीपाताच्या दीक्षेत स्वतः दीक्षित व्हाल.


अनुलोम-विलोम प्राणायामाची वेळ :
डाव्या नाकपुडीतून जवळपास अडीच सेकंदात श्वास भरून आणि रोखून धरलेल्या उजव्या नाकपुडीतून जवळपास अडीच सेंकदात श्वास बाहेर सोडावा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडल्यावर लगेच त्याच नाकपुडीतून अडीच सेंकदात शहज श्वास घेऊन, एक लयात तो श्वास बाहेर सोडावा, ही प्रक्रिया न थांबता लयात पाच मिनिटं करत रहा.
सुरूवातीला थकवा जाणवेल. जास्त ताकत लावू नका आणि कोपरां जास्त वर करून अनुलोम-विलोम करू नका यामुळं हळू-हळू ५ ते ७ दिवसांत पाच मिनिटं सतत अनुलोम-विलोम करायवा समर्थ व्हाल.

१० सेंकदात अनुलोम-विलोम प्राणायाम एक वेळा होईल आणि एका मिनिटात जवळपास ६ वेळा. एका वेळा पाच मिनिटं केल्यावर अनुलोम-विलोम जवळपास ३० वेळा आणि निरोगी आणि सामान्य आजारी माणसासाठी एकण १५ मिनिटंच्या वेळात जवळपास १० वेळा अनुलोम-विलोम होईल. कँसर, पांढरे राग, सोराइसेस, मस्बयुलर, डिस्ट्रॉफी, एस.एल.ई., इन्फर्टिलिटी, एच.आय.व्ही. एडस आणि किडनीच्या इतर असाध्य रोगांनी आजारी असलेल्या व्यक्तींन अनुलोम-विलोम अर्ध्या तासापर्यंत करायला हवं.
सराव चांगला झाल्याव अनुलोम-विलोम सतत १५ किंवा ३० मिनिटांपर्यत करायला हवं.
8 most effective Pranayams
अनुलोम विलोम चे लाभ :


ह्या प्राणायामामुळे ७२ कोटी, ७२ लाख, १०२१० नाडया, शुद्ध होतात. सर्व नाडया शुद्ध झाल्यामुळे शरीर पुर्णपणे निरोगी कांतीमय आणि बलवान होते.
संधिवात, आमवा, गाठ, कम्पवात, स्नायु दुर्बलता इत्यादी सर्व वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, शुक्रक्षय, आम्लपित, शीतपित इत्यादी सर्व पित्त रोग, सर्दी, पडसे, जुनं नजला, साइनस, दमा, खोकला, टॉन्सिल इत्यादी सर्व कफरोग दुर होतात. त्रिदोषाचं प्रशमन होतं.


हृदयाच्या धमन्यात (arteries) आलेले (अडथळे) मोकळे होतात. ह्या प्राणायामाचा नियमित सराव केल्यामुळ जवळपास ३ ते ४ महिन्यात ३० ते ४० टक्के अडथळे मोकळे होतात. अनेक रूग्णांवर केलेल्या प्रयोगाअंती हा अनुभव आला आहे.


कॉलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइडस, एच.डी.एल. किंवा एल.डी.एल. इत्यादींचा त्रास दूर होतो.
नकारात्मक भावना बदलून सकारात्मक विचार वाढीला लागतात. आनंद, उत्साह आणि निर्भयतेची प्राप्ती होते.


हे प्राणायाम केल्यामुळे तन, मन, विचार आणि संस्कार सर्व शुद्ध होतात असं थोडक्यात म्हणू शकतो. शरीराचे सर्व रोग नष्ट होतात आणि मनाची शुद्धी होऊन ओकांराच्या घ्यानात मन लीन होऊन जातं.
हे प्राणायाम २५० ते ५०० वेळ केल्यामुळे मुळाधार चक्रात सन्निहित • कुंडलीनी -शक्ती जी अधोमुख असते ते अर्ध्वमुख होते याचा अर्थ कुंडलीनी जागरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होतो..


सहावी प्रक्रियाः भ्रामरी प्राणायाम (8 most effective Pranayams)


श्वास पुर्ण आतमधे भरून मध्यमा बोटानं नाकपुडयांच्या मुळात डोळयांजवळून दोन्ही बाजूने दाबा, मनाला आज्ञाचक्रात केंद्रीत करा. अंगठयांनी दोन्ही कानांना पुर्णपणे बंद करा. आता भ्रामरासारखा आवाज काढत नाद रूपात ओऊम चं उच्चारण करत श्वास बाहेर सोडा पून्हा अशाच प्रकारे कृती करा.


