संस्कृत तसेच मराठी गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ | Ganapati Athrvashirsh Meaning

[Ganapati Athrvashirsh Meaning ] गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ :-

संस्कृत तसेच मराठी गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ | Ganapati Athrvashirsh Meaning ]गणपती ही विद्येची देवता आहे. विघ्न दूर करणारा विघ्नविनाशक त्यामुळे गणपतीची पूजा प्रार्थना गेल्या कित्येक शतकांपासून सुरू आहे.
कलियुगात श्रीगणेश ही सत्वर पावणारी देवता आहे. पण तिची योग्य ती सेवा, उपासना, साधना केल्यास त्याचे फल सत्वर मिळते. गणपतीची पूजा करताना गणेश अथर्वशीर्ष नेहमी म्हटले जाते. अथर्वशीर्ष म्हणजे “ओम् नमस्ते गणपतेय”पासून सुरू होऊन “वरदमूर्तये नमः ” पर्यंत संपलेले श्लोक. याचे एकदा पठण केले असता एक आवर्तन होते. अशी एकवीस आवर्तने म्हटली असता एकादशनी होते. काही भाविक १०८ किंवा १००० आवर्तनांचा अभिषेक करतात. शेवटच्या आवर्तनाच्यावेळी ” एतद्धर्वशिर्ष योऽधीते ” पासून पुढील फलश्रुती म्हणजे अथर्वशीर्ष म्हणण्याचे फळ म्हणावे. अशा तऱ्हेने पूर्ण अथर्वशीर्ष म्हटले जाते.
स्वतः अथर्वशीर्षाची आवर्तने करणे इष्ट संस्कृत येत नसले तर मराठी अनुवादही अपेक्षित वेळा वाचावा. भक्तिभावाने केलेली उपासना देवाला पोहचते. [Ganapati Athrvashirsh Meaning ]

।। अथ श्रीगणपत्यथर्वशीर्ष प्रारंभः ।।

श्री गणेशाय नमः (शांति मंत्र)

ओम् भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रंपश्चेमाक्षभिर्यजत्रः ।।

स्थिरैरंगैस्तुष्टुवासस्तनूभिः । व्यरोम देवहितं यदायु ।।

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।।

| स्वस्तिनस्ताक्ष्यों अरिष्टनेमिः । स्वस्ति मो प्रहस्पतिर्दधातु ।।२।।

ओम् शांतिः । शांति ।। शांति ।।।

अर्थ : हे देवांनो। आपण कानांनी शुभ ऐकावे आणि डोळ्यांनी पवित्र पाहावे. उत्तम अवयव व सुदृढ शरीराने युक्त होऊन तुमची उपासना व स्तुती करीतच तुम्ही दिलेले हे आयुष्य व्यतित करावे. । ।१ ।।
महाकिर्तीमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न व वैभवसंपन्न पूषा देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही असा आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो. वाणीचा अधिपती देवगुरू आम्हाला श्रेय प्राप्त करून देवो. व्यक्तींमध्ये शांतता नांदो. समाजात शांतता नांदो, जगामध्ये सर्वत्र शांतता नांदो. ।।२ ।।

Ganapati Athrvashirsh Meaning  गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ

।। अथ गणेशाथर्वशीर्ष व्याख्यास्यामः ।।

।। ॐ नमस्ते गणपतेय ।।

त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ।। त्वमेव केवल कर्ताऽसि त्वमेव केवल धर्ताऽसि ।।

त्वमेव केवल हर्ताऽसि ।| त्वमेव सर्व खल्विंद ब्रह्मासि ।। त्वं साक्षादात्मासि नित्यम ।।१ ।।

अथर्वण ऋषी म्हणतात :-

: हे ओंकारस्वरूपी गणेशा । ब्रह्मादि देवगणांचा तू स्वामी आहेस. तुला माझा नमस्कार असो. हे गणपते । प्रत्यक्ष ब्रह्मत्व केवळ तूच आहेस. सर्व विश्वाचा कर्ता केवळ तूच आहेस. तूच एकटा या सृष्टीचा पालनहार आहेस. हे विश्वव्यापक ब्रह्मही तूच आहेस. तसेच अविनाशी असे आत्मस्वरूप प्रत्यक्ष तूच आहेस.

