Ashta Chakra in Human Body: मानव शरीरातील चक्र विविध प्रकारच्या अद्भुत शक्तींचं केंद्र आहे. हे सर्व चक्र मेरूदंडाच्या मुळापासूनसुरू होऊन वरच्या भागापर्यंत जुडलेलं आहे. साधारण अवस्थेत हे चक्र न खुललेल्या कमळाप्रमाणे अविकसित राहते.
ब्रह्मचर्य पालन, प्राणायाम आणि ध्यान इत्यादी यौगिक विधींनी प्रेरणा घेऊन जेव्हा हे अर्ध्वमुख होऊन विकसित होते तेव्हा त्यांच्या अलौकीक शक्तींचा विकास होतो. चित्रात दाखवल्या प्रमाणे ते तुम्ही समजून घेऊ शकता .
चक्रांचं (Ashta Chakra) संक्षिप्त वर्णन :
चक्रांच्या वाबतीत भगवान् अथर्ववेदात म्हणतात :
अष्टचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या ।
तस्यां हिरण्ययः कोशः स्वर्गी ज्योतिषावृतः । । (अथर्ववेद १०-२-३१)
अर्थ –देवांची नगरी अयोध्या रूपी या देहात अष्टचक्र आणि नऊ द्वार (दोन डोळे, २ नाकपुडया, दोन कान, तोंड, पाथ आणि उपस्थ) आहेत. या नगरीतच एक देदीप्यमान हिरण्यय कोष आहे, जो अंनत, अपरिमित, असीम सुख-शांत, आनंद आणि दिव्य ज्योतीनं परिपुर्ण आहे. योगाभ्यासी उपासक साधकच घ्या दिव्य कोषाला (खजिना) प्राप्त करू शकतात. आता चक्रांसंबधी संक्षिप्त वर्णन पाहूया :
१. मुळाधार चक्र (Pelvic Plexus i.e. Root Plexus vis-a-vis Reproductory System first Ashta Chakra)
हे चक्र गुदामुळाहून २ बोट वर आणि उपस्थमुळाहून २ बोट खाली आहे घ्याच्या मध्यानं सुषुम्णा (सरासती) नाडी आणि वाम कोनातून इडा (गंगा) नाडी निघते. त्यामुळेच याला मुक्त त्रिवेणीसुद्धा म्हणताता.
या चक्रावर ध्यान केल्यामुळे आरोग्यता, दक्षता आणि कर्म-कौशल इत्यादी गुणांचा विकास होतो. हे चक्र जागृत झाल्यामुळे पुरूष उर्ध्वरेता, ओजस्वी आणि तेजस्वी बनतो आणि शरीराच्या सर्व व्याधि नष्ट होतात.
चित्राप्रमाणे दाखवण्यात आलं आहे की, प्रथम चक्र मुळाधार सवितानं (वुद्धीचं तेज) प्रेरित मानस-रेषा दाखवत आहे. या ठिकाणी बॅटरीच्या मंद ज्योति प्रमाणे निघणारा प्रकाश त्या तंतू मधून निघत आहे जो स्वाधिष्ठान चक्रा समोरून ‘मुळाधार’ चक्रापर्यंत जातो.
इथं काळा अंधार पाय रोवून असतो. प्राण साधना आणि धारणा घ्यान यांच्यामुळं हा अंधार दूर सारून मुळाधाराला प्रकाशित करता येते. हा प्रकाश मुळाधाराबरोबर संपुर्ण स्थूलता आणि सुक्ष्मतेचं दर्शन घडवतो. यालाच ‘कुंडलिनी जागरण’ ही म्हणतात.
२. स्वाधिष्ठान चक्र (Hypogastri Plexus vis-a-vis Excretory System-second Ashta Chakra) :
मुळाधार चक्राच्या २ बोट वर बेंबीजवळ या चक्राचं स्थान असते. तंत्र- ग्रंथात घ्या चक्रात ध्यानाचं फळ सृजन, पालन आणि निधनात समर्थता आणि जीभेवर सरस्वती असं सांगितलं जातं.
स्वाधिष्टान चक्र हे बेंबीत आहे. या चक्रात मूत्र संस्थान आहे, ज्यात (१) डावं- उजवं मुत्रपिंड (२) मुत्राशय (३) मुत्रेद्रियाचा मागचा भाग (४) मुत्रपिंडातून निघणारी मूत्रवहिनी नलिका आहे ज्यान हरे-पत्र (५) ‘शक्रकोश’ आहे शक्रुवाहिनी नलिका डावी-उजवी असते शुक्र बनवणारा अंग (६) ‘अंडकोश’ (७) प्रॉस्टेट ग्रंथी आहे, शुक्रवहा आणि मुत्रवाहिनी नलिका जाते.