भाम्ररी प्राणायाम शिवसंकल्प :
हे प्राणायाम आपली चेतना ब्राहमी चेतना, ईश्वरीय सतेबरोबर तन्मय आणि एकरूप होत करायला पाहीजो. मनात हा दिव्य संकल्प आणि विचार असायला पाहीजे की माझ्यावर देवाची करूणा, शांती आणि आनंद यांचा वर्षाव होत आहे.
माझा आज्ञाचक्रात भगवान दिव्य ज्योतीच्या रूपात प्रकट होऊन माझं सर्व अज्ञान दूर करून मला ऋतंभरा प्रज्ञेनं संपन्न करत आहेत अशाप्रकारे शुद्ध भावनेनं हे प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपूंज आज्ञाचक्र प्रकट होते आणि ध्यान आपोआप लागते.

भ्रामरी प्राणायामाची वेळ :
३ ते ५ सेंकदा श्वास आतमधे भरून विधिपुर्वक कान, डोळे बंद करून १५ ते २० सेंकदात श्वास बाहेर सोडा. एक वेळा भ्रामरी पुर्ण झाल्यावर लगेच पुन्हा १ ते ५ सेंकदात एक लयीन श्वास आतमधे घ्या आणि पुन्हा १५ ते २० सेंकदाचा भ्रमर ध्वनी करत विधिपुर्वक श्वास बाहेर सोडा.
अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी ५ ते ७ वेळा सतत भ्रामरी प्राणायाम आवश्य करायला पाहीजे. ही प्रक्रिया जवळजवळ ३ मिनिटांत पुर्ण होते.
कॅसर, डिप्रशन, पाकिर्सन, माइग्रेन, हृदयरोग, नेत्र रोग आणि इतर कोणत्याही असाध्य रोगानं पिडीत असलेल्या रूग्णांनी योगा व्यापक प्रमाणात करण्याची इच्छा असलेले योगी ११ ते २१ वेळापर्यंत भ्रामरी प्राणायाम करू शकतात.

भ्रामरी प्राणायाम चे लाभ :
मनाची चंचळता दूर होते. मानसिक तणाव, उतेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग इत्यादीमधे लाभदायी आहे. ध्यान करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.

सातवी प्रक्रिया : उद्गीथ प्राणायाम (8 most effective Pranayams)

३ ते ५ सेंकदाच्या श्वासाला एक लयेन आतमधे भरून, पवित्र ओउम शब्दाचं विधिपुर्ण उच्चारण करत जवळपास १५ ते २० सेंकदात श्वास बाहेर सोडावा. एक वेळा उच्चारण पुर्ण झाल्यावर श्वास पून्हा १५ ते २० सेंकदात ओउम चा जप करत बाहेर सोडा.

अशाप्रकारे जवळ पास ३ मिनिटात जवळजवळ ६ वेळा प्रत्येक व्यक्ती उद्गीथ प्राणायाम अवश्य करायला पाहीजे.

असाध्य रोग झालेल्या आणि दीर्घ ध्यान करण्याची इच्छा असलेले साधक ५ ते १० मिनिटं किंवा यापेक्षाही जास्त वेळपर्यंत उद्गीथ प्राणायाम करू शक तात. त्यामुळे जर एखादा साधक यांचा दीर्घ सराव करू इच्छित असेल तर कुठल्याही प्रकारची हानी होण्याची संभावना नाही.


आठवी प्रक्रिया : प्रणव प्राणायाम (8 most effective Pranayams)

यापुर्वी सांगितलेले सर्व प्राणायाम केल्यावर श्वाच्छोश्वासावर आपलं मन केंद्रीत करून प्राणाबरोबर ओउम चं जप करा. ईश्वरानं धुव्रांची आकृती ओंकारमय बनवली आहे. हे पिड (देह) आणि सर्व ब्रहमांड ओंकारमय आहे.

ओंकार एखादी व्यक्ती किंवा आकृती नसून एक दिव्यशक्ती आहे, ज्यामुळे ह्या संपुर्ण ब्रहमांडाचं कार्यभार चालू आहे. दृष्टा बनून दीर्घ आणि सुक्ष्म वेगानं श्वास घेताना आणि सोडताना श्वासाची गति इतकी लहान असायला पाहीजे की, तूम्हाला सुद्धा या श्वासाचा आवाज जाणवू नये आणि जर नाकपुडी समोर जर कापसाची रूई जरी ठेवली तरी ती हलु नये.

