[ Chaturthi Mahatv ] चतुर्थीचे महत्व :-
[Chaturthi Mahatv] विष्णूची एकादशी, शंकराची शिवरात्री तशी गणपतीची चतुर्थी. ही चतुर्थी गणपतीला अत्यंत प्रिय आहे. श्री गणेशअथर्वशीर्षातही ” चतुर्थ्यामनश्नन जपती ” असा चतुर्थीचा निर्देश केला आहे. चतुर्थी म्हणजे तुरियावस्था तो गणपती अवस्थात्रयातीत म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे म्हणजे तुरीया, चौथ्या अवस्थेत असताना त्याचे स्वरूपदर्शन होऊन साक्षात्कार होत असतो. याकरिता चतुर्थीचे विशेष महत्व आहे.
संकष्टी चतुर्थी :
दर महिन्याच्या वद्य पक्षातील (दुसरा पंधरवडा) चतुर्थीला हे व्रत करावे. यादिवशी सबंध दिवसभर उपोषण करून रात्रौ गणपतीची पूजा करून नैवेद्य दाखवून व चंद्रदर्शन घेऊन मग उपोषण सोडाक्याचे असते. कोणत्याही संकटाच्या परिहारासाठी हे व्रत करण्याचा प्रघात आहे.
यादिवशी संध्याकाळी स्नान वगैरे करून श्रीगणेशाची षोडषोपचारे पूजा करावी. पूजेच्यावेळी ज्या कामनेसाठी व्रत करत असाल त्याचा संकल्प करावा. संकट निवारण करण्याची देवाला विनंती करावी. एकवीस दुर्वा समर्पण कराव्यात. आरती ओवाळून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर चंद्रपूजा करून चंद्राला नैवेद्य दाखवावा व ब्राह्मणास भोजन घालून उपवास सोडावा. अशाप्रकारे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. यादिवशी | चंद्राचे दर्शन घ्यावेच…
विनायकी चतुर्थी : प्रत्येक महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. पण त्या उपवासाचे पारणे दुसऱ्या दिवशी (उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा) करावे. ज्यादिवशी अंगारकी विनायकी योग असतो तो दिवस फार महत्वाचा.
अंगारिका : मंगळवारी संकष्टी आली म्हणजे तिला अंगारिका असे म्हणतात. यादिवशी संकष्टीप्रमाणेच पूजाअर्चा व उपवास करावा व तो त्याच दिवशी सोडावा.
एका अंगारिका व्रताचे माहात्म्य २१ सकंष्टी व्रताबरोबर आहे. तरी भाविकांनी अंगारिका व्रत नेहमी आचरावे.[Chaturthi Mahatv]| [ चतुर्थी चा उपवास ]
पौराणिक कथा :-
भारद्वाज मुनींचा पुत्र भौम्य (भूमीच्या उदरी जन्म झाला म्हणून) याने गजाननास प्रसन्न करून माझे नाव त्रिभुवनी विख्यात होवो तसेच ज्या चतुर्थीस तू मला प्रसन्न झाला ती चतुर्थी कल्याणकारी होवो.” असा वर मागितला. गजानन म्हणाले, “तुझे ” मंगल ” हे नाव प्रसिद्ध होईल. तुझा अंगवर्ण लाल असल्यामुळे तुलाअंगारक ही म्हणतील.” वर मिळाल्यावर मंगलाने त्या ठिकाणी गणपतीचे देवालय बांधून त्यात गणपतीच्या सुंदर मूर्तीची स्थापना केली. त्या मूर्तीचे नाव त्यानेमंगलमूर्ती असे ठेवले. नंतर गणेशाच्या दूतांनी या भूमीपुत्रास विमानातून गणेशाच्या चरणापाशी नेले. चतुर्थीच्या दिवशी गणपती प्रसन्न झाले म्हणून भौमवारी येणाऱ्या चतुर्थीचे महात्म्य मोठे आहे. भौमाचे दुसरे नाव अंगारक, म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारकी म्हणतात. हे मंगलमूर्तीचे स्थान पारनेरच्या पश्चिमेस आहे. त्यालाच ” चिंतामणी क्षेत्र ” म्हणतात.
