Siddhtek cha Sidhivinayak सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक अष्टविनायक गणपती संपूर्ण माहिती

(Siddhtek cha Sidhivinayak ) सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक अष्टविनायक श्रीसिद्धीविनायक :-

सिद्धटेक सिद्धटेक स्थितो भीमातीरे जगदवनकामेन हरिणा ।

विजेतु दैत्यो तच्छुति मलभवौ कैटभमधू ।।

महाविघ्नार्तेन प्रखर तपसा सेवितपदो ।

गणेश सिद्धीशो गिरीवरवपुः पंचजनक ।19।।

अर्थ :- भयंकर संकटात सापडलेल्या श्रीहरीविष्णूने भीमातीरावरील हिरव्यागार वृक्षांच्या राईत असलेल्या पर्वतश्रेष्ठ सिद्धटेक पर्वतावर कडक तपश्चर्या करून, पंचमहाभूतांचाही जनक असलेल्या अशा सिद्धेश्वर गणेशाकडून वर मिळवला आणि मधू व कैटभ या आशा दोन दैत्यांना ठार करून यम सदनी पाठवले अशा सिद्धेश्वराच्या चरणा वर माझी सेवा रूजू होऊ दे.

कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धीविनायक ( Siddhtek cha Sidhivinayak )अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. श्रीविष्णूला या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली अशी काहीशी पौराणिक कथा आहे. हे अत्यंत कडक व जागृत सिद्धीस्थान आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींना तसेच केडगावच्या नारायण महाराजांना येथेच सिद्धी प्राप्त झाली . पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांना आपले गमावलेले सेनापतीपद सिद्धीविनायकाची २१ दिवस उपासना करून परत मिळाले.

Siddhtek cha Sidhivinayak

( Siddhtek cha Sidhivinayak )श्रीक्षेत्र सिद्धटेकचे भौगोलिक स्थान व मार्ग :-

भीमा तीरावर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील व कर्जत तालुक्यातील सिद्धटेक हे शहरीकरणाचा स्पर्श न झालेले उत्कृष्ट खेडेगाव आहे. ऊसाची, गव्हाची विस्तीर्ण शेती चारी बाजूंनी आहे. मातीच्या भिंती आणि गवतांची शाकारलेली छोटी छोटी घरे इथली विशेषता आहे. गुरांचे व मेंढ्यांचे कळप इथला विस्तीर्ण कुरणांवर चरताना आढळतात. • सिद्धटेकला जाण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग खालील प्रमाणे-सिद्धटेकला  जाण्यासाठी पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील सोयीचे रेल्वेस्टेशन आहे. दौड ७८ कि.मी. वर आहे. (दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे.. दौंड पुण्याहून हडपसर – लोणी – यवत – चौफुला- पाटसमार्गे दौंड ७८ पूर्वी कि.मी. आहे. दौंड ते सिध्दटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. सिध्दटेकला जाण्यासाठी भीमा नदी पार करावी लागत होती. आता नदीवर पूल झाल्यामुळे वाहने थेट मंदिरापाशी थांबतात.

( Siddhtek cha Sidhivinayak )श्रीसिद्धीविनायकाची पौराणिक कथा :-

फार प्राचीण काळी एकदा ब्रह्मदेवाच्या मनात सृष्टीरचना करण्याचा विचार आला. यासाठी त्याने गणेश एकाक्षर मंत्राचा जप केला. ब्रह्मदेवाच्या अत्यंत आशा उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला. गजाननाच्या वराने ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्याने गणपतीची पूजा केली तेव्हा सिद्धी आणि बुद्धी अशा दोन कन्या अकस्मात तेथे उत्पन्न झाल्या.

