जागतिक कॅन्सर दिन ( Types of Cancer )
दिवसेंदिवस जगभरात कॅन्सर रुग्णाची संख्या वाढतच जात आहे आत्तापर्यंत 200 हूं अधिक प्रकारच्या कॅन्सर ची नोंद झाली आहे आणि डॉक्टर च्या म्हणण्यानुसार पेशंट च्या जेंव्हा लास्ट स्टेज ला असलेल्या वेळी जेव्हा ते शोधले जाते, तेव्हा त्याचे निदान करणे अत्यंत आव्हानात्मक असते आणि जगण्याची शक्यता देखील कमी होते; तथापि, या लेखात चर्चा केल्याप्रमाणे, तत्परतेने कार्य करून हा धोका कमी केला जाऊ शकतो.
जगतीक कॅन्सर दिन हा प्रत्येक वर्षी 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो . आयोजक संस्था, विश्व कॅन्सर सोसायटी, यांनी ह्या दिवशी विश्वा तील सध्याचं कॅन्सरसंबंधित समस्यांचं आणि त्याचं निवारण करण्याचे मोठे प्रयत्न केले .
या वर्षी, “कॅन्सरमुक्त जीवन” ही थीम आहे, ज्यामुळे मुलांपासून मुक्त आणि सुरक्षित जीवनसाठी आवश्यक असेलेली जागरूकता वाढवता येईल. ह्या दिवशी, विविध क्षेत्रातील चर्चांना, कार्यशाळांना, आणि लोकांसोबत सामूहिक चर्चेत योजना व जाहिरात केली जाईल.
जगतीक कॅन्सर दिनाचं उद्दीपन: सुरक्षित आणि सुखकर जीवन
कर्करोग म्हणून ओळखला जाणारा भयंकर आजार दिवसेंदिवस सामान्य होत चालला आहे. ह्या रोगाचं परिचय किंवा त्याचं नियंत्रण करणं, त्याचं मोठं हिंचं आहे. कॅन्सर एक अत्यंत अनियंत्रित रूपात विकसतो आणि या रोगाचं खिल्लं वाढतंय.
भारतातील प्रत्येक 9 जणांमागे एका व्यक्तीला कॅन्सर होण्याचा नक्कीच धोका असतो त्यात मग तो पुरुष असो किंवा महिला . ही गोष्ट इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज अॅंड इंफरमॅटिक्स अॅड (NCDIR) च्या संशोधनामध्ये ही बाब समोर आली आहे. देशात कॅन्सर रुग्णांची संख्या किती आहे आणि त्यामुळे किती मृत्यू झाले याचे उत्तर द्यायचे झाल्यास 2022 मध्ये जवळपास कॅन्सरचे रुग्ण 14,61,427 होते.ही संख्या 2021 मध्ये 14,26447 इतकी होती तर 2020 मध्ये भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या 13,92,179 एवढी होती.आणि ती दर वर्षी वाढतच जात आहे .
त्यामुळे कॅन्सर विषयावरील लोकांमधील जागरूकता असणे खूप गरजेचे आहे . सध्याच्या काळात कॅन्सर होण्यासाठी कोणत्याही वयाची अट राहिलेली नाही तो कोणालाही कधीही होऊ शकतो म्हणूनच तुम्ही नक्की काळजी घेऊ शकता आणि जागरूक राहून लवकरात लवकर याचे निदान करू शकता म्हणूनच कॅन्सर विषयी माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे ..
WHO आणि ग्लोबोकॅनच्या डेटानुसार महिलांमध्ये स्तन, सर्व्हाइकल, गर्भाशय, अंडाशय, लिप, ओरल कॅव्हिटी तसेच आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण आढळले आहे.पुरुषांना होणार्या कॅन्सरांमध्ये लिप, ओरल कॅव्हिटी, फुप्फुसांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण आढळले आहे. त्याबरोबरच अन्ननलिकेचा कॅन्सर हा पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
ग्लोबोकॅन ही कंपनी कॅन्सरग्रस्तांसंबंधी डेटाबेस गोळा करणारी अशी कंपनी आहे.
महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारे कॅन्सर पुढील प्रमाणे :
1. ब्रेस्ट किंवा स्तनाचा कॅन्सर :
कॅन्सरतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की तरुण मुलींमध्ये सध्या स्तनाच्या कॅन्सरची प्रकरणं समोर येत आहेत. स्त्री रोग आणि कॅन्सरतज्ज्ञ असे सांगतात की, हा स्तनांचा कॅन्सर अनुवांशिक असतो. जर आई किंवा आजी यांना कॅन्सर असेल तर हे जीन्स पुढील पिढीत येण्याची शक्यता जास्त असते.
