Ashtvinayak ganapti theur | थेउर च्या चिंतामणी ची संपूर्ण माहिती इतिहास व 2 पौराणिक कथा

Ashtvinayak ganapti theur श्री चिंतामणी – थेऊर :-

ब्रह्मासृष्ट्यादिसक्त स्थिरमतिरहितः पीडितो विघ्नसंधै ।

आक्रांतो भूतिरक्त कृतिगुणरजसा जीवता त्यत्कुमिच्छन ।।

स्वात्मानं सख्यभक्त्या गणपतिममलं सेव्यचिंतामणीयम ।

मुक्तश्चास्थापयंतं स्थिरमतिसुखदं स्थावरे ढुंढि मीडे ।।२।।

अर्थ :- सृष्टी निर्माता ब्रह्मदेवाप्रमाणे ज्याचे चित्त चंचल झाले आहे. जो अनेक संकटांच्या हल्ल्यामुळे त्रासलेला आहे, जो आनंदाच्या शोधात आहे. स्वकर्मामुळे जो जीवनाचा त्याग करू इच्छितो. त्याने ब्रह्मदेवाप्रमाणे स्थावर म्हणजेच थेऊरक्षेत्री स्थापना झालेल्या स्थिरचित्त व सुखदायी अशा चिंतामणीची (Ashtvinayak ganapti theur)आराधना करून चित्त चांचल्य नष्ट करून घ्यावे.प्रजापती ब्रह्मदेवाच्या मनात एकदा थर्व म्हणजे चंचलपणा निर्माण झाला. चित्त स्थिर व्हावे म्हणून त्याने श्रीगणेशाची आराधना केली. ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे चित्त स्थिर झाले. ती जागा म्हणजे स्थावर क्षेत्र अथवा थेऊर. मुंबईहून खंडाळ्याचा बोरघाट ओलांडून पुण्यनगरीत प्रवेश केला की, अष्टविनायकाच जवळचे स्थान म्हणजे थेऊर. पौराणिक आणि ऐतिहासिक महात्म्य लाभलेले थेऊर अनेक कारणांसाठी प्रसिध्द आहे.

Ashtvinayak ganapti theur

(Ashtvinayak ganapti theur)श्रीक्षेत्र थेऊरचे भौगोलिक स्थान व मार्ग  :

पुणे जिल्हयात हवेली तालुक्यात पुण्यापासून २५ कि.मी. वर थेऊर येथे श्रीचिंतामणी विनायकाचे मंदिर आहे. थेऊरला तिन्ही बाजूंनी मुळा-मुठा नदीचा वेढा पडला आहे. थेऊरला जाण्यास अनेक मार्ग आहेत.

पुण्याच्या सारसबाग किंवा पूलगेट बस-स्थानकावरून थेऊरला जाण्यासाठी पी.एम.टी. च्या गाड्या सुटतात. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसरच्यानंतर लोणीच्या पुढे ३ कि.मी. अंतराव डाव्या बाजूला थेऊरचा फाटा आहे. थेऊरला फक्तऊसाची शेती आहे. जवळच वसंतराव नाईक सहकारी साखर कारखाना आहे. ऊसाचे ट्रकच्या ट्रक भरून जाताना येथे दिसतील. थेऊरला राहून मनसोक्त ऊस जरूर खावेत.

(Ashtvinayak ganapti theur)चिंता दूर करणाऱ्या श्रीचिंतामणीची पौराणिक कथा :-

फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव गुणवती. या ऐश्वर्यसंपन्न राजाराणीला एकच दुःख होते, त्यांना मूलबाळ नव्हते. वैशंपायन ऋषींच्या उपदेशावरून राजाराणीनी अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या केली. तपश्चर्येचे फळ म्हणून त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलाचे नाव त्यांनी गण असे ठेवले. गण मोठा होऊन गणराजा या नावाने प्रसिध्द झाला.
गणराजा जितका शूर व पराक्रमी होता, तितकाच स्वभावानेही रागिटही होता. एकद गणराजा कपिलमुनींच्या आश्रमात गेला. कपिलमुनींनी त्याचे यथोचित स्वागत केले आणि आपल्याजवळील इच्छापूर्ती करणाऱ्या चिंतामणीरत्नाच्या साहाय्याने गणराजास पंचपक्वानांचे भोजन दिले. चिंतामणीचे सामर्थ्य पाहून गणरायाला या रत्नाचा मोह पडला. त्याने ते रत्न कपिलमुनींकडे मागितले. पण त्यांनी ते रत्न देण्यास नकार दिला.

