तुलसी विवाहाची तयारी करताय जाणून घ्या संपूर्ण विधी

तुलसी विवाह

तुळसी महत्व :

तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी अशी औषधी वनस्पति आहे म्हणून तिचे नाते पितरांशी , देवांशी ,माणसाशी जोडूलेले आहे . तुळस भगवान विष्णुंना अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे . तुलसी पूजेशीवाय दररोजची पूजा पूर्ण हॉट नाही म्हणून दररोज विष्णुला /कृष्णाला तुळशीचे एक पांन वाहावे . तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात . मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलप्रमाणे तुळशीचे पांन ठेवण्यात येते म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान आहे .

एकदा भगवान श्रीकृष्णाची तुला चालू होती ,एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वाजनाचे दागिने मुद्रा त्यांच्या सर्व पत्नीने घातले तरी देखील तुला पूर्ण होत  नव्हती . त्यावेळी सत्यभामाने एक तुळशीचे पांन त्यावर ठेवले त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे पटकन खाली आले , तुळशीच्या निष्काम व पवित्र प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली . तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तीला पत्नी स्वरूपाचा मान दिला व “प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल व त्यानंतर इच्छीत वधू वराचे विवाह होतील. ” असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा सुरू आहे .

तुलसी विवाह

पूजचे साहित्य :

४ ऊस , बोरे , चिंचा , नागवेलीचे पाने , सुपाऱ्या , खारीक , बदाम , तुळशीची कुंडी , फुले , बाळकृष्णाची मूर्ती , हळद कुंकू , पळी , ताम्हण , फुलपत्र, आंतरपाटासाठी कपडा , हळकुंड , फराळचे साहित्य , अष्टगंध , गहू ,तांदूळ अक्षतासाठी रंगीत , जानवे जोड , लाहया ,तूप इ .

तुळशीसाठी सौभाग्य अलंकार :

मणी –मंगळसूत्र , जोडवे –विरोदे , हिरव्या बांगड्या ,करंडा , फणी , नवीन वस्त्राचा तुकडा ,, दोघांनाही हार , घंटा , दर्भ , सप्तपदीसाठी हवंन सामुग्री समिधा .

 

पूजा मांडणी :

प्रथम तुळशीची कुंडी गेरू ने रंगवून सुशोभित करावी . तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव उभारावा . तुळशीसमोर पाटावर तांदळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवावे . तुळशीभोवती रांगोळी काढावी . बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे ठेवावे . विवाह संस्काराप्रमाणे चढती हळद बाळकृष्ण व तुळशीला लावावी . नंतर दोघांची षोडोपचार व पंचोपचार पूजा करावी श्रीसूक्त पुरुषसूक्त अभिषेक करावा . मंगलाष्टक च्या आधी पुण्याह वाचंन विधी करावा . त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाट धरावा . उपस्थितांना अक्षता वाटाव्यात मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा व उपवर मुलगा मुलगी नसल्यास ईतर जनांनी केले तरी चालेल नवरा बायकोनी केले तरी चालेल ,पुढे बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी मंगळसूत्र ओटीचे सामान उपवर मुलगा वाहिल . ज्याना ही सगळे विधी वेलेआधी शक्य नसल्यास ‘अलंकार समर्पण ’ पर्यन्त केला तरी चालेल.      

तुळशी जन्माची कथा –

1) समुद्र मंथणातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले व त्यापासून तुळशी जन्माला आली व ती ब्रह्मदेवाने विष्णुला अर्पण केली .

2) राजा धर्मध्वज व राणी मधवीची मुलगी अतुलनीय म्हणून तिचे नाव तुळशी ठेवले होते जीने पुढे विष्णुप्राप्तीसाठी बदरीवनात तप केले .

ती पूर्वजन्माची नावाची गोपी होती . राधेने तिला कृष्ण सान्निध्य एकांतात पाहून श्राप दिला की ,”तू मानव योनीत जन्म घेशील !” तेव्हा कृष्णाने तिला दिलासा दिला की , “ मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल .“ तुळशीच्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले –“शंखचूड नावाचा दैत्य पूर्वी गोप होता . त्याचे तुझ्यावर प्रेम होते . तू या जन्मी त्याच्याशी विवाह कर मग पुढील जन्मात तुला विष्णुप्राप्ती होईल !” त्याप्रमाणे तीने शंखचूडाशी लग्न केले . परंतु तुळशीच्या पतीव्रतेमुळे या दैत्याचा पराभव करणे देवताना शक्य होईना ,तेव्हा विष्णूने शंखचूडाच्या रूपात जाऊन तुळशीचे पातिव्रत्य भंग केले . शंखचूड मारला गेला . तेव्हा तुलक्षिणे क्रोधित होऊन विष्णुला श्राप दिला ,की तू पाषाण होशील ,विष्णूने तिला सांगितले ,”तू माझ्या प्राप्तीसाठी तप केले होते म्हणून मी हे कृत्य केले .तुला आता दिव्य देह प्राप्त होईल तुझ्या तडकलेल्या शरीरातून ‘गंडकी ’ नावाची नदी निर्माण होईल. मी गंडकीच्या तीरावरील ‘शालिग्राम’ नावाचा पाषाण होईन ,या पषाणाला माझे रूप समजून तुझे पान मला वाहतील . तुझा पती शंख होऊन माझ्या पूजेत सामील होईल . तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील . ”अशी तुळशीजन्माची कथा सांगितली जाते .

तुळस ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी औषधी आहे तिच्या सेवनाने अनेक विकार नाहिसे होतात. तुळस ही आपल्याला ऑक्सिजन पुरवत असते आणि अजून एक शास्त्रीय कारण म्हणजे तुळस ही एकमेव अशी वनस्पति आहे जी हवेतील कार्बन डाय ओक्साइड घेऊन O3 म्हणजेच ओझोन वायु हवेत सोडतो . म्हणून आपल्या संस्कृतीत तुळशी ची पूजा केली जाते .  [ तुलसी विवाह ]

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा तुमची मते यांच्यासाठी खूप महत्वाची आहेत त्यात आम्ही नक्की सुधारणा करू .

Ashtvinayak Lenyadri ganapti | अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती संपूर्ण माहिती

Travel Ashtvinayak 2024 |श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक जाणून घ्या इतिहास मूर्ती व मंदिर ची संपूर्ण माहिती

Mahashivratri :जाणून घ्या 2 कथा महाशिवरात्रीची | महाशिवरात्रीची सेवा कोणती व कशी करावी ?

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

Leave a Comment

EMAIL
Facebook