हळू हळू सराव वाढवून एक मिनिटात उच्छावास घेण्याचा प्रयत्न करा. अशाप्रकारे श्वास आतपर्यंत थांबवव्याचा प्रयत्न ही करा. सुरूवातीला श्वासाचा स्पर्श फक्त नाकपुडीला जाणवेल ? हळू हळू श्वासाच्या दीर्घ स्पर्शाचा ही अनुभव होईल.

अशाप्रकारे काही काळासाठी श्वास दृष्य, म्हणजे साक्षीभावपुर्ण ओंकाराचा जप केल्यामुळे ध्यान आपोआप लागते. तुमचं मन अंत्यंत एकाग्र आणि ओंकारात एकरूप होईल प्रणवाबरोबरच वेदांचे महानमंत्र गायत्रीचा ही अर्थपुर्वक जप आणि ध्यान करता येते.

अशाप्रकारे साधक ध्यान करत करत सच्चिदानंद-स्वरूप ब्रह्माच्या स्वरूपात एकरूप होऊन समाधीचा अनुपम दिव्यआनंद ही प्राप्त करू शकतो. झोपताना सुद्धा अशाप्रकारचं ध्यान करत झोपायला पाहीजे. असं करण्यानं झोप ही योगा मय होऊन जाते, वाईट स्वप्नांपासून सुटकारा मिळेल आणि गाढ झोप लवकर येईल.

8 most effective Pranayams

प्रणव प्राणायामाची वेळ :
दृव्य घेऊन जेव्हा एका लयात श्वासानं मनाला केंद्रीत करता. तेव्हा प्राणही सुक्ष्म होतो आणि १० ते २० सेंकदात श्वास बाहेर येतो. दीर्घ श्वासानं योग्याचा एक श्वास एक मिनिट चालतो. भस्त्रिका, कपालभाती, बाह्य, अनुलोम-विलोम, भ्रामरी आणि उद्गीथ यांच्यानंतर विपश्यना किंवा प्रेक्षाध्यान रूप प्रणव प्राणायाम केला जातो.
हे प्रणव प्राणायाम पुर्णपणे ध्यानमयी आहे. प्रत्येक व्यक्तीनं हे ध्यानमयी प्राणायम ३ ते ५ मिनिटं अवश्य केलं पाहीजे. समाधिचे अभ्यास योगी साधक प्रणवाच्या ध्यानाबरोबरच श्वासाच्या हया साधनेला वेळे प्रमाणे अनेक तास करता येते.
घ्या प्रक्रियेत श्वासाचां कसलाही आवाज येत नाही म्हणजे ही ध्वनी विरहित साधना साधकाला आतून दीर्घ मौनात घेऊन जाते, जिथं साधकाच्या इंद्रियाचं मनात, मनाचं प्राणात, प्राणाचं आत्म्यात आणि आत्म्याचं विश्वात्म्यात किंवा परमात्म्यात विलय होतं अशाप्रकारे साधकाला ब्रहमाचा साक्षात्कार होतो. प्राणायामानं सुरू झालेल्या साधनेनं म्हणजे प्राणायामाच्या निरंतरतेनं प्रत्याहार, प्रत्याहाराच्या निरंतरतेनं धारणा, धारणेच्या निरंतरतेनं आणि दृढतेनं ध्यान आणि ध्यानाच्या निरंतरतेनं समाधी सहज प्राप्त होते.
हया प्राण साधनेमुळे धारणा, ध्यान आणि समाधीच्या संयोगाने त्रयमेकत्र संयमः’ संयम प्राप्त होतो. संयमाने प्रज्ञालोक, प्रज्ञालोकानं सेल्फ हीलिंग आणि आत्मनुभूती साधक प्रात करतो. साधकाबोवती एक प्रखर आभामंडळ तयार होते, जे एक अभेद्य सुरक्षा कवच बनून साधकाच सर्व व्याधि आणि विकारांपासून सरंक्षण करते.

तर हे होते आठ मुख्य प्राणायाम (8 most effective Pranayams)ज्याचा उपयोग करून तुमचे जीवन आरोग्य आधिक चांगले होईल

 

Leave a Comment

EMAIL
Facebook