Ashtvinayak ganapti theur

त्यामुळे गणराजा रागवला आणि त्याने बळेच ते रत्न कपिलमुनींकडून हिरावून नेले. याप्रकारामुळे कपिलमुनी अतिशय दुःखी झाले. त्यांना दुर्गादेवी प्रसन्न होती. देवीनी त्यांना विनायकाची उपासना करण्यास सांगितले. विनायक प्रसन्न झाले आणि कपिलमुनींनी विनायकाकडे चिंतामणी रत्नाची मागणी केली. विनायकाचे व गणासुराचे कदंब वृक्षाखाली युध्द झाले आणि गणासुर युध्दात मारला गेला.विनायकाला चिंतामणी रत्न मिळाले. परंतु कपिलमुनींना आता त्या रत्नांबद्दल ओढ राहीली नव्हती.

Moreshwar Ashtvinayak मोरगावचा श्री मोरेश्वर का म्हणतात 1 ला अष्टविनायक गणपती व त्यामागच्या 2 कथा

त्यांनी नम्रतापूर्वक ते रत्न स्वीकारण्यास नकार दिला आणि चिंतामणी विनायकाच्या गळ्यात बांधला. तेव्हा विनायक अधिकच आनंदी झाला. या रत्नाची आठवण म्हणून त्याने चिंतामणी विनायक हे नाव धारण केले. कपिलमुनींनी गणेशमूर्तीची येथे स्थापना केली. ही घटना कदंब वृक्षाखाली घडली म्हणून थेऊरला प्राचीनकाळी कदंबनगर असे नाव होते व तेथील विनायक तो चिंतामणी विनायक.

Ashtvinayak ganapti theur

(Ashtvinayak ganapti theur)चिंतामणी विनायकाची दुसरी पौराणिक कथा :-

गौतम ऋषींची सुखरूप भार्या अहिल्या हिच्या रूपाची मोहिनी इंद्रदेवास पडली. एकदा गौतम ऋषी स्नानास गेलेल असता, इंद्र गौतमाचे रूप घेऊन आश्रमात आला आणि त्याने अहिल्येस फसवले. तेवढयात गौतमऋषी स्नान आटोपून आश्रमात परतले. अंतर्ज्ञानाने त्यांस घडलेली गोष्ट कळली. त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी इंद्राला शाप दिला. शापामुळे इंद्राच्या शरीराला हजारो छिद्रे पडली. छिद्रामधून दुर्गंधी येऊ लागली. इंद्र गयावया करू लागताच, गौतमऋषींनी इंद्रास विनायकाची पूजा करावयास सांगितली.

इंद्राने गणेशाचे स्तवन केले पूजन करताच श्रीगणेश प्रसन्न झाले. गणेशाच्या वरामुळे इंद्राच्या शरीरास छिद्रांमधून येणारी दुर्गंधी नाहीशी झाली. तसेच गौतमऋषींच्या उषःशापामुळे त्या हजार छिद्रांनी इंद्राला पाहता येऊ लागले. तो सहस्त्राक्ष म्हणजे हजार • डोळ्यांचा म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या सरोवरात इंद्राने स्नान केले. त्या सरोवराला चिंतामणी सरोवर म्हणतात. इंद्राने ज्या कदंबवृक्षाखाली गणेशाची तपश्चर्या केली. त्या कदंबवृक्षाखाली जी वस्ती वाढली तेच आजचे थेऊर.

Ashtvinayak ganapti theur

(Ashtvinayak ganapti theur)चिंतामणी विनायकाचे मंदिर व मूर्ती :

मुळा-मुठा नदीच्या पाण्यावर अलीकडे हिरवी वनस्पती वाढलेली दिसते. मंदिराजवळ नदीत एका ठिकाणी खोलगट भाग असून तेथे पाण्याचा डोह बनला आहे. या डोहाला ” कदंबतीर्थ “असे नाव आहे श्रीचिंतामणीचे (Ashtvinayak ganapti theur) मंदिर भव्य असून महादरवाजा उत्तराभिमुख आहे. महादरवाजापासून थेट मुळा-मुठा नदीपर्यंत पेशव्यांनी पक्की सडक बांधली आहे. मंदिराचा सभामंडप लाकडी असून, सभामंडपात काळ्या दगडातून घडवलेला एक कारंजा पाहायला मिळतो.