ऋतमं वाच्मि ।। सत्यं वाच्मि ।।२।।

मी यथार्थ व त्रिकालप्राधित सत्य तेच बोलत आहे.

अव त्वं मां ।। अव वक्तारं ।। अव श्रोतारं ।। अव दातारं ।।

अव धातारं ।। अवानूचानमव शिष्यं ।। अव पश्चातात ।। अव पुरस्तात ।।

अवोत्तरात्तात ।। अव दक्षिणात्तात ।। अव चोर्ध्वात्तात ।।

अवधरात्तात ।। सर्वतो मां पाही पाही समंतात ।।३।।

हे गणेशा । तू माझे रक्षण कर. तुझ्या रूपगुणांचे वर्णन करणाऱ्या वक्त्याचे रक्षण कर. तुझा महिमा ऐकणाऱ्या श्रोत्याचे रक्षण कर. तुझ्यासंबंधी ज्ञान देणाऱ्या दात्याचे रक्षण कर. ते धारण करणाऱ्याचे रक्षण कर. वेद- वेदांगाचे अध्ययन केलेल्यांचे रक्षण कर. शिष्याचे रक्षण कर. माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर. पूर्वेकडून रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर. दक्षिणेकडून रक्षण कर. वरच्या बाजूने माझे रक्षण कर. खालच्या बाजूने माझे रक्षण कर. सर्व आसमंत भागाकडून माझे रक्षण कर.

त्वं वाडःमयस्त्वं चिन्मयः । त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय ।।

त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मसि ।

। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।।४।।

तू वाणीरूप आहेस. तू चैतन्यरूप आहेस. तू आनंदमय आहेस. तू सत् चित् आणि आंनद याहून अद्वितीय आहेस. म्हणजे तू सच्चिदानंदरूप आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस.

सर्व जगदिदं त्वत्तो जायतो । सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।।

सर्व जगदिदं त्वयि लयमेव्याति । सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति ।। त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नमः । त्वं चत्वारि वाकपदानि ।।५।।

हे सर्व जग तुझ्याठिकाणीच विलीन होते. हे सर्व जग तुझ्याठिकाणीच प्रत्ययास येते. भूमी, उदक, वायू, तेज व आकाश ही पंचमहातत्त्वे तूच आहेस. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी ही वाणीची चार स्थानेही तूच आहेस.

त्वं गुणत्रयातीतः ।। त्वमवस्थात्रयातीतः ।।

त्वं देहत्रयातीतः ।। त्वं कालत्रयातीतः ।।

त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं ।। त्वं शक्तीत्रयात्मकः । ।

त्वां योगिनो ध्यायांति नित्यं ।। त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं ।।

रूद्रस्त्वं, इंद्रस्तवं, अग्निस्त्वं, वायुसत्वं, सूर्यसत्वं, चंद्रमास्त्वं, ब्रह्मभूर्भुवः स्वरोम ।।६।।

तू त्रिगुणांच्या पलीकडील आहेस. तू तीन अवस्थांच्या पलीकडील आहेस. तू तीनही प्रकारच्या देहांच्या पलीकडील आहेस. तू तीनही काळांच्या पलीकडील आहेस. तू नेहमी नाभिकमलातील मूलाधार चक्राच्या ठिकाणी राहतोस. तीन शक्ती तुझीच रूपे आहेत. जीवनमुक्त योगी सतत तुझेच ध्यान करीत असतात. तू सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आहेस. तू सृष्टीपालक विष्णू आहेस. तू सृष्टीसंहारक शंकर आहेस. तू त्रिभुवनाधिपती इंद्र आहेस. तू अग्नी आहेस. तू वासूदेव आहेस. तू सूर्य आहेस, चंद्र आहेस.
तू शाश्वत व अविनाशी असे ब्रह्म आहेस. पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग तूच आहेस आणि ओंकारसुद्धा तुझेच रूप आहे.

गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ

गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादि तदनंतर ।। अनुस्वारः परतरः ।।

अर्धेन्दुलसितं ।। तारेण ऋद्धं ।। एतत्तव मनुस्वरूप ।। मकारः पूर्वरूपं

।। आकारो मध्यमरूप ।। अनुस्वारश्चान्त्यरूपं ।। बिन्दुरूत्तररूपं ।।

नादः संधानं संहितासंधिः ।। सैषा गणेशविद्या ।। गणक ऋषी ।।

निचृद्गायत्रीच्छंदः ।। गणपतिर्देवता ।। ॐ गं गणपतेय नमः ।।७।।

गण शब्दातील आदी वर्ण ग्; आहे. हा ग् कार प्रथम उच्चारावा. वर्ण म्हणजे अक्षरे. त्यातील पहिला वर्ण “अ”; आहे. तो आकार त्या “ग्’ नंतर उच्चारावा. त्यापुढे अनुस्वार. हा अनुस्वार अर्धचंद्राकृतीने सुशोभित असावा. म्हणजे तो अनुनासिकासहित उच्चारावा. अशा तऱ्हेने गँ हे रूप सिद्ध झाले. तार म्हणजे प्रणव (ओम). ह्या ओमकाराने गँ हे अक्षर युक्त असावे. अशा तऱ्हेने ओम गँ हे मंत्राक्षर सिद्ध झाले. हे देवा ;ओम गँ; हे तुझ्या सर्वश्रेष्ठ एकाक्षर मंत्राचे स्वरूप आहे. ग् हा पहिला वर्ण. अ कार हे मध्यमरूप म्हणजे “;अ” हा मधला वर्ण आणि अनुस्वार हे अंत्यरूप म्हणजे तो शेवटी आहे व शेवटी अनुनासिक चिन्ह आहे. ह्या चारही वर्णाचे एकीकरण करणारा एक नाद-सारखा स्वर असावा. अशा प्रकारे ॐ गँ ही गणेशविद्या आहे. ह्या विद्येचा गणक हा ऋषी आहे. निचृद्गायत्री हा छंद आहे आणि गणपती ही ह्या मंत्राची देवता आहे. “;ओम गँ” असा हा मंत्र. ह्या मंत्ररूप गणपतीला माझा नमस्कार असो.

एकदंताय विद्महे । वक्रतुंडाय धीमही ।। तन्नो दंतिः प्रचोदयात ।।८।।

आम्ही त्या एकदंत गणपतीला जाणतो त्या वक्रतुंड गणेशाचे आम्ही ध्यान करतो. म्हणून तो गणपती आम्हाला सद्भक्तीची प्रेरणा देवो.

एकदंत चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् ।

रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।।

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम । रक्तगंधनुलिप्तांगं रक्तपुष्पै सुपूजितम्

।। भक्तानुकंपि देवं जगत्कारणमच्युतम् ।। विर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्

।। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिना वर ।।९।।

त्याला एकच उजवा दात आहे. त्याला चार हात असून त्यामध्ये वरील उजव्या हातात पाश व डाव्या हातात त्याने अंकुश धारण केला आहे. खालील उजव्या हातात हत्तीचा दात आहे तर उजव्या हातात वरदमुद्रा धारण केलेली आढळते . उंदिर हे त्याचे वाहन आहे. त्याचप्रमाणे तो लालवर्णाचा व लंबोदर असून त्याचे कान सुपासारखे आहेत. त्याने लाल वस्त्रे परिधान केली असून त्याच्या अंगाला रक्तचंदानची उटी लावलेली आहे व रक्तपुष्पाने त्याची पुजा केली आहे. आपल्या भक्ताच्या बाबतीत तो देव अत्यंत कृपाळू आहे. तो सर्व जगाचे आदिकरण आहे. तो अविनाशी असून सृष्टीच्या आधीच प्रगट झालेला आहे. शिवाय प्रकृती व पुरूष यांच्यापलीकडचा आहे. अशा गणपतीचे जो नित्य ध्यान करतो तो सर्व
योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी आहे .

