Margshirsh guruwar मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन | संपूर्ण पूजा विधी |शास्त्रोक्त माहिती |जाणून घ्या 5 गुरुवार व्रत कसे करणार

मार्गशीर्ष (Margshirsh guruwar) महिन्यातील गुरुवारची पूजा :

कोणताही व्रत करण्यामागे आपला एक हेतु असतो तर मार्गशीर्ष महिन्यातील या व्रतामुळे सुख , शांती , समाधान , धन संपदा मिळण्यासाठी आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहावी यासाठी केले जाते.

यावर्षी म्हणजे 2023 -2024 मध्ये पाच गुरुवार (margshirsh guruwar) आलेले आहेत यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात बुधवार 13 डिसेंबर दिवशी हॉट आहे . पहिला गुरुवार आहे 14 डिसेंबर ,दूसरा आहे 21 डिसेंबर , तिसरा आहे 28 डिसेंबर  , 4 जानेवारी आणि पाचवा आहे 11 जानेवारी तर जरी पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तरी तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवट असल्याने आपल्याला याचे व्रत करायचे आहे. अमावस्या ही 5.30 पर्यन्त असणार आहे त्यामुळे त्यानंतर 6.30 किंवा 7 पर्यन्त उद्यापन करण्यात काहीच अडचण नाही .   

margshirsh guruwar
शास्त्रोक्त पूजन (Margshirsh guruwar) :

विधिवत शास्त्रोक्त पूजन कसे करावे हे आपणाला या ब्लॉग मधून आपणाला कळणार आहे चला तर मग जाणून घेऊया .

  • सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आदी झाल्यानंतर सूर्य देवाला अर्घ्य द्यायच आहे आणि हातामध्ये जल , फूल , अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आहे .
  • अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात कींवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजा मांडणी करावी . आधी गंगा जल शिंपडायचे त्यावर पाट ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंथरूण घ्यायचे .
  • नंतर माता लक्ष्मी ला प्रिय असलेले अष्टदल कमल तांदळाने काढूंन घ्यावे त्यावर कलश स्थापना करायची आहे . तर आता या कलशामद्धे थोडे गंगाजल टाकून त्यात पाणी भरावे . तसेच त्या कलशावर स्वस्तिक काढूंन घेऊन आठ दिशासाठी स्वस्तिक च्या दोन्ही बाजूने उभ्या रेषा काढायच्या आहेत . यात पाच आंब्याचे पाने किंवा नगवेलीची पाने त्यात ठेवायची आहेत .
  • पाने ठेऊन झाल्यावर जर घरात असतील तर कलशात दूर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकू शकतो . त्यानंतर हळकुंड , सुपारी आणि शिक्का आपल्याला कलशात टाकायचा आहे त्यावर आत नारळाची स्थापना करायची आहे . लक्क्ष्मीमातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र हे पूजेसठी वापरू शकतो .
  • लक्क्ष्मीमातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा . श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी . नागवेलीचे पांन नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेववी . अशी ही झाली आपली पूजा मांडणी.

अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल ला नक्की भेट दया

margshirsh guruwar
   आता पूजा कशी करायची(Margshirsh guruwar):
  • सर्वप्रथम भूमिपूजन -भूमीवर गंध , पुष्प , अक्षता अर्पण करून वंदन करावे.
  • त्यानंतर दिपपुजन –दिव्याला फूल , अक्षता वाहून दिपपुजन करावे .कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दिपपुजन फार महत्वाचे आहे .
  • घंटिपूजन –घंटी ला फूल , अक्षता वाहून घंटिपूजंन करावे .
  • सर्वप्रथम गणेश च्या मूर्तीला गंगाजलानेव नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळवर ठेवावे सोबतच माता लक्ष्मी च्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे .
  • हळद ,कुंकू , अक्षता , फुले गणपती व लक्ष्मी ला अर्पण करावे . माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल जरूर अर्पण करावे .
  • नैवेद्य गूळ खोबरे ,पाच फळे ठेवावे त्यानंतर कथा वाचून पूजा आरती करावी .
  • हे व्रत कोणीही करु शकते पुरुष , महिला , विधवा , कुमारिका कोणीही करु शकतात .आणि जर तुम्हाला दिवस कहाणी वाचायला जमले नाही तर दिवस भरात कधीही वाचू शकतात .दिवेलगणीच्या वेळी वाचून पुस्तकातील आरती बघून म्हणू शकता.किंवा मोबाइल मध्ये सहज मिळते .

Gudhipadwa 2024 गुढीपाडवा संपूर्ण माहिती व 3 पौराणिक कथा |

व्रताचे काही नियम :
margshirsh guruwar
  • फक्त मार्गशीर्ष च नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी (margshirsh guruwar) दुपारी झोपू नये त्यामुळे संपूर्ण व्रताचे फळ मिळत नाही .बऱ्याच जनाना सवय असते दुपारी वामकुक्षी घेण्याची तर व्रताच्या दिवशी ते टाळले पाहिजे .
  • गुरुवारी (margshirsh guruwar) घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही सफसफाईचे काम या दिवशी करु नये. आदल्या दिवशी सूर्यास्तपूर्वी तुम्ही ही कामे करु शकतात .
  • काही कारणामुळे जर कोणाला हे व्रत करणे जमले नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामद्धे या गुरुवारची सुरुवात करता येते आणि पुस्तकात सांगितल्यानुसार मार्गशीर्ष सोडून इतर महिन्यात व्रत सुरू केल्यास तुम्हाला चार एवजी आठ गुरुवार करावे लागतात .
  •  आणि कोणत्याही अडचणीच्या वेळी मार्गशीर्ष महिन्यात आली तर तुम्ही पूजा न मांडता फक्त उपवास करु शकता . आणि त्यानंतरचे जेवढे गुरुवार तुमचे पूजा न मांडता झाले तेच पुढे पूजा मांडून पाच गुरुवार पूजा मांडून पूर्ण करावे.
  • हा उपवास पूर्ण फलाहार घेऊन करायचा असतो . दिवसभर फलाहार घ्यावा रात्री देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करावा म्हणजे जेवण करावे .
  • ज्या दिवशी पूजा केली यह त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी .
  • देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा . नंतर तो नारळ काढून साइड ला ठेवा .
  • कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडून नंतर झाडांना द्या . तुळशील ओतू नका .त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरु शकता . आणि नारळ सुपारी ही देखील तुम्ही पुढच्या गुरुवार साठी ठेऊ शकता . व्रताच्या शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवन्यासाठी वापरू शकता .  
  • उद्यापणात पाच सुवासिनी किंवा पाच कुमारिकेची पूजा केली जाते .दूध ,केळी आणि कोणतीही वस्तु वान म्हणून द्यायची असते. जर पाच ,सात ,अकरा जमलेच नाही तर एक सुवासिनीला देखील देऊ शकता . शेवटी भावना असावी आणि मनापासून करावे .

Leave a Comment

EMAIL
Facebook