मंदिरासमोर ओवऱ्या आहेत. मंदिराभोवतीचे आवार फरसबंद व प्रशस्त आहे. आवारात शिवशंकराचे छोटे देऊळ आहे, एक मोठी घंटा पाहायला मिळते. चिंतामणी गणपतीचे मंदिर मोरया गोसावी यांच्या कुळातील धरणीधर महाराज देव या सत्पुरूषाने बांधले. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराचा सभामंडप बांधला. त्यानंतर हरिपंत फडके व इतर गणेशभक्तांनी वेळोवेळी मंदिराची दुरूस्ती करून त्याच्या सुरक्षितेत व सौंदर्यात भर घातली. पूर्वी मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा दिलेला होता. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आणि पूर्वाभिमुख आहे. विनायकाच्या डोळ्यात मणिक-रत्न आहेत.

Ashtvinayak ganapti theur

 (Ashtvinayak ganapti theur)उत्सव :-

भाद्रपद प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत तर माघात अष्टमीला थेऊरला मोठा उत्सव असतो, त्या काळात एकेका दिवशी जवळपास असणाऱ्या देवळात जाऊन श्रीगणेशाची पूजाअर्चा, नैवेद्य केला जातो त्याला द्वारयात्रा असं म्हणतात. संकष्टीला, अंगारकीला कित्येकजण अन्नदान करतात. त्यांना स्वयंपाकाची भांडी, जागा पुरवली जाते. कार्तिक वद्य अष्टमीला रमा-माधवांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होतो.

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

थेऊरचे थोर सत्पुरुष :-

चिंचवडचे मोरया गोसावी यांनी थेऊरच्याच अरण्यात उग्र तपश्यर्चा | केली होती. मोरया गोसावींच्या उग्र तपश्यर्चेमुळे श्रीगणेश वाघाच्या रूपात अवतीर्ण झाले. मोरया गोसावींनी त्यांच्याकडे आपल्या प्रेमळ व निर्भय दृष्टीने पाहिले असता, ते दोन क्रुर वाघ नाहीसे झाले आणि त्यांच्या जागी वाघांची मुखे असलेल्या दोन शिळा दिसू लागल्या. जणू काही प्रत्यक्ष • चिंतामणीच वाघांच्या रूपाने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी आले होते.

 

(Ashtvinayak ganapti theur)थेऊरचे ऐतिहासिक महत्व :-

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे चिंतामणी हे आराध्य दैवत. त्यांचा वाडा मंदिराच्या जवळच होता. आज तिथे बाग केली आहे. शेवटच्या आजारात माधवराव पेशवे ह्याच वाड्यात राहत होते. त्यांनी येथील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दुखणे विकोपाला गेल्यावर त्यांनी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम केले. अखेरीस गजानन गजानन म्हणत त्यांनी आपले प्राण चिंतामणीच्या चरणावर अर्पण केले. त्यांच्या पत्नी रमाबाई, माधवराव पेशव्यांबरोबर सती गेल्या. त्या जागी म्हणजे मुळा-मुठा नदीच्या काठावर आज सतीचे वृंदावन आहे. तो दिवस होता १८-११-१७७२, कार्तिक वद्य अष्टमी. यादिवशी नदीकाठच्या सतीच्या वृंदावनात रमा – माधव पुण्यतिथी उत्सव होतो.
अन्य उपयुक्त माहिती :-
१) ह्या देवस्थानाला औरंगजेब बादशहाची सनद होती असे सांगतात. सध्या ह्या देवस्थानची व्यवस्था चिंचवड देवस्थानकडे आहे.
१२) देवस्थानाकडून अभिषेक, एकादशणी, सहस्त्रावर्तने इ. धार्मिक कार्यक्रम केले जातात. पोस्टाने प्रसाद व अंगारा पाठवतात.
॥ श्री ब्रह्मवरदश्चिंतामणीर्गणेशे जयति ।।

Moreshwar Ashtvinayak मोरगावचा श्री मोरेश्वर का म्हणतात 1 ला अष्टविनायक गणपती व त्यामागच्या 2 कथा

2 thoughts on “Ashtvinayak ganapti theur | थेउर च्या चिंतामणी ची संपूर्ण माहिती इतिहास व 2 पौराणिक कथा”

Leave a Comment

EMAIL
Facebook