ब्रह्मदेवाने गजाननाची षोडषोपचारे पूजा करून भक्तांचे कल्याण करण्याचा वर मागितला आणि त्या दोन कन्या गणेशाला अर्पण केल्या. गजाननाने त्या कन्यांचा स्वीकार केला आणि तो अंतर्धान पावला. ब्रह्मदेवाने आपल्या बाहू, मांड्या यांपासून क्षत्रियादी तीन वर्ण उत्पन्न केले. हृदयापासून चंद्र, नेत्रापासून सूर्य, मस्तकापासून स्वर्ग, कानापासून प्राण व वायू, पायापासून । पृथ्वी निर्माण केली. नंतर त्याने नद्या, समुद्र, वृक्ष, वेली इ. निर्माण केले. काही काळा नंतर निद्रिस्त असलेल्या विष्णूच्या कानातून दोन भयंकर राक्षस निर्माण झाले. ते म्हणजे मधू आणि कैटभ पुढे ते याच नावाने त्रिभुवनात प्रसिद्ध झाले.

Siddhtek cha Sidhivinayak
महाभयंकर असे ते दोन राक्षस उत्पन्न झाल्यावर ब्रह्मदेवाला त्रास देऊ लागले. त्यांच्या त्रासाने सर्व सृष्टी भयभीत झाली. ते दोन राक्षस ब्रह्मदेवाला खावयासाठी त्याच्या अंगावर धावले. त्यावेळी जिने विष्णूला मोह घातला होता त्या निद्रादेवीचे मधुकैटभाच्या नाशासाठी आणि विष्णूला जागृत करण्यासाठी ब्रह्मदेवाने स्तवन केले. विष्णू जागा होईपर्यंत त्या दैत्यांनी त्रैलोक्यामध्ये मोठा अनर्थ मांडला. जाग आल्यावर श्रीविष्णू सर्व आयुधे घेऊन युद्धास तयार झाला.

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

मधुकैटभाने विष्णूस बाहुयुद्धाचे आव्हान केले. विष्णूने त्यांचे आव्हान मान्य केले आणि आपल्या चार बाहुंनी त्या दोघा दैत्यांबरोबर युद्ध करण्यास सुरूवात केली. त्यांनी एकमेकांवर पुष्कळ डावपेच लढवले, आणि मुष्टिप्रकार केले. अशाप्रकारे पाच हजार वर्षे त्यांचे युद्ध चालले होते. पण विष्णूच्या हातून त्यांचा पराभव झाला नाही. नंतर विष्णूने युद्ध बंद करून गानकुशल अशागंधर्वाचे रूप धारण केले आणि उत्तम वीणा घेऊन गायन करण्यास प्रारंभ केला.

त्या स्वर्गीय गायनाने देव, गंधर्व, राक्षस यांना आनंद झाला. ज्यांनी ते गायन ऐकले त्यांनी सर्व व्यवसाय बंद केले. कैलास पर्वतावर वास करणाऱ्या शंकरांनी हे गायन ऐकले व त्यांना फार आनंद झाला. त्यांनी आपलेनिकुंभ व पुष्पदंत हे दोन गण पाठवून विष्णूस कैलास पर्वतावर बोलावून घेतले. कैलासावर गेल्यावर विष्णूने सर्व प्रथम शंकरास आदर आणि भक्तीने नमस्कार केला. व नंतर वीणेवर मंजुळ व सशास्त्र गायन केले.

Siddhtek cha Sidhivinayak  सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक अष्टविनायक

त्या गायनाने शंकरास इतका आनंद झाला की, त्याने हर्षभराने विष्णूला आलिंगन देऊन त्यास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूने मधुकैटभाचा सर्व वृत्तांत त्यास सांगितला व त्यांच्या वधाचा उपाय विचारला. तेव्हा शंकर म्हणाले, “तू युद्धास आरंभ करण्यापूर्वी गणेशाचे पूजन केले नाहीस. म्हणून तुला जयप्राप्ती झाली नाही. आता तू गणेशाच्या षडाक्षर मंत्राचा (श्रीगणेशाय नमः) जप कर व युद्धास जा शंकराच्या सांगण्याप्रमाणे अनुष्ठान करण्यासाठी विष्णूने सिद्धीक्षेत्र नामक क्षेत्र निवडले आणि तेथे जाऊन त्याने विधिपूर्वक गणपतीच्या षडाक्षर मंत्राचा जप केला.