भारतात या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून जागरुकता मोहीम चालवली जाते आहे. महिलांनी घरच्या घरी नक्कीच कॅन्सरची तपासणी कशी करावी या गोष्टीचा देखील यात समावेश आहे.
घरच्या घरी कशी करावी कॅन्सरची तपासणी हे आपण पाहू :
18 वर्षांपुढील मुलगी ही चाचणी करू शकते.
• मासिक पाळी झाल्यानंतर, आपल्या चार बोटांनी स्तनांमधील गाठ आहे की नाही हे तपासावे आणि काखेतसुद्धा दाबून गाठ आहे की नाही तपासायला हवे.
• स्तनाग्रांना दाबून पाहावे की त्यातून काही स्राव ,रक्त तर निघत नाहीये ना.
• जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात स्तनांचा कर्करोग आनुवंशिक आढळला असेल, ज्यात आईला 35 व्या वर्षीच ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे तर अशा स्थितीत मुलीची तपासणी ही पाच सहा वर्षांआधीपासूनच सुरू केली जाते.
• प्रत्येक महिलेनी आपली 40 ओलांडल्यानंतर दरवर्षी मेमोग्राफी करणे खूपच गरजेचे आहे.
जर संशयास्पद काहीही आढळले तर तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जागतिक कॅन्सर दिन (Types of Cancer)
2.सर्विकल कॅन्सर म्हणजेच गर्भाभय मुखाचा कर्करोग:
स्तनांच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे . या कॅन्सरचे मुख्य कारण म्हणजे ह्युमन पेपीलोमा व्हायरस हे आहे. आणि तज्ज्ञ सांगतात की हा कॅन्सर 100 टक्के बरा होऊ शकतो.
राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला थांबविण्यासाठी एचपीव्ही व्हायरसच्या लसीकरणाला युनिव्हर्सल इम्युनायजेशन मोहिमेत सामील करण्याची सल्ला दिली आहे. ह्यात म्हटले आहे की 9 ते 14 वर्षांच्या सर्व मुलींना या व्हायरसची लस देणे खूप गरजेचे आहे.
सुरुवातीला या कॅन्सरची लक्षणं आढळत नाहीत तरी पण जर पुसटशीही लक्षणं आढळली तर त्याला अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवे.
या व्हायरसला कॅन्सरमध्ये रुपातंरित होण्यास बराच काळ लागतो. पेपस्मिअर टेस्टद्वारे याचे निदान होऊ शकते.
3.ओव्हेरियन किंवा अंडाशयाचा कॅन्सर:
हा कॅन्सर तर शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे प्रत्यक्ष तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आल्यावरच तो समजतो. त्यामुळे या कॅन्सरला सायलेंट कॅन्सर असे देखील बोलतात .
तज्ञ असे सांगतात की या कॅन्सर मध्ये कॅन्सरची कोणतीही लक्षणं आढळत नाहीत . साधारणतः महिलांचे पोट फुगणे हे , भूक न लागणे , उलट्या होणे , गॅस पास न होणे किंवा शौचास गेल्यावर त्रास होणे असे त्रास होतात . अशी समस्या महिलांना फक्त एका महिन्यासाठी होते पण जर ही लक्षणं आढळली तर तो अंडाशयाचा कर्करोग असू शकतो हे विसरू नये .
परंतु जेव्हा डॉक्टर अशा महिलांच्या मेडिकल हिस्ट्रीबाबत जाणून घेतात तेव्हा असं कळतं की या सर्व महिलांची भूक कमी झाली आहे. त्या दोन चपात्यांऐवजी एक चपाती खात आहेत. त्यांना जास्त पचत देखील नाहीये आणि त्यामुळे त्या घरच्या घरीच छोटे मोठे उपचार करत राहिले होत्या .
त्यावर तज्ञ असा सल्ला देतात की महिलांनी दरवर्षी अल्ट्रासाउंड टेस्ट नक्की करून घ्यायला हवी. जेणेकरून त्यांना हे समजेल की रुग्णांच्या अंडाशयात सिस्ट आहेत की नाही आणि त्यावर उपचार वेळेवर सुरू करता येतील.
तसेच या व्यतिरिक्त महिलांमध्ये लिप, ओरल कॅव्हिटी आणि कोलोरेक्टम म्हणजेच मोठ्या आतड्यांचा कॅन्सर देखील आढळून येतो. हे कर्करोग पुरुषांमध्येसुद्धहा आढळतात.
