How to Eat effectively: बदलत्या जीवनशैली मुळे आपण आपल्या रूढी प्रथा विसरत चाललो आहोत ,घड्याळ्याच्या काट्यावर धावताना काही उपयुक्त गोष्टी ज्या आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्या हा यामागचा हेतु आहे . आपणच आपली संस्कृती टिकवली पाहिजे . आपल्या परंपरेनुसार तसेच आयुर्वेदात सांगितलेले भोजणाचे नियम दररोजच्या जीवनात वापरले तर आरोग्याला खूप फायदेशीर ठरणार यात काहीच शंकाच नाही चला तर मग जाणून घेऊया हे महत्वाचे नियम कोणते आहेत ते ……
भोजणाचे नियम : (How to Eat effectively)
1. जेवण नेहमी खाली मांडी घालून बसूनच करावे . उभे राहून प्राण्याप्रमाणे जेवण करु नये . कारण प्राण्यांचा गुरुत्वाकर्षाचा बिंदु वेगळा असतो व आपला वेगळा असतो .
2. डायनिंग टेबल चा वापर भोजनासाठी करु नये . प्रसंगी खुर्चीवर बसावे लागल्यास मांडी घालून बसावे .
3. ज्याची पचन संस्था चांगली आहे त्याने खाल्लेल्या अन्नापासून रस , रक्त , मांस , मेद , अस्थि , मज्जा , शुक्र , हे सप्तधातु बनतात . तसेच मल , मूत्र , घाम हे तीन मल बनतात . ज्यांची पचनसंस्था खराब झाली आहे त्यांच्या शरीरात ही धातू तयार होत नाहीत .
फक्त पाणी पिऊन निरोगी शरीर कसे मिळवाल !|पाणी पिण्याचे फायदे आणि महत्वाचे नियम ..
4. ज्याच्या शरीरात सप्तधातु व्यवस्थित बनतात , त्याच्या शरीरात सप्त धातूंचा पोषक अंश म्हंजेच ओज चांगला असतो . ज्याचा ओज चांगला ती व्यक्ति निरोगी व दीर्घायुषी असते .
5. भोजन करताना भोजनाचे पात्र पाटावर असल्यास जास्त चांगले म्हणजे वाकावे लागणार नाही .
6. भोजन करताना प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा . त्यापेक्षा अधिक वेळ चावले तरी चालेल . अन्नाची तोंडातच बारीक पेस्ट झाली पाहिजे .
7. अन्न प्यावे व पाणी खावे म्हणजेच अन्न हे पाण्यासारखे करून खावे व पाणी हे खाल्ल्यासारखे जास्त वेळ तोंडात ठेऊन प्यावे .
8. सकाळचे भोजन सूर्योदयानंतर अडीच तासात करावे . सकाळचे भोजन भरपूर करावे कारण सूर्योदयानंतर अडीच तासापर्यन्त जठराग्नि सर्वात प्रभावी असतो . तोच दुपारी मंद होतो .
9. रात्रीचे भोजन सूर्यास्तपूर्वी 45 मिनिटे आधी करवे कारण त्या वेळी पुनः जठरअग्नि प्रखर असतो .
10. सूर्यास्तनांतर म्हणजे रात्री काहीही खाऊ नये (How to Eat effectively )कारण सूर्यास्तानंतर आपण जे काही खाल त्याचे पचन नीट होत नाही व नंतर त्याचे चरबीत रूपांतर होते .
11. ज्याचे काम दिवसभर कष्टाचे आहे त्याने तीन वेळा सकाळी , दुपारी , संध्याकाळी जेवण करावे .
12. तसेच ज्यांचे काम कष्टाचे नसते त्यांनी दिवसात दोनच वेळा जेवण केले पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी .
13. शक्यतो संध्याकाळचे जेवण थोडे कमी करावे आणि सकाळचे जेवण भरपूर करावे .
14. दोन जेवणाच्या मध्ये किमान 4 तासाचे अंतर असावे व जास्तीत जास्त 9 तासाचे आंतर असले पाहिजे .
15. लहान मुलांनी मात्र 4 वेळ जेवण केले पाहिजे परंतु भूक लागेल तेव्हाच जेवावे . तसेच भुकेपेक्षा जास्त खाऊ नये . भूक लागल्यावर लगेच जेवावे . शरीराच्या गरजेप्रमाणे खावे मनाप्रमाणे नाही .
अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या Youtube चॅनल ला भेट दया ह्या लिंक वर क्लिक करा
16. अन्न शिजवल्यानंतर एका तासात खावे . शक्यतो गरम गरम , ताजेच खावे . शिले अन्न खाऊ नये . कारण शिजवलले अन्न तसाभराने खराब होण्यास सुरुवात होते .
17. फळे नेहमी सकाळी अथवा दुपारी खावीत संध्याकाळी फळे खाऊ नयेत .
18. रात्रीच्या भोजनानंतर 2 ते 2.5 तास झोपू नये . रात्रीच्या जेवण नंतर शतपावली करावी .
19. जेवताना तसेच स्वयंपाक करताना तोंड हे नेहमी पूर्वेकडे असावे .
20. रात्रीच्या जेवनांतर लगेच झोपल्यास डायबेटीस , हार्ट अटॅक ,आरथ्रायसीस होण्याची जास्त शक्यता असते .
21. भोजनात गोड पदार्थ असेल तर तो सुरुवातीलाच खावा शेवटी तिखट अथवा आंबट चालेल . मात्र संध्याकाळी आंबट खाऊ नय
22. पामतेल ,सोयाबीन तेल तसेच सूर्यफूल तेल देखील खाऊ नये कारण आपले शरीर ते पचवू शकत नाही . आहारात नेहमी घाण्यावर गाळलेले शुद्ध तेल व गाईचे तूप खावे .
विरुद्ध आहार : (How to Eat effectively)
विरुद्ध आहार घेतल्याने त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात त्या अन्नाचे पचन तर नीट होतच नाही उलट त्याचे विष शरीरात तयार होते. तसेच पुढे शरीरावर पांढरे डाग येतात . चल तर मग आपण पाहूया (How to Eat effectively )असे कोणते पदार्थ आहेत जे एकमेकांच्या विरुद्ध धर्माचे आहेत .
1. दही + दूध / ताक + दूध / कांदा + दूध / चपाती + वांगे / उडद दाळ + दही / लसूण + दही / दूध + कोणताही आंबट पदार्थ / दही + दुग्धजन्य पदार्थ / ताक + दुग्धजन्य पदार्थ / मध + तूप / दूध + मीठ / दूध + कोणतेही फळ हे सगळे विरुद्ध आहार आहेत .
2. चपाती आणि वांगे एकत्र खाल्ल्यास त्वचारोग होतात .
3. उडीद व दही , दूध एकत्र खाल्ले तर हार्ट अटॅक होण्याची शक्यता वाढते . .
4. एका वेळी एकाच प्रकारचे फळ खावे म्हणजे जर तुम्ही पेरू खात असाल तर त्यावेळी फक्त पेरू खावे दुसरे एखादे फळ एकत्र खाऊ नये .
5. प्रत्येक पदार्थ खाण्याचे एक शास्त्र असते (How to Eat effectively )त्यामुळे चुकीच्या वेळी खाल्लेला पदार्थ पचन होत नाही त्याने अनेक रोग होतात .
6. दूध हे कधीही दिवसा खाऊ अथवा पिऊ नये ते नेहमी सूर्यास्तनांतरच घ्यावे कारण दूध पचवण्यासाठी लागणारा रस आपल्या शरीरात सूर्यास्तानंतरच निर्माण होतो .
7. दही , ताक किंवा कोणताही पदार्थ जो आंबट आहे तो नेहमी सकाळी अथवा दुपारी खावा . संध्याकाळी खाऊ नये .
8. दूध ही गावरांन गाईचेच प्यावे . जे लोक व्यायाम करतात त्यांनी म्हशीचे दूध प्यावे . जर्शी गाईचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत .
9. ऋतुप्रमाणे आहार करावा .म्हणजे
हिवाळ्यात दूध , तूप , भूईमुगाच्या शेंगा , गूळ , चणा , बाजरी खावे .
उन्हाळयात ताक , दही , केळी , आंबा , ज्वारी , नाचणी खावे .
पावसाळ्यात हलके अन्न खावे तसेच ते कमी प्रमाणात खाणे देखील महत्वाचे आहे .
10. उपवासात सर्रास खाल्ला जाणार शाबु देखील पचनाच्या दृष्टीने खूप जड असतो . शिवाय तो बनवण्याची पद्धत खूपच खराब आहे .
11. मैदा अथवा मैदयाचे पदार्थ खाऊ नयेत . कारण मैदा हा पदार्थ शरीरात पचत नाही शिवाय तो आतड्याला आतून चिकटून राहतो . ज्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते .