पाणी पिण्याचे फायदे आणि महत्वाचे नियम
आपल्या शरीरात 70 %पाणी असते ही तर सर्वाना माहीत आहेच पण पाणी कसे आणि कधी पिले पाहिजे ही आज आपण जाणून घेऊ . जर आपण आपले वात , पित्त , कफ हे तीन दोष संतुलित ठेवले तर आपण 80% रोगमुक्त जीवन जगू शकतो . शिवाय आपले मन , बुद्धी , कर्म हे सुद्धा संतुलित ठेवले तर आपण 100 वर्षापेक्षा जास्त वर्षे निरोगी जीवन जगू शकतो . महर्षि वाग्भट्ट , शुश्रुत ऋषि , चरक ऋषि यांसारख्या अन्य ऋषिणी याविषयी बारकाईने अभ्यास करून माणसाच्या शरीरातील त्रिदोष संतुलित ठेवण्याचे काही नियम आपल्याला सांगितले आहेत आपण या नियमांचे पालन केल्यास आपले वात ,पित्त , कफ , मन , बुद्धी , कर्म या सहाही गोष्टी समतोल राहतील म्हणजे आपण सुद्धा प्रभू राम चंद्रप्रमाणे 135 वर्षे निरोगी जीवन जगू शकू . जर आपण या नियमांचे मनापासून काटेकोरपणे , प्रामाणिकपणे पालन केले तर . चल तर जाणून घेऊया ते नियम कोणते [ पाणी पिण्याचे फायदे आणि महत्वाचे नियम ] .
पाणी पिण्याचे नियम :
1. जेवण करताना पाणी पिऊ नये .
2. जेवणानंतर लगेच पानी पिऊ नये .1 ते दीड तासानंतर पाणी प्यावे . कारण जेवण करताना आपल्या पोटात अन्न पचविण्यासाठी जठराग्नि प्रज्वलित होतो . आपण जेवताना पाणी प्यायल्यास तो मंद होतो . त्यामुळे पचन होण्यास जास्त वेळ लागतो . आणि जेव्हा जास्त वेळ अन्न आतड्यांमद्धे राहते तेव्हा ते सडते आणि हे सडलेले अन्न 103 प्रकारचे रोग निर्माण करते . दिड तासाने आपंन खाल्लेल्या अन्नाचा रस तयार होतो त्या वेळी पानी जरूर प्यावे . जेवण करताना भाजी भाकरी खाल्यानंतर भात खाण्यास सुरुवात करतांना दोन घोंट पानी प्यायल्यास चालते .
3. सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणाच्यावेळी आपण दही , ताक , ज्यूस , डाळीचे पाणी असे पदार्थ घेऊ शकता .
4. जेवणाच्या अगोदर 45 मिनिटे पाणी प्यावे त्यानंतर जेवणा पर्यन्त पिऊ नये म्हणजे जर तुम्ही 12 वाजता जेवण करणार असाल तर 11.15 पर्यन्त पाणी पिले तर चालेल त्यानंतर 12 पर्यन्त पाणी पिऊ नये .
5. पाणी नेहमी खाली बसूनच प्यावे . पाणी तोंडात काही सेकंद ठेऊन प्यावे . कारण आपल्या तोंडातील लाळ पोटात जाणे आवश्यक असते ती पचनास मदत करते . तोंडातील लाळ ही शरीरातील वात , पित्त, कफ या त्रिदोषांना शांत ठेवते .
6 . आपल्या तोंडातील लाळ ही क्षारीय असते . पोट आम्लिय असते . तोंडातील लाळ पोटात गेल्यास आम्ल व क्षार एकत्र येतात . दोन्ही बॅलेन्स राहतात . जर ते एकत्र आले नाहीत तर आम्ल वाढते आणि आपल्याला विकार जाडतात लाळ ही अत्यंत औषधी आहे .
7. आपल्या शरीरात सकाळी कफचा प्रभाव असतो . दुपारी पित्ताचा तर संध्याकाळी वाताचा प्रभाव असतो .
8. आपण जर खाली बसून एक एक घोंट पाणी प्यायल्यास ताजगी , स्फूर्ति मिळते . त्या माणसाचे वजन कधीही वाढत नाही . आयुष्यभर वजन ठीक राहते . त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते . सकाळी उठल्यावर ज्याना लगेच चक्कर येणे , डोकेदुखी, अशक्तपणा जाणवणे या गोष्टी होतात या घोंट घोंट पाणी प्यायल्याने कमी होतात .
9. पाणी नेहमी कोमट प्यावे . फक्त उन्हाळ्यात 3 महीने साधे पाणी चालेल . कोमट पाणी लवकर पचते . तसेच पोट साफ होण्यास मदत होते मूतखडा ,बद्धकोष्टता होत नाही .
10 . सकाळी पाणी , ज्यूस , प्यावे . दुपारी पित्तनाशक पदार्थ (जसे की गोड ताक , तूप ) खावेत . रात्री गाईचे दुश प्यावे म्हशीचे नाही ते कफकारक असते .
11. उभे राहून गटा गट पाणी पिऊ नये . उभे राहून असे पाणी प्यायल्यास अॅपेंडीक्स , हर्निया , हायड्रॉलिस सारखे आजार होतात . तसेच कंबर, पाठ, सांधे दुखतात .
