Ganeshpatri Uses [ 21 गणेशपत्री कोणत्या ]: आज आपण गणेशपत्रि बद्दल माहिती घेणार आहोत. गणेशपत्रि ची अनेक विविध प्रकार आणि नावे आहेत त्याबद्दल आज आपण ह्या लेखात जाणून घेऊ.
गणेशपत्री ची नावे व उपयोग : Ganeshpatri Uses
1] मधुमालती [ hiptage benghalesis ] :
मधुमालती ही खूप औषधी वनस्पति आहे . मधुमालतीच्या पानाचा वापर जखम किंवा कोणतीही सूज कमी करण्यासाठी करतात . तसेच कुष्ठरोगासाठी देखील याचा वापर होतो . कफ आणि संधिवात हे देखील कमी होतात .
2] माका [ Eclipta alba ]:
कावीळ , मूळव्याध , यकृतची सूज , सांधेदुखी व त्वचेचे आजार कमी करण्यासाठी माका उपयुक्त ठरतो . त्याचप्रमाणे केसा चे सौंदय आणि आरोग्य वाढवण्यासाठी माका चे तेल चांगले ठरते .
वेगन डायट म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण तुमच्या साठी खरच फायद्याचे आहे का ? .
3] बेल [ Aegle marmelos ] :
बेळफल हे अतिसार , आतड्यांचे विकार यावर गुणकारी आहे . तर पानांचा रस मधूमेहावर उपयुक्त आहे .
4] दूर्वा [Cynodom dactylon ] :
दूर्वा ही वनस्पति बुध्दी वर्धक , शक्ति वर्धक असून थंड गुणाची आहे . याच्या रसाच्या लेपणाणे त्वचेचा दाह कमी होतो . आम्लपित्तावरी दुर्वाचा रस उपयुक्त आहे ,डोळ्याचे विकार , सर्दी खोकला यावर देखील गुणकारी आहे.
5] बोर [ Zizyphus mauritiana ]:
याचे फळे , बिया , पाने ,खोड हे सर्व भाग औषधी आहेत . कफ , पित्त, ताप , अतिसार , त्वचारोग यावर उपयुक्त आहे .
6] धोतरा [ Dhatura metel ] :
या वानस्पतीचा उपयोग त्वचारोग , डोळ्यांचे विकार , मूळव्याध , मूतखडा यावर होतो .
7] तुळस [ Ocimum Sanctum ] :
सर्दी खोकल्यासाठी पानांचा काढा गुणकारी असतो . तसेच अपचन , ढेकर , पोटदुखी , कानदुखी यावरही पानांचा रस उपयुक्त .
8] आघाडा [ Achyranthus aspera ] :
मूळव्याध , पोटाचे विकार , अतिसार , बद्धकोष्ट यावर गुणकारी आहे .
9] शमी [ Prosopis cineraria ] :
दाहशामक दमा , ब्रोंकाएटिस , कुष्ठरोग , अतिसार , जुलाब यावर गुणकारी .
10] जाई [ Jasmimum grandiflorum ] :
मूळ व फुले आयुर्वेद युनानी औषधामध्ये वापरतात . पित्त , तोंड येणे , त्वचारोग यावर गुणकारी .
11 ] अगस्ती हादगा [Sesbamia grandiflorum ]:
ताप , सर्दी , खोकला , डोकेदुखीवर गुणकारी
12] केवडा किंवा [ pandamus odoratissimus ] :
पाने , फुले औषधी , डोकेदुखी , पोटदुखी , जखमा यावर उपयुक्त .डोरली / रानवांगे [ olamum indicum ] : कफ, सर्दी , दम्यावर गुणकारी , पानाचा रस पोटदुखीवर उपयुक्त , याच्या मुळांचा वापर दशमुळारिष्टत केला जातो .
13] कण्हेर [ nerium indicum ] :
तेल विंचवच्या चावण्यावर उपयुक्त , मूळव्याध , सूज यावर उपयुक्त
14] आपटा [ Bauhinia racamosa ] :
साल , पाने, शेंगा , आणि बिया औषधी पित्त आणि कफदोषावर गुणकारी व दहशामक खोडाच्या सालीच लेप जखमा व सूज यावर लावतात .
15] रुई मंदार [ Calotropis gigantea ] :
कुष्टरोग , कफ, पोटाचे विकार यावर गुणकारी . न्यूमोनिया , सायनसला सूज येणे , दमा या विकारामध्ये उपयुक्त .