नमो व्रातपतये । नमो गणपतेय ।

नमः प्रमथपतये नमस्तेऽतु लंबोदरायैकदंताय ।

विघ्ननाशिने शिवसुताय । श्रीवदरमूर्तये नमो नमः ।।१०।।

देवसमुहांच्या स्वामीला नमस्कार असो. गणांच्या अधिपतीला नमस्कार असो. शिवगणांच्या अधिपतिला नमस्कार असो. लंबोदर गणेशाला नमस्कार असो. एकदंत गणपतीला नमस्कार असो. विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीला नमस्कार असो. शिवपुत्र गणेशाला नमस्कार असो. इच्छित वर देणारी मूर्ती अशा या गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो.

येथून पुढे अथर्वशीर्षाची फलश्रुती सुरु होते.

एतदथर्वशीर्ष योऽधीते । स ब्रह्मभूयाय कल्पते ।।

स सर्वतः सुखमेधते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते ।। स पन्चमहापापत्प्रमुच्यते ।

सायं मधीयानो दिवसकृतं पापं नाश यति || प्रातर धीयानो रात्रि कृतम् पापं नाश यति ||

सायंप्रातः प्रत्युजानो अपापो भवति || सर्वत्रधियानोऽ पविघ्नो भवति |

धर्मार्थ काममोक्षं च विदति || इदम अथर्वशीर्षमशिष्याय न देयम् ।

यो यदि मोहादद्स्सति स पापीयान भवति || सहस्त्रावर्तनात् ययंकाममधीते तं तमनेने साधयेत ||।११।।

अथर्वशीर्षाचे जो मनापासून अध्ययन करतो तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. त्याला कोणत्याही विघ्नांची मुळीच प्राधा होत नाही. त्याला सगळीकडे सुख मिळते. पाच महापातकांतून मुक्त होतो. अथर्वशीर्षाचे संध्याकाळी पठण करण्याऱ्यांची दिवसाची पापे नाश पावतात. सकाळी पठण करणारा रात्री केलेल्या पापातून मुक्त होतो. सकाळी तसेच संध्याकाळी जो मनुष्य पठण करतो तो पूर्ण निष्पाप होतो. अथर्वशीर्षाचे नेहमी पठण
करणाऱ्याला कोणतीही विघ्ने येत नाहीत. त्याला चार पुरूषार्थाची (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) प्राप्ती होते. हे अथर्वशीर्ष ज्याला श्रद्धा नाही किंवा जो याचा दुरूपयोग करील त्याला शिकवू नये. मोहाने किंवा अज्ञानाने जर हे शिकवले तर तो अत्यंत पापी होईल. याची सहस्त्र आवर्तने केली असता जी इच्छा करावी ती पूर्ण होते. [ गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ ]

गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ

अनेन गणपतिमाभिषिंचती ।। स वाग्मी भवती ।।

चतुर्थ्यामनश्वन जपती स विद्यावान भवती ।। इत्यथर्वणवाक्यं ।।

ब्रह्माद्यावरणं विद्यात् ।। न विभेति कदाचनेति ।।१२।।

अथर्वशीर्षाच्या जपाने गणपतीला अभिषेक करणारा उत्तम वक्ता होतो. चतुर्थीच्या दिवशी निर्जल उपवास धरून याचा जप करणारा विद्यासंपन्न होतो असे अथर्वणऋषींचे वचन आहे. ब्रह्मादिकांवर मायेचे आवरण आहे. ते नीट जाणून घ्यावे. असा मनुष्य कोठेही, कधीही घाबरत नाही.