शंभर वर्षे एकसारखी तपश्चर्या केल्यावर गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूच्या इच्छेप्रमाणे त्यास मधुकैटभाच्या संहाराचा वर दिला. ज्या टेकडीवर बसून श्रीहरी विष्णूने अनुष्ठान केले व वर मिळवला त्या टेकडीवर त्याने एक मोठे थोरले चार द्वारांनी युक्त असे देवालय बांधिले आणि त्यामध्ये गंडकीशिलेची गजाननाची मूती स्थापन केली. विष्णूला त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. म्हणून सर्व देवांनी त्या मूर्तीला “सिद्धीविनायक” आणि स्थानाला सिद्धटेक किंवा सिद्धक्षेत्र असे नाव दिले.

सिद्धीप्राप्त झाल्यानंतर विष्णू पुन्हा मधुकैटभाबरोबर युद्ध करावयास गेला. कित्येक दिवस युद्ध झाल्यानंतर विष्णू त्या राक्षसांस म्हणाला, “दैत्यांनो, तुमच्या अतुलनीय पराक्रमाने मला आनंद झाला आहे. तुमच्यासारखे योद्धे आजपर्यंत माझ्या दृष्टीस पडले नव्हते. यासाठी तुम्हाला जर एखादा वर मागावयाचा असेल तर मागून घ्या.” विष्णूचे भाषण ऐकून राक्षस हसून म्हणाले, “तुलाच आमच्याकडून वर मागावयाचा असेल तर मागून घे.

आमच्या बरोबर युद्धात तू इतके दिवस टिकलास हे पाहून आम्हालाही तुझ्या परक्रमाने आनंद झाला आहे. मायेने मोहीत झालेले ते राक्षस विष्णूला वर देण्यास प्रवृत्त झाले असता विष्णू म्हणाला , दैत्यांनो, जर तुम्ही मला वर देणारच असाल, तर तुम्ही माझ्या हातून मरावे असा वर द्या.” विष्णूचे हे भाषण ऐकून त्या दैत्यांनी आपल्या भोवती दृष्टी फिरवली. त्यावेळी त्यांस सर्व सृष्टी जलमय झालेली दृष्टीस पडली. ती पाहून ते म्हणाले, “हे गरूडध्वजा, तुझ्या हातून मरण आले तर आम्हाला मुक्ती मिळेल. यासाठी तू खुशाल आमचा वध कर! पण ज्या ठिकाणी उदक नसेल तेथे तू आमचा प्राण घे.” हे त्यांचे भाषण ऐकून विष्णूने त्यांस मांडीवर घेतले आणि आपल्या हातातील सुदर्शन
चक्राने त्यांचा वध केला.

कालांतराने विष्णूने बांधलेले देवालय जेव्हा नष्ट झाले त्यांनंतर पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने साक्षान्त दृष्टांत दिला. तो गुराखी भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालीत असे व आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवत असे. तेव्हा गणेशाने त्याला सांगितले, “तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी कर.” तेव्हा त्या गुराख्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा सुरू केली. पुढे पेशवेकाळात येथे मंदिर प्रांधण्यात आले असे म्हणतात.

(Siddhtek cha Sidhivinayak )श्रीसिद्धीविनायकाचे मंदिर :-

श्रीसिद्धीविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा गाभारा सुमारे पंधरा फूट उंच व दहा फूट रूंद आहे आणि तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी फ्रांधला आहे. हिली क
श्रीसिद्धीविनायकाचे मखर पितळेचे असून त्याच्या दोन्ही बाजूंना जय-विजय यांच्या दोन मोठ्या मूर्ती उभ्या आहेत. देवावरची महिरपही पितळेची असून सिंहासन पाषाणाचे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातच देवाचे शेजघर आहे. एका बाजूला शिवपंचायतन आहे. शिवाई देवीचे छोटे मंदिर आहे. बाहेर एक सभामंडप आहे. तो पूर्वी बडोद्याचे नवकोट नारायण कै. मैराळ यांनी बांधला होता. तो मोडकळीस आल्यावर १९३९ साली उतरवला व १९७० साली सर्व गणेशभक्तांनी मिळून आताचा नवीन सभामंडप बांधला आहे. महाद्वारावर जो नगारखाना आहे तो हरिपंत फडके यांच्या स्मरणार्थ बांधला आहे. श्रीसिद्धीविनायकाच्या मंदिराजवळील टेकडीवर विष्णूचे मंदिर आहे.