16] अर्जुन सादडा [ Terminalia arjuna ] :
जखम भरून येण्यास सालीचा काढा उपयुक्त , हृदयाच्या शिथिलतेवर खोडाची साल अत्यंत गुणकारी , मोडलेले हाड सांधण्यास सालीचा वापर करतात . कानदुखीवर अर्जुनाच्या पानांचा ताजा रस कानात घालतात .
17] विष्णूक्रांत [ Evolvulus alsinoides ] :
अल्सर , कावीळ , मधुमेहावर उपयुक्त
18] डाळिंब [ Punica granatum ] :
खोकल्यावर फळाची साल उपयुक्त , तोंडात धरून चघळल्यास खोकला बरा होतो .
19] देवदार [ Cedrus deodara ] :
डोकेदुखी , अंगदुखी , सर्दी , चर्मरोग , पोटदुखी यावर उपयुक्त
20] मरवा [ Origanum marjorama ] :
चर्म रोगावर , पोटदुखीवर यावर उपयुक्त
21] निर्गुडी किंवा पिंपळ [ Vitex negundo ]:
सूज , संधिवात , डोकेदुखी , यावर याची पाने अतिशय गुणकारी .पिंपळ : खोडकी साले त्वचविकार व अल्सरवर उपयुक्त पाने तोतरेपणा , तोंड येणे यावर उपयुक्त
तर ह्या झाल्या सगळ्या Ganeshpatri ची माहिती .
माहिती धर्मा विषयी |धर्माच्या समानतेची
हिंदू धर्म :
‘वेदाsखिलो धर्म मूल ‘ : हे वचन आपणास दर्शविते की , वेद हे धर्माचे मुळ कारण
आहे .
आज उपलब्ध असलेले ज्ञान साधनेदवारे विज्ञान , गणित, ज्योतिष आदि
शास्त्राणदवारे अनेक प्रामाणिक विचारवंतांनी वेदतील मंत्र , देवदेवतांना केलेल्या प्रार्थना , स्वर्ग , मृत्यू यांवर असलेल्या देवदेवता , नक्षत्र , ग्रह यांची वर्णने , हवामान’, ऋतु , पिके, कृषि
इत्यादि वेदांतील विभाग तसेच यज्ञ याग या सर्वांचा विचार वेदांमध्ये आहे . वेदांना
अमूर्त अर्थात ईश्वरचेच दुसरे रुप मानले असून वेद हे ईश्वरणेच व्यक्त केलेले ज्ञान
मानण्यात येते . या अर्थाने वेद हे अनंत असून त्यांना समजण्यासाठी ‘बादरयान’ जे नारदाचे अवतार मानले जातात त्यांनी वेद चार
भगत लिहिले म्हणून त्यांना ‘वेद व्यास ’असे म्हणतात . ‘क्रूनवणतो विश्वं आर्यम ’
हे ब्रीदवाक्य आर्यानी स्वीकारून आर्य धर्माची पताका विश्वात फडकावली . मानवी
जिवनाचे एहिक व पारलौकिक पोषण ज्यामुळे
होते , तो मानवी जीवनाचा पोषणकर्ता , एक विचार संग्रह तसेच ज्या श्रेष्ठ वैचारिक मूल्यामुळे प्रजेचे सुख ,संगोपन , धारण, पोषण होते त्याला धर्म असे म्हणतात .
‘धर्मो धारेयते प्रजा : ’ अर्थ –प्रजेला धरण करतो तो धर्म .
धर्माच्या माध्यमातूनच महापुरुषांनी मानवकल्याणासाठी प्रयत्न केले . ईश्वर एक आहे आणि सर्वांना सुखी ठेवन्याचे तत्व सर्व धर्मातून सांगितले जाते . ईश्वर सर्वाना जन्म देतो , पालन करतो व मृत्यू देतो हे एकमत आहे म्हणून हिंदू मध्ये ब्रहमानडणायकला ॐ (अ = अस्तित्व (विष्णु )+ उ =उत्पत्ति (ब्रह्मा )+ म =मृत्यू (शिव ) )तर हेच ख्रिश्चन मध्ये God (Generator=धारक + Operator= सृजक + Destroyer=संहारक ) तसेच मुस्लिम मध्ये अल्लाह (अलीफ =धारक + लाम =सृजक + ह = संहारक )असे म्हणतात .
परस्परांवर प्रेम करणे ,एकात्मता , सहिष्णुता व सलोखा हेच सर्व धर्मांच्या तत्वज्ञानाचे आणि आचारचे सार आहे .