यो दुर्वांकुरैर्यजति ।। स वैश्रवणोपमो भवति ।

यो लाजैर्यजति सयशोवान भवतीस मेधावान भवती ।।

यो मोदकसहस्त्रेण यजति स वाच्छित फलमवाप्नोति ।।

यः साज्यसमिभ्दिर्यजति स सर्वं लभते व सर्व लभते ।।१३।।

जो दुर्वांकुरांनी हवन करितो तो कुबेरासारखा धनवान होतो. जो भातांच्या लाह्यांनी हवन करतो तो किर्तीमान तसेच बुद्धीमान होतो. जो सहस्त्रमोदकांनी हवन करतो त्याला इच्छित फल प्राप्त होते. जो तुपासहित समिधांनी हवन करतो त्याला सर्व काही मिळते.

अष्टौ ब्राह्मणान सम्यग्गाहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति ।।

सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जरत्वा सिद्धमंत्रो भवती ।।

महाविघ्नात्प्रमुच्यते ।। महादोषात्प्रमुच्यते ।।महापापात प्रमुच्यते ।।

स सर्वाविभ्दवर्ति स सर्वविभ्दवति ।। य एवं वेद इत्युपनिषद ।।१४।।

जो गणेशभक्त आठ ब्राह्मण विद्यार्थ्यांना हे अथर्वशीर्ष उत्तम रीतीने समजावून सांगतो तो सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणाच्यावेळी गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरीसारख्या नद्यांवर उभे राहून किंवा गणपतीच्या मूर्तीजवळ बसून एक सहस्त्र किंवा एक लक्ष वेळा याचा जप केला असता जप करणारा सिद्धमंत्र म्हणजे मंत्रात सांगितलेले फल तात्काळ प्राप्त होण्याचे सामर्थ्य प्राप्त होणारा होतो. असा जप करणारा सर्व विघ्नांतून दूर होतो. मोठ्या दोषांमधून मुक्त होतो. महापातकांतून मुक्त होतो. जो जाणतो तो सर्वज्ञानी, असे हे अथर्वणोपनिषद आहे.

ओम सह नाववतु । सह नौ भुनक्तु ।।

सह वीर्य करवावहै । तेजस्विनावधी नमस्तु मा विद्धीषावहै ।।

हे ज्ञान आम्हा दोघांचेही संरक्षण करो. आम्हा दोघांनाही सारखेच उपयोगी पडो. आम्ही दोघे मिळून पराक्रम करू. आम्हा दोघांचेही अध्ययन तेजस्वी असो. आही कधीही परस्परांचा द्वेष करणार नाही. यानंतर परत ओम भद्रं कर्णेमि शृणुयाम देवाः पासून ओम शांतिः शांतिः पर्यंतचा श्लोक म्हणावा व अथर्वशीर्ष पूर्ण करावे.

मराठी गणपती अथर्वशिर्ष :-

नमन तुजला गणपतये । प्रत्यक्ष तत्त्व तूच अससि ।

जगत कर्ता तूज अससि । जगत धर्ता तूच अससि ।।

आदि ब्रम्ह तूच अससि । नित्य अविनाशी आत्मा तुज अससि ।।१ ।।

निती तत्त्वाचे हे वचन । अखंड सत्य हे वचन ।।२।।

मजला रक्षी स्तवितांना । मजला रक्षी ऐकतांना ।

मजला रक्षी भक्ती कतांना । मजला रक्षी तुला पुजतांना ।

पश्चिम संकटे तारी । पूर्व संकटे तारी उत्तर संकटे तारी ।

दक्षिण संकटे तारी । उर्ध्व संकटे तारी ।अधर संकटे तारी । सर्व संकटे तारी ।।५।। –

तू वाणीस्वरूप चिन्मयरूप । तू आनंदरूप ब्रम्हरूप ।

तू सत्चित् अद्वितय आनंदरूप । तू साक्षात ब्रम्हमयी । तू साक्षात्कारी ज्ञानमयी ।।४।।