पुरुषांमध्ये आढळणारे कॅन्सर
1.लिप , ओरल , कॅव्हिटी तसेच तोंडाचा कॅन्सर :
हेड-नेक सर्जन आणि ऑंकोलॉजिस्ट सांगतात की लिप तसेच ओरल कॅव्हिटी कॅन्सरचे प्रमाण हे 90 टक्के आशा लोकांमध्ये आढळते जे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन नहमीच करत आले आहेत .
डॉक्टरांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या कॅन्सरचे प्रमुख कारण कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन आणि दारू हेच असू शकते .
हा कॅन्सर तोंडाच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो . जसे की गाल, जीभ, जिभेचा खालचा भाग, टाळू या ठिकाणी. त्या ठिकाणी अल्सर आणि पुरळ येतात जे औषधोपचारानंतरही ठीक होऊ शकत नाहीत .
कॅन्सर तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, जर तुमच्या जीभेला काही जखम झाली किंवा दाताने तुमच्या जीभेला जखम केली असेल आणि औषधी घेऊन पण तीन आठवड्यांत ते पूर्ववत हे वाटत नसेल तरीही हा विषय चिंतेचा ठरू शकतो .तसेच अनेकदा असंही होतं की दात सैल होऊन पडतो आणि त्या ठिकाणी जखम होते.
तसेच या व्यतिरिक्त तोंडात काही ग्रोथ आढळली तर ती कॅन्सरची असेल असे नाही पण ती तुम्ही वेळवर तपासून घेतली पाहिजे. सोबतच जबडा पूर्णपणे उघडता येत नसेल तर हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.
या व्यतिरिक्त जेव्हा स्थिती गंभीर होते तेव्हा जखमेतून रक्तस्राव होऊ शकतो , आवाजात बदल होतो , वेदनेमुळे जेवण देखील जात नाही आणि त्यामुळे वजन हे कमी होतं.
जर ही लक्षणं आढळली आणि तीन आठवड्यांहून अधिक काळ औषधोपचार घेऊन देखील जर बरं वाटलं नाही तर तज्ञ डॉक्टराचा सल्ला हा घ्यायलाच हवा.
2. फुफ्फसांचा कॅन्सर :
डॉक्टरांचे म्हणणं असे आहे की या कॅन्सरला लोक टीबी या आजाराशी देखील जोडतात कारण यामध्ये रुग्णाला खोकल्याची तक्रार देखील कायम असते.
पण जर ही सारे लक्षणं तीन आठवड्यांहून अधिक काळ राहिली आणि औषधोपचारानंतर जर परिणाम जाणवला नाही तर डॉक्टर बायोप्सीचा सल्ला दिला जातो . याला घाबरू जाऊ नये तज्ञ डॉक्टर चा सल्ला अवश्य घ्यावा .
धूम्रपान हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे मुख्य कारण आहेच पण अलीकडील काळात मात्र वाढत्या प्रदुषणामुळे देखील हा कॅन्सर होत असल्याचे दिसून आले आहे. हा कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत असल्यावरच लक्षात येतो हे याचे दुख आहे .
3.इसोफॅगस किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर :
डॉक्टरांच्या म्हणन्यानुसार हा कॅन्सर वयाची पन्नाशी गाठल्यानंतरच या कॅन्सरबद्दल समजतं. या कॅन्सरमुळे अन्न गिळताना त्रास होतो तसेच काही पिताना देखील त्रास होऊ शकतो.
ज्याना सातत्याने अॅसिडिटीची तक्रार ज्या लोकांमध्ये असते किंवा सातत्याने तोंड आंबट पडण्याची लक्षणं ज्यांच्यात नेहमी आढळतात त्याच लोकांत या कॅन्सरचं प्रमाण आढळतं.
या व्यतिरिक्त ही लक्षणं आढळतात.
• पचनाची समस्या ,
• छातीत जळजळ होणे ,
• काही अडकल्यासारखे वाटणे
डॉक्टरांच्या मते जे लोक जाड असतात, वजन वाढलेले असते ,जे दारू पितात आणि धुम्रपान करतात त्या लोकांमध्ये हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.
4.कोलोरेक्टल किंवा मोठ्या आतड्यांचा कॅन्सर :
तज्ञ सांगतात की या कॅन्सरमुळे शरीरात रक्ताची कमी जाणवते तसेच अशक्तपणा जाणवतो .
साधारणतः महिलांमध्ये हिमोग्लोबिन चे प्रमाण 12-15 ग्राम डेसीलीटर असावे आणि पुरुषांमध्ये हे प्रमाण 13.5 ते 17.5 ग्राम डेसीलीटर असावे.
[ जागतिक कॅन्सर दिन (Types of Cancer) ]