आयुर्वेदाचे 8 प्रकार :
1)शल्यचिकित्सा
2)शालक्य
3) कायाचिकित्सा
4)भूतविद्या
5)कौमार्यभृत्य
6)अंगडतंत्र
7)वाजीकरण
8)रसायन
१४ विद्या ६४ कला कोणत्या :
१४ विद्या आणि ६४ कला कोणत्या याबद्दल जाणून घ्यायची सर्वांची उत्सुकता असते चला तर मग जाणून घेऊया :
१४ विद्या : यामध्ये चार वेद + सहा वेदांगे + न्याय , मीमांसा ,पुराणे व धर्मशास्त्र आशा एकूण १४ विद्या असतात .
चार वेद हिंदू संस्कृतीचा पाया :1) ऋग्वेद 2)यजुर्वेद 3) सामवेद 4) अथर्ववेद
चार वेदाची सहा वेदांगे : 1)शिक्षण 2)कल्प 3)व्याकरण 4) निरुक्त (वेदतील शब्दार्थ )5)छंद 6)ज्योतिष
६४ कला : भारतीय संस्कृतीत असलेल्या ६४ कला पुढीलप्रमाणे : गायन , वाद्य , नृत्य , नाट्य , लेख , विशेष प्रकारचे छंद , फुलांच्या कला , रागकला , मनॅोंभूमिक , कर्मभूमिकला , आंथ्रून कला , पाण्यावरचे वाद्य , पाण्यावरचे घात , चित्रकला , फुलांच्या माळा करणे , पर्वत कला , पडद्यावरची कला , कानकला , गंधाचे कला , दागिन्यांची कला , हत्तीची कला , हस्तकला , फळांचा स्वाद घेण्याची कला , नानाप्रकरचे रस पालन करण्याची कला , कपडे शिवण्याचि कला , अनेक प्रकारचे सूत काढण्याची कला , शब्दरचना कला , कापण्याची कला , भुर्जपत्रावरची कला , पुस्तक वाचण्याची कला , नाटकाचे आख्यान दर्शन कला , काव्याने प्रश्नोत्तरे करण्याची कला , भुजावरची कला , तर्क कला , मारण्याची कला , घर तयार करण्याची कला , हीरे माणिक रत्न ओळखण्याची कला , वेगवेगळे धातू ओळखण्याची कला , काचमणी ओळखण्याची कला , न्हाव्याची कला , झाडांचे आयुष्य ओळखण्याची कला , मेंढा कोंबडा यांचे युद्ध लावण्याची कला , पोपट साळुंकी यांचे संभाषण एकण्याची कला , वेगवेगळ्या प्रकारचे केशरचणा पद्धती , हस्ताक्षर ओळखण्याची कला , मांस ओळखण्याची कला , फुलांचे ज्ञान असण्याची कला , यंत्राची माहिती असण्याची कला , कुठलेही कार्य करण्याची कला , मनाचे विचार कव्यात सांगण्याची कला , ज्ञान कला , विविध प्रकारचे कार्य करण्याची कला , छळवाद कला , वस्त्र तयार करण्याची कला , कठल्याही गोष्टीचे आकर्षण करण्याची कला , लहान मुलांचे खेळ खेळण्याची कला .
सहा शास्त्रे :1)वैश्विक 2) न्याय 3) मीमांसा 4) सांख्य 5) योग 6)वेदान्त
अष्टांग योग :यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी
संस्कार अवस्था : सोळा 16 संस्कार :जन्म ते मृत्यू आणि मृत्यू नंतरचे संस्कार
वेदाचे उपवेद :-
आयुर्वेदाचा उपवेद :आयुर्वेद
यजुर्वेदाचा उपवेद :धनुरवेद
सामवेदाचा उपवेद : गांधर्ववेद
अथर्ववेदाचा उपवेद : अथर्ववेद
चार वर्णव्यवस्था (कर्मनुसार ,गुण ):
1)ब्राहमन 2) क्षत्रिय 3) वैश्य 4)शूद्र
चार पुरुषार्थ : धर्म अर्थ काम मोक्ष
पंचमहाभूते :1)पृथ्वी 2) वायु 3)आकाश 4)पानी 5)अग्नि
वंश सूर्यवंश : भगवान श्रीराम , रामायण , गोत्र :वसिष्ठ , वंश –सूर्य , चंद्र वंश : भगवान श्रीकृष्ण
धर्मग्रंथ :गीता
उपनिषदे एकूण : १०८
स्मृति ग्रंथ एकूण १०८
एकूण १८ पुराणे :ब्रम्ह पद्म विष्णु वायु मार्कंडेय अग्नि भविष्य ब्रह्मवैवर्त स्कंद वामन कूर्म मत्स्य भागवत नारद लिंग वराह गरुड ब्रह्मांड
आमच्या यूट्यूब चॅनल ला भेट दया