श्रीसिद्धीविनायक मूर्ती:-

श्रीसिद्धीविनायकाची मूर्ती स्वयंभू असून तीन फूट उंच व अडीच फूट रूंद आहे. मूर्तीचे मुख उत्तरेकडे असून ती गजमुख आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. मूर्तीचे पोट मात्र मोठे नाही. एक मांडी घातलेली असून त्यावर ऋद्धी आणि सिद्धी बसलेल्या आहेत. उजव्या सोंडेचा
गणपती भाविक लोक फार कडक असे मानतात.
या मंदिरातील मूर्ती डोंगराच्या एका कडेला स्थापिलेली आहे. । त्यामुळे जेव्हा केंव्हा मंदिरात प्रदक्षिणा घालायची असेल तर संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावयाला हवी. प्रदक्षिणेसाठी अर्धा तास लागतो. नाही तर स्वतःभोवती उजव्या बाजूने गोल फिरून प्रदक्षिणा घातल्याचे समाधान मिळवायचे.
सिध्दीविनायक मंदिरातील नित्य कार्यक्रम :-
पहाटे ४ वाजता देवाचा दरवाजा उघडला जातो. पहाटे ४.३० ते ५.०० या काळात गणेशाची साधी पूजा होते. रोज सकाळी १०.०० वाजता देवाला खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. दुपारी ११.०० पंचामृती पूजा | होते. १२.०० वा. महानैवेद्य असतो. सूर्यास्त झाल्यावर तिसरी पूजा होते. • रात्रौ ८.३० ते ९.१५ पर्यंत धुपारती होते. मग देवाला झोपवले जाते.

Siddhtek cha Sidhivinayak  सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक अष्टविनायक

उत्सव :-

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मोठे उत्सव येथे होतात. त्यावेळी महापूजा, नैवेद्य होऊन तीन दिवस, तीन रात्री आठ वाजता पालखी निघते. रात्री १० ते १२ पर्यंत धुपारती, पदे, शेजारती होते. पहाटे पाच वाजता पुन्हा मिरवणूक काढतात. मग जहागिरदार यांची कापूर आरती होते.

अन्य उपयुक्त माहिती :

१) मंदिरापासून काही अंतरावर प्रसिद्ध ऋषी भृशुंडी यांनी तपश्चर्या केलेली जागा आहे.
२) सिद्धटेक देवस्थानाला चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली
येते.

३) सिद्धटेकहून जवळच राशिन येथे जगदंबा नावाचा साखर कारखाना आहे जेथे जगदंबेचे मोठे देऊळ बांधलेले आहे.
४) यात्रेकरूंसाठी दररोज ५ रू. मध्ये देवस्थानने भोजनाचा प्रबंध केलेला आहे.
असे हे भगवान विष्णू, श्रीविनायक व्यास, भृशुंडी, मोरया गोसावी, नारायण महाराज इ. च्या पदस्पर्शाने पावन झालेले सिद्धटेक.
॥ श्रीमधुकैटभारिवरदो गणेशो जयति ॥

Ashtvinayak ganapti theur | थेउर च्या चिंतामणी ची संपूर्ण माहिती इतिहास व 2 पौराणिक कथा

Moreshwar Ashtvinayak मोरगावचा श्री मोरेश्वर का म्हणतात 1 ला अष्टविनायक गणपती व त्यामागच्या 2 कथा

Kalashtami April 2024 एप्रिलमध्ये कालाष्टमी कधी असते? तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या.

Gudhipadwa 2024 गुढीपाडवा संपूर्ण माहिती व 3 पौराणिक कथा |

Shiv Parvati Vivah Katha भगवान शिवाची अनोखी लग्न मिरवणूक

Leave a Comment

EMAIL
Facebook