गणपतीला दुर्वा वाहताना करायचा २१ नावांचा उच्चार
१) गणाधिपाय नमः
२) उमापुत्राय नमः
३) अभयप्रदाय नमः
४) एकदंताय नमः
५) इभवक्राय नमः
६) मूषक वाहनाय नमः
७) विनायकाय नमः
८) ईशपुत्रायनमः
९) सर्वसिद्धीप्रदाय नमः
१०) लंबोदराय नमः
११) वक्रतुंडाय नमः
१२) अधनाशकाय नमः
१३) विघ्नविध्वंसकर्मे नमः
१४) विश्ववंधाय नमः
१५) अमरेश्वराय नमः
१६) गजवक्राय नमः
१७) भालचंद्राय नमः
१८) परशुधारणे नमः
१९) विगघ्नाधिपाय नमः
२०) नागयज्ञोपवितीने नमः
२१) सर्वविद्याप्रदायकाय नमः
Ganeshpatri Uses | दूर्वा सोडुन अजून 21 गणेशपत्री कोणत्या व त्यांचे औषधी उपयोग जाणून घ्या !
भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India
संकष्टनाशन महागणपती स्तोत्रम् (मराठी अनुवाद)
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका | भक्तिने स्मरता नित्य आयुष्यकामार्थ साधती || १ ||
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते | तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ||२|| पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव ते |
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ||३|| नववे श्री भालचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावे गणपती बारावे गजानन ||४||
देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर | विघ्नभीती नसे त्याला प्रभो त सर्वसिद्धिद ||५||
तू विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती ||६||
जपता गणपतीस्तोत्र सहा मासात हे फळ | एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्री धराने मराठीत पठण्या अनु वादिले |||८||
गणपतीच्या आरत्या :
सुखकर्ता दुखहर्ता ० वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रे म् कृपा जयाची ||
सर्वांगी सुंदर ० उटि शेंदुराची | कंठी शोभे माळ मुक्ताफळांची ||धृ.||
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती ||१||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुम केशरा ||
हिरेजडित मुकुट शोभतो बरा | रूणझुणजी नुपुरे चरणी घागरीया |
जयदेव जयदेव ० जय मंगलमूर्ती | ० दर्शनमात्रे मन कामना पुरती ||२||
लंबोदर पितांबर फणिवर बंधना | सरळ सोंड वक्र-तुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना |
सकंटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना || जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
| दर्शनमात्रे मन कामना पुरती ||३।।
दुसरी आरती :
नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रे | लाडू मोदक अन्ने पूरित पात्रे ||
ऐसे पूजन केल्या बीजारक्षमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे ।।१।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती | तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ||धृ.||
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलहि पापे विघ्ने हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवंती ।
सर्वही पावुनि अंती भवसागर तरती ।। जय देव ।।२।। नलिने
शरणागत सर्वस्वे सर्वस्वे भजती तव चरणी । किर्ती तयांची राहे जोवर शशितरणी ।।
त्रैलोक्यी ते विजयी अद्भूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी || जय देव जय देव० ||३।।
शेवटी मंत्रपुष्पांजली नक्की म्हणावी |
॥ श्री मंगलमूर्ती मोरया ॥
Chaturthi Mahatv
अष्टविनायक व्यतिरिक्त महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने | 21 Famous Ganesh Temple
krushnjanmbhumi history मंदिराचा इतिहास: तोडफोड आणि पुनरुज्जीवन
1 thought on “2024 Chaturthi Mahatv | तर यामुळे करतात महाराष्ट्रीयन लोक चतुर्थी चा उपवास..”