अत्यंत महत्वाचे योग |मुख्य आठ प्राणायाम कोणते ? | हे प्राणायाम बदलतील तुमचे आरोग्य
३. मणिपूर चक्र (Epigastri Plexus or Solar Plexus vis-a-vis Digestive System Third Ashta Chakra) :
मणिपूर चक्राचं स्थान नाभिमुळ आहे. यकृत आणि आतडे इत्यादी संपुर्ण पाचन-तंत्र आणि अगन्याशय इत्यादीला हे चक्र शक्ती प्रदान करते. योगदर्शनात नाभिचक्रे कायव्यूहज्ञानम् सूत्राप्रमाणे नाभिचक्रा वर लक्षपुर्वक बघितल तर शरीरव्यूहज्ञान, अर्थात शरीराच्या अवयवात सन्निवेशाचं ज्ञान होण फलदायी आहे अस सांगितल आहे. ह्या चक्राच्या जागृत होण्यानं मधुमेह, अपचन, गैस इत्यादी सर्व पचनाशी संबधीत विकार दूर होतात.
हे चक्र नाभिच्या पाठीमागे आहे. या चक्रात (१) आमाशय (२) यकृत (३) प्लीहा (४) पैत्क्रियाज आणि पक्वाशय यांचा समावेश आहे.
४. हृदय चक्र किंवा मनश्चक्र (Lower Mind Plexus vis-a-vis Skeleton System fourth Ashta Chakra) :
हे चक्र हृदयजवळ आहे. तंत्रग्रंथीत वाक्वतित्व, कवित्व-शक्तीचा लाभ, जितेंद्रयता इत्यादीवर ध्यान करण्याचे लाभ सांगितले आहेत. शिव सारतंत्रात सांगण्यात आलं आहे की, घ्या ठिकाणी उत्पन्न होणारी ध्वनीच (अनहद नाद) सदाशिव (कल्याण-कारक) उद्गीथ रूप ओकांर आहे.
स्त्रिया आणि श्रद्धाप्रधान साधकांसाठी हे चक्र, धारणा आणि ध्यान करण्यासाठी उपयुक्त स्थान आहे. या चक्रावर ध्यान करणाऱ्या व्यक्तीला कधीही हृदय रोग होऊ शकत नाही .
५. अनाहत चक्र (Cardiac Plexus vis-a-vis Circulatory System fifth Ashta Chakra) :
हे चक्र दोन्ही स्तनांच्या मध्य भागी आहे. मुळाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्र जागृत आणि स्वस्थ झाल्यामुळे हे आपोआप जागृत होतं. हे जागृत झाल्यामुळे शरीराचे हाडं आणि मांसपेशी सदृढ होतात.
घ्या चक्रावर ध्यान केल्यामुळे प्रेम, करूणा, सेवा आणि सहानुभूती इत्यादी दिव्य गुणांचा विकास होतो. महर्षि व्यास सुद्धा हृदय चक्रात ध्यान करायला सांगतात. हे हृदयाचं स्थूल भाग नाही पण भावनात्मक भाग आहे. ज्याचा संबंध व्यक्तीच्या चित्त आणि किंवा मानस यांच्या बरोबर आहे.
डोळ्याचा चश्मा नक्की जाणार | डोळ्यांची माहिती नक्की जाणून घ्या
६. विशुद्धी चक्र (Carotid Plexus vis-a-vis Respiratory System sixth Ashta Chakra) :
हयाचं स्थान कंठात आहे. घ्या चक्रावर ध्यान केल्यामुळे आणि याच्या जागृतीनं व्यक्ती कवि, महाज्ञानी, निरोगी, व्यसनहीन आणि दीर्घजीवी बनतो. या चक्राच्या जागृत होण्यामुळे थायरॉईड ग्रंथी आणि फुफुस्साचे रोग देखील होत नाहीत .
७. आज्ञा चक्र (Medullary Plexus vis-a-vis Nervous System seventh Ashta Chakra) :
हे चक्र दोन्ही भुवयांच्या मध्यात आहे. कपालभाति, अनुलोम-विलोम आणि नाडी-शोधन इत्यादी प्राणायामामुळे प्राण आणि मन, शांत आणि स्थिर झाल्यावर ऑटोनोटिक आणि वॉलटंरी नर्वस सिस्टम शांत, निरोगी आणि संतुलित होतो. संपुर्ण नाडीतंत्र आज्ञा चक्रानंच जोडलेला आहे.
