Gokarn Flower गोकर्ण कथा
Gokarn Flower गोकर्ण कथा
रावणाची माता म्हणजे पुलत्स्य नावाच्या ब्राह्मणाची पत्नी कैकेयी ही मोठी ईश्वरभक्त होती . ती नित्यानेमाणे शिवलिंगचे पूजन करीत असत त्याशिवाय ती आन्नग्रहंन करीत नसे .
एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्या सापडेना . शेवटी आपला व्रत भंग होऊ नये म्हणून मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करु लागली . तयवेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी आला आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले तू कोणाची पूजा करतेस तेंव्हा कैकेयी म्हणाली ,”शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते .”
तेव्हा रावण म्हणाला , मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मातीच्या लिंगची पूजा कशाला करते . मी तुला कैलास पर्वतच आणून देतो . रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली “ मी कैलासासह शंकरपार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो . ” असे बोलून तो कैलास पर्वताजवळ आला . आणि आपली वीस हातांचा जोर लावून कैलास पर्वसत उपटू लागला .
पण पर्वत काही हालत नव्हता मग् त्याने आपल्या दहा शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. कैलासातील देवगण भयभीत झाले .
पार्वती भिवुन शंकराजवळ येऊन म्हणाली , “कैलासला काय झाले ? असे हादरे का बसायले आहेत . ” तेंव्हा शंकर तिला म्हणाले ,“ तू काळजी करू नकोस रावण हा माझ्या भक्त आहे तो भक्तीचे खेळ करीत आहे .” सर्व देवगणांचे तुम्ही रक्षण करावे असे पर्वतीने शंकराला विनवणी केली . पार्वतीची विनवणी एकूण शंकराने डाव्या हाताने कैलासला दाब दिला त्यामुळे रावणाचे दहा डोके आणि वीस हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने विणवू लागला व आपल्याला ह्या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला .
रावणाची विनंती एकूण शंकराने त्याची सुटका केली तेंव्हा रावण शंकराला म्हणाला , “कैलास पर्वत लंकेला घेऊन जेल मी आलो आहे कारण शंकराची नित्य पूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे . ”
तेव्हा शंकर म्हणाला , “जर पूजेसाठीच् हवे असेल तर मी तुला पर्वत काय माझे आत्मलिंग देतो . तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करेल असे ह अत्मलिंग आहे . ही लिंग म्हणजे माझ्या प्राण आहे . ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही . याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील .
परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना कुठेही वाटेत खाली ठेऊ नको . तुझ्या नगरीत गेल्यानंतर तीन वर्षे याची पूजा कर म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल . हा सर्व प्रकार देवर्षि नारदला कळाला .
इंद्रकडे जाऊन यावर काय उपाय करायचा असे विचरू लागला . शंकरानी रावणाला अमरत्व दिले आले त्यांनी अत्मलिंग दिले आहे . त्यामुळे तो आता अमर होईल .
तेंव्हा दोघेही ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला तेव्हा विष्णुसहीत सर्व देव शंकरकडे गेले व विचारू लागले , हे तुम्ही काय केले रावणसारख्या क्रूर दैत्याला अत्मलिंग दिले ! तेंव्हा विष्णूने सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि नारदला त्याला विलंब करण्यासाठी जाण्यास सांगितले . आणि गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो .
गणेश बटूच्या रूपात रावणाजवळ जातो .एका बाजूला काहीतरी करत असल्याचे भासवून त्याने रावनाचे लक्ष आपल्याकडे खेचले .
रावणा त्याच्या जवळ आला व त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात दगरून ठेवण्यास सांगितले . गणेशाने त्याची विनंती मान्य केली .”परंतु मी लहान आहे तेंव्हा मला लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभा राहत येणार नाही , माझे हात दुककहेल लागतील , तेंव्हा मी तुला तीन वेळ हाक मारेन जर तू आला नाहीस तर हे अत्मलिंग खाली ठेवेन असे म्हणाला. ” रावण अर्घ्य देत असताना गणेशाने रावणास हाक मारन्यास सुरुवात केली .
परंतू रावण ध्यान करत होता त्यामुळे तीन हाक झाल्या तरी आला नाही , शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेऊन हातातील लिंग जमिनीवर ठेवले व तो तेथून निघून गेला .
रावणाने ते लिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते उचलले गेले नाही रावणाच्या बळाने देखिल ते उचलले गेले नाही म्हणून त्याला महाबळेश्वर असे म्हणतात . आणि ते गोकर्णसारखे लांब झाले म्हणून पुढे ते गोकर्ण (Gokarn Flower) क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले .
तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की अम्हाला सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनल ला भेट दया.
आशाच प्रकारच्या नवनवीन वैविद्यापूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी नक्कीच आमच्याशी जोडा फॉलो करा .. आणि माहितीचा आनंद घ्या हा लेख संपूर्ण वाचल्याबद्दल आपले खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद ..!