कर्नाटक मधील अरुण योगिराज यांची मूर्ती अयोध्या मध्ये आज विराजमान झाली आहे त्यामागची संपूर्ण माहिती आपण आज या लेखात जाणून घेऊया . अरुण योगिराज हे ३७ वर्षे वयाचे आहेत त्यांनी लहानपण पासून आपल्या कुटुंबातूनच मूर्तीकरचे धडे गिरवले आहेत . त्यांचे पूर्वज पाच पिढीपासून मूर्तिकार आहेत . ते मैसूर महल च्या काममद्धे सहभागी असणाऱ्या परिवारात त्यांची ही पाचवी पिढी आहे . पंतप्रधान मोदिंनी देखील त्यांच्या कामाची खूप प्रशंसा केली आहे .
अरुण योगिराज यांचे एमबीए चे शिक्षण पूर्ण झालेले आहे त्यांनी बरेच वर्षे कुटुंबासाठी प्रायवेट नोकरी केली आणि २००८ मध्ये त्यांनी आपल्या मनाचे एकूण परत मूर्तीकार चे काम सुरू केले . त्यांचे अनेक मूर्ती प्रसिद्धह आहेत .
त्यांनी बनवलेलली
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इंडिया गेट येथील ३० फुटची प्रतिमा
- केदारनाथ मध्ये असलेली आदि शंकराचार्य यांची प्रतिमा
- मैसूर मधील महाराजा राजेंद्र वडेआर यांची १४.५ फुट उंचीची प्रतिमा
- सांगमरावर केलेली महाराज श्रीकृष्ण वाडियाल चौथे यांची प्रतिमा
- स्वामी रामकृष्ण परमहंस यांची प्रतिमा
- हनुमानजी ची प्रतिमा
आशा अनेक उत्कृष्ट प्रतिमा त्यांनी बनवलेल्या आहेत .
आता अयोध्या मधील राम लला ची मूर्ती काशी निवडली हे पाहू :
राम लल्ला ची मूर्ती बनवण्यासाठी मूर्तीकारांना काही वैशिष्टे सांगितली गेली होती त्या आधारावर त्यांना मूर्ती बनवायची होती . त्यात
- रामाची ही मूर्ती ५ वर्षे बालकाची भगवानची प्रतिमा असावी ,
- त्यातून ते राजाचे पुत्र दिसायला हवेत .
- त्या प्रतिमेत त्यांचा विष्णु अवतार दिसावा .
अशी ही काही वैशिष्टे सांगितली होती . त्यानुसार या तीन मूर्तीकारांणी मूर्ती बनवल्या होत्या
१} बेंगलूर चे जी एल भट
२} मैसूर कर्नाटक चे अरुण योगिराज
३} राजस्थान चे सत्यनारायण पाँडेय
आता या तिघांणी सुंदर मूर्ती तयार केल्या होत्या परंतु त्यातील एक निवडण्यासाठी एक कमिटी नेमलेली होती . कर्नाटकच्या मूर्तीमध्ये तेथील कर्नाटकातील विशेष दगड वापरलेले होते . राजस्थानमधील मूर्ती मध्ये मूर्तीकारांणी तेथील मकरणाच्या सनागमरावरचे दगड वापरलेले होते . या कामिटीने अरुण योगिराज यांची मूर्ती का निवडली याची वैशिष्टे आपण पाहू :
अरुण योगिराज यांची मूर्ती का निवडली :
कामिटीने अरुण योगिराज ची मूर्ती निवडली कारण त्यांना या मूर्तीमध्ये दिसले :
प्रभू रामाची बालपणाची झलक त्यांना दिसली .
मूर्तीचे सौन्दर्य अत्यंत मनमोहक आणि आकर्षित करणारे होते
मूर्तीची रचनात्मक जडणघडण खूप योग्य होती .
मूर्तीमध्ये विचरांचा गंभीर भाव प्रगट होत होता .
त्यातील जे दगड वापरले होते त्याची गुणवत्ता .
मूर्तीचे आयुष्य .
मूर्तीची प्रतिष्ठा .
या गोष्टींचा विचार करून कामिटीने ही मूर्ती निवडली ही मूर्ती बनवण्यासाठी अरुण योगिराज हे सहा महिन्यापासून अयोध्येत राहत होते आणि दिवस रात्र मेहनत करून १२ तास दिवसात अत्यंत कष्टाने ही मूर्ती बनवलेली आहे . या मूर्तीचे काम करताना छोटा तुकडा उडुन त्यांच्या डोळ्यात गेला होता त्याने त्यांच्या डोळ्याला जखम झाली होती तरी देखील न जुमानता त्रास हॉट असताना देखील त्यांनी तसेच काम सुरू ठेवले व ही मूर्ती पूर्ण केली जी आज आपण पाहत आहोत .संपूर्ण भरतवर्ष या सोहळ्याचे साक्षीदार झाले परंतु या मूर्तीचे सौन्दर्य स्तुति न करणारे असे कोणी नाहीत आम्ही सर्व जन तुमचे ऋणी आहोत अरुण जी ज्यानी ही मूर्ती घडवली.
कृष्ण शिळाच का वापरली :
■ प्रभू श्रीराम अखेर अयोध्येतील श्रीराम मंदिरात विराजमान झाले. श्रीरामांची संपूर्णपणे सजविण्यात आलेली मूर्ती पाहताक्षणी मन मोहून जाते. ही मूर्ती कर्नाटकमधील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडविली आहे.
■ या मूर्तीसाठी काळ्या किंवा श्यामल रंगाच्या कृष्णशिळा पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. नेमका याच पाषाणाचा वापर का झाला, याबाबत जाणून घेऊया…
■ श्रीरामांची मूर्ती कृष्ण शिळा या पाषाणापासून बनवली आहे. म्हैसूर तसेच त्याच्या जवळच्या भागात अशा प्रकारचे पाषाण विपुल प्रमाणात आढळतात.
■ वाल्मीकी रामायणात बालरूपी श्रीराम हे सुंदर श्यामवर्णी, कोमल आणि आकर्षक असल्याचा उल्लेख आहे. म्हणूनच मूर्तीसाठी श्यामल रंगाचा पाषाण वापरला.
■ पाषाणाला हजारो वर्षे काहीही होत नाही. अभिषेक व पूजेदरम्यान जल, चंदन, दूध इत्यादींचा वापर केला
जातो. यांचा कोणताही परिणाम पाषाणावर होणार नाही व मूर्तीचेही नुकसान होणार नाही.
■ या पाषणाची रचना ही मऊ असते. परंतु त्या नंतर च्या २-३ वर्षांच्या कालावधीत पाषाण अतिशय कठीण होतो. म्हणून पाषणावर आधी आकृती काढण्यात येते आणि नंतर त्यानुसार कोरीव काम केले जाते.