आज्ञाचक्र जागृत झाल्यावर नाडी सस्थेच्या पुर्ण रूपानं निरोगी आणि सशक्त होतात. मुळाधार चक्रामुळे इडा, पिंगळा आणि सुषुम्णा पृथक-पृथक उर्ध्व प्रवाहित होऊन घ्या ठिकाणी संगम प्राप्ती करतो. त्यासाठी आज्ञाचक्र-स्थानाला त्रिवेणीही म्हणतात.ललाटात भरलेला अर्ध्वगामी प्रकाश ‘सुषुम्णेचा’ आहे.
इडा भागीरथी गंगा पिंगला यमुना नदी ।
तयोर्मध्यगता नाडी सुषुम्णाख्या सरस्वती ।
त्रिवेणी-संगमो यत्र तीर्थराजः स उच्यते ।
तत्र स्नानं प्रकुर्वीत सर्वपापैः प्रमुच्यते ।।
इडेला गंगा, पिंगळेला यमुना आणि दोन्हीच्या मध्यात जाणारी नाडी सुषुम्णेला सरस्वती म्हणतात.
हया त्रिवेणीचा जिथं संगम असतो, त्याला तीर्थराज म्हणतात. हयात स्नान करून साधक सर्व पापांपासून पापमुक्त होतो. हे त्रिवेणी संगम बाहेर नसून आपल्यातच आहे. बाहेरच्या त्रिवेणीत स्नान केल्यामुळे कोणती ही व्यक्ती पापमुक्त होते हे मिथ्यज्ञान आहे.
जर असं घडायला लागलं तर कोणतीही व्यक्ती ब्राह्मण, गुरू किंवा भाऊ इत्यादी लोकांची हत्या करून त्रिवेणी संगमावर स्नान करून पापमुक्त व्हायला पाहीजे परंतू असं होत नाही.
पापाचा अर्थ अपराध आहे, ज्यामूळे इतरांचं अहित होतं. त्यामुळे पापाचं फळ तर भोगावचं लागेल.
पाप करून जर तूम्ही प्रायश्चित रूपाचं पुण्यकर्म करता तेव्हा पापाचं फळ दुःख रूपानं आणि पुण्याचं फळ सुख रूपात वेगवेगळं मिळेल. त्यासाठी शास्त्रात म्हटलं आहे की, अवश्यमेव भोक्तव्यं कृत कर्म शुभाशुभम्.
श्रद्धापुर्ण जर एखादी व्यक्ती गंगा किंवा त्रिवेणीमधे स्नान करूनप्रतिज्ञा आणि संकल्पानं भविष्यापासून बचाव करू शकतो.
परंतु जे आतापर्यंत केलेले जे पाप आहे, त्यांच्यापासून तर कोणी ही वाचू शकणार नाही. ही तर बाह्य त्रिवेणीची गोष्ट झाली. त्यासाठी खरचं जर आपल्याला पापा पासून मुक्ती हवी असेल तर दररोज आज्ञाचक्रात मनाचा निग्रह करून ओकांर नावाचा जप करत योगाभ्यास करायला पाहीजे.
८. सहस्त्रार चक्र (Endocrine System Eight Ashta Chakra) :
हे चक्र टाळूच्या वर मस्तिपकात ब्रह्मरंध्रात्या वर सर्व दिव्यशक्तींचं केंद्र आहे. ह्या चक्रावर प्राण आणि मनाचे निग्रह प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृतिरूप वृतीचां निरोध झाल्यावर असम्प्रज्ञात समाधीची प्राप्ती होते.
पिच्युटरी (पीयूषग्रन्थी) आणि पीनियल सह संपुर्ण अंतःस्त्रावी ग्रंथीचा संबध सहस्त्रार चक्राबरोबर आहे. सहस्त्रार चक्रा जागृत झाल्यामुळे पुर्ण इन्डोक्राईन सिस्टम संतुलित होतं.
विद्वान योगाभ्यासी साधक असं मानतात की, उपनिषदांत ज्या अंगुष्ठमात्र हृदय-पूरूषचां वर्णन आहे, तो हा ब्रह्मरंध्र नाही, ज्याच्यावर सहस्त्रार चक्र आहे (कारण तो अंगठयाच्या आकाराचा आहे) हे पित्ताचं स्थान आहे, ज्यात आत्माच्या ज्ञानाचां प्रकाश किंवा प्रतिबिंब पडतो.
अशीच माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनल ला विजिट करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
तर अशी ही आहे आठ चक्रांंची माहिती ,तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती नक्की संगा