कृपेने तुझ्या जगाची उत्पत्ती । कृपेने तुझ्या जगाची उन्नती ।

कृपेने तुझ्या जग एकरूप । कृपेने तुझ्या जग मोक्षरूप । रूपे तुझी भूमि आप तेज वायू आकाश ।

कृपेने तुझ्या चार वाणींचा प्रकाश तू तिन्ही गुणांच्या अतीत।

तिन्ही अवस्थांच्या अतीत। तु तिन्ही देहांच्या अतीत ।

तू तिन्ही काळांच्या अतीत। मुलाधर चक्रात नित्य तुझा निवास ।

तिन्ही विश्वशक्ती हाच तुझा श्वास। योगी जन नित्य धरिती तुझा ध्यास ।

तू ब्रह्मा, तू विष्णू, तू रूद्र, तू अग्नी, तू वायू, तू सूर्य, तू चंद्र, तू ब्रह्म, भू आणि भवः । तू स्वः आणिक तुज ॐ कार ।।६।।

प्रथमोच्चार गण नंतर आदिवर्ण। तद्नंतर अर्धचंद्र, अनुस्वाराचे स्मरण ।

गणनायका हेच तुझ्या मंत्राचे स्वरूप जाण ।।७।।

पूर्वरूपांत गकार। मध्यरूपांत अकार ।

अन्त्यरूपात अनुस्वार । उत्तररूपात बिंदूकार ।

नाद सर्वाचा एक, उच्चार सर्वाचा एक। अशी ही गणेश विद्या पावन ।

ऋषी ज्याचा असे गणक । निचृद गायत्री छंद एक।

ॐ स्वरूपी या गणपतीला वंदन असो त्रिवार ||८||

ज्ञान प्राप्त करितो गणपतीचे । ध्यान करितो वक्रतुंडाचे ।

मागतो एकदंताजवळ प्रेरणारूप हे भक्तीचे ।

स्वरूप ज्याचे एकदंत । शोभती त्यास चार हात ।

पाश अंकुश आयुधे त्यांत ।वरदान देत नित्य अनंत ।

मूषकध्वज तो लंबोदर । शुर्पकर्ण रक्त वस्त्र सुंदर ।

रक्त चंदन भाळी अंगी ज्याच्या शेंदूर ।

कृपा करितो निरंतर भक्तांवर । विश्वाचे जो आदिस्थान ।

तो तया स्थानी स्थिर । सृष्टी निर्मिती आधी जो मुर्तिमंत ।

ज्याचे स्थान प्रकृति व पुरूष यांत ।

ध्यान त्याचे करी जो भक्त । तो समजावा श्रेष्ठ अत्यंत ।।९।।

सर्वजनांच्या रक्षकास नमस्कार। शिवगणांच्या रक्षकास नमस्कार ।

प्रमथादी गणांच्या रक्षकास नमस्कार। लम्बोदर एकदंता तुजनमस्कार ।

संकटनाशका तुज नमस्कार। शिवसुता तुज नमस्कार ।

सर्व भक्तांना वर देणाऱ्या। वरदमुर्तये तुज नमस्कार ।

।।ॐ गं गणपतये नमः । ।

अष्टविनायक व्यतिरिक्त महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने | 21 Famous Ganesh Temple

Ashtvinayak ganapti theur | थेउर च्या चिंतामणी ची संपूर्ण माहिती इतिहास व 2 पौराणिक कथा

Ashtvinayak Lenyadri ganapti | अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती संपूर्ण माहिती

Moreshwar Ashtvinayak मोरगावचा श्री मोरेश्वर का म्हणतात 1 ला अष्टविनायक गणपती व त्यामागच्या 2 कथा

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

2 thoughts on “संस्कृत तसेच मराठी गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ | Ganapati Athrvashirsh Meaning”

Leave a Comment

EMAIL
Facebook