12. फ्रीजमधील अथवा बर्फ टाकलेले थंड पाणी केव्हाही पिऊ नये , कारण थंड पाणी पचनास खूप जड असते . थंड पाणी पंचवण्यास जास्त वेळ व जास्त शक्ति लागते . त्यामुळे मलावरोध , बद्धकोष्टता यासारखे आजार होतात .
13. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तोंड न धूता 1 लिटर कोमट पाणी प्यावे अथवा तांबे च्या भांड्यातील पाणी प्यावे . तांब्याचे पाणी गरम कळे नाही तरी चालेल . तांब्याच्या भांड्याचे पाणी सतत पिऊ नये . तीन महीने प्यावे नंतर एक माहीना बंद करावे व नंतर प्यावे .
14. रात्रभर तयार होणाऱ्या लाळेमद्धे Lysozyme नावचे अॅंटीबायोटिक असते म्हणून ती लाळ अत्यंत महत्वाची असते म्हणजे सोन्यासारखी असते . त्यामुळे ती थूंकु नये . दिवसातील केव्हाही लाळ पोटात घ्यावी थूंकु नये . कफ असेल तरच थुंकावे कफ केंव्हाही पोटात घेऊ नये .
15. थंड पाणी प्यायल्याने शरीर थंड पडते . शरीर थंड पडू नये म्हणून थंड पाण्याला शरीर गरम करते त्यासाठी रक्तातील ऊर्जा खर्ची पडते . त्यामुळे शरीरातील इतर अवयवांना रक्त कमी पडते . नेहमीच जर असे झाले तर आपले शरीर खराब होते त्यामुळे अनेक विकार जडतात . उदा . हार्ट अटॅक , लिवर तसेच किडनी खराब होणे , वजन वाढणे , गुडघेदुखी . जर पाणी उभे राहून प्यायचेच असेल तर मान खाली वकवूनच पाणी प्यावे .
16. आंघोळी साठी नेहमी साधे पाणीच वापरावे मात्र जास्त गरम वा जास्त थंड वापरू नये . आपळे डोके व डोळे हे कफाचे स्थान आहे कफ आणि गरम पाणी हे विरुद्ध आहेत . डोक्यावर जर आपण गरम पाणी टाकले तर आपल्याला अनेक आजार होतात . कारण कफ बिघडतो .
17. बिसलरी चे म्हणजेच प्लॅस्टिक बॉटल मधील पाणी कधीही पिऊ नये . तसेच जास्त काळ प्लॅस्टिक च्या भांड्यातील ठेवलेले पाणी आरोगयास योग्य नाही . बिसलरी च्या पाण्यात किटाकनाशके तसेच केमिकल घालतात . तसेच ते खूप शिळे असते .
18. पाणी जमिनीपासून म्हणजे विहीर , नदी , झरा, तळे यापसून दूर झाल्यावर एक तासात प्यावे . एक तासानंतर ते खराब व्हायला सुरुवात होते .24 तासानंतर ते पिण्यास योग्य नसते . परंतुत तांब्याच्या भांड्यात ठेवल्यावर 24 तासपर्यंत चांगले राहते तर मातीच्या भांड्यात ठेवले तर ते 24 तसाहून अधिक काळ चांगले राहते .
19 . थंडीत व पावसाळ्यात जास्त पाणी पिऊ नये पण उन्हाळ्यात मात्र भरपूर पाणी प्यावे .
20. तहान लागल्यास लगेच पाणी प्यावे तहान रोहकुण धरू नये .
21. तहान नसताना पाणी पिऊ नये . मध्यरात्री पाणी पिऊ नये .
22. तहान नसेल तरी सकाळी उठल्यावर भरपूर पाणी प्यावे .
23. पहाटे पाणी पिण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे 4.30 ते 5.15 .
24. ज्या व्यक्तीला मूळव्याध , बवासीर , भागंदर सारखे आजार आहेत त्याच व्यक्ति फक्त जेवण करताना पाणी पिऊ शकतात .
25. पावसाचे पाणी पाऊस पडत असताना भांड्यात घेऊन प्यायले तर ते सर्वात चांगले असते .
26. व्यायाम केल्यावर 20 मिनिटे पाणी पिऊ नये .
27. गरम पेय प्यायल्यानंतर लगेच थंड पे पिऊ नये .
28. कडक ऊनहातून आल्यावर लगेच थंड पेय पिऊ नये .
29. दूध नेहमी उभे राहूनच प्यावे कारण दूध तोंडात जास्त काळ राहिल्यास दूध खराब होत असते .
तर आज आपंण खूप रंजक आणि नवीन नियम पहिले आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली . नक्की आम्हाला कळवा अजून कोणती माहिती तुम्हाला आवडेल ते देखील नक्की आम्हाला कमेन्ट करून सांगा . ही माहीती काही आयुर्वेदिक पुस्तकांच्या अशया वरुण सादर केली आहे .. हा लेख वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद … [ पाणी पिण्याचे फायदे आणि महत्वाचे नियम ]
How to Eat effectively भोजणाचे 22 नियम | जेवण करताना हे माहीत असणे अत्यंत गरजेचे
डोळ्याचा चश्मा नक्की जाणार का ? | डोळ्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या
तुमच्या शरीराला या डाएट ची गरज आहे का ! ग्लुटेन फ्री म्हणजे नेमके काय ?