Garudpuran: What happens to our soul after death प्रथम आपला स्थूल असा देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो,
पिकलेले झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे हा देह जमिनीवर पडतो.
यावेळेस देहातील जे दहा प्राण असतात ते क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडतात,
या दहा प्राणांची नावे अशी आहेत
Garudpuran:प्रथम या देहाची मृत्यू पूर्विची अवस्था काय असते ?
Garudpuran: प्रथम या देहाची मृत्यू पूर्विची अवस्था काय असते व आपण कारायला हवे ते पाहु.
शरीर कृश झालेले असुन तोंडातील दात पडलेले असतात ,
डोळ्यांनी दिसणे बंद होते,
कानाने ऐकू येणे बंद होते,
घशाची घरघर सुरू होते,
श्वास मंद होतो,
स्मृती नाहीशी होते,
वाचा बंद होते,
अशी लक्षणे दिसली की मृत्यू समीप आला आहे असे समजून घ्यावे .
अशा वेळेस मृत समयी त्याचे मन शांत असणे अत्यंत आवश्यक असते.
मरण प्रसंगी मरणाऱ्या व्यक्तिची अवस्था ही फार विचित्र असते,
केलेल्या कृतकर्माचा पश्चात्ताप होत असतो,
कळतनकळत केलेल्या पापांबद्दल दुःख होत असते,
संतती, संपत्ती, आप्त, गोत यांच्या बद्दल मोह निर्माण होतो व
मनाची चलबिचलता वाढते.
त्यामुळे मनाची शांतता नाहीशी होते व एक प्रकारची चमत्कारिक अशी अवस्था निर्माण होते.
अशा वेळेस पूर्व आयुष्यातील केलेली पापे डोळ्यासमोर चित्रपटा सारखी दिसु लागतात.
केलेले अपहार वदुसऱ्याची केलेली फसगत डोळ्यासमोर दिसु लागतेव एकप्रकारचे भय निर्माण होते,बोलता येत नाही,
तगमग तगमग अशी अवस्था निर्माण होते.अशा वेळेस मनःशांतीची फार गरज असते. म्हणून सुखासमाधानाने मरण येण हे सुद्धा फार मोठी ईश्वरी कृपा समजावी विनासायासेन मरणम् |
मानवी शरीरातील शक्ति केंद्र | अष्ट चक्र कोणते
मरण जवळ आल्यावरची तयारी
घरातील माणसांनी जमीन गाईच्या शेणाने सारवावी, ( जमीन नसेल तर फरशी स्वच्छ पुसुन घ्यावी )त्यावर सुगंधी द्रव्य शिंपडावे,
घोंगडी किंवा लोकरीच्या आसनावर मरणाऱ्या व्यक्तीस दक्षिणेकडे डोके करून, वर तोंड करून झोपवावे .तुळशीपत्र, भस्म, चंदनाचे गंध, गंगाजल, तुळशीतील माती इत्यादिने त्याचे शरीर सुशोभीत करावे.पुत्राच्या मांडीवर त्याचे डोके ठेवावे.देवासमोर समयी लावावी,सुगंधी अगरबत्ती लावावी,त्याच्या हाताचा स्पर्श करून अनेक प्रकारचे दान केले गेले पाहिजे .घराची दारे खिडक्या उघडी ठेवावीत.घरातील सर्वांनी रामरक्षा, पुरूष सूक्त,रूद्रसूक्त, विष्णुसहस्रनाम,भगवत् गीतेचा नववा,बारावा व पंधरावा अध्याय म्हणावा.
वैखरीने श्रीराम जय राम जय जय राम जप करावा,
घरातील वातावरण शांत व प्रसन्न ठेवावे जेणे करुन मृतकाला शांत मरण यायला हवे .पुढच्या गतीकरता हे सर्व अत्यंत गरजेचे आहे.
यंयंवापि स्मरणभावान त्यजंत्यंते कलेवरम् |किंवाअंते मति सा गति या न्यायानेअंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम् |
अशा शांत वातावरणात ईश्वराचे नामस्मरण ऐकता ऐकता मरण आले तर निश्चितच त्याला उत्तम गती प्राप्त झालेली असते .
|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
प्रथम आपला स्थूल असा देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो,पिकलेले झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे हा देह जमिनीवर पडतो.यावेळेस देहातील जे दहा प्राण असतात ते क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडतात.
या दहा प्राणांची नावे अशी आहेत
१) प्राण ,
२) अपान ,
३) व्यान ,
४) उदान ,
५) समान ,
६) नाग ,
७) कूर्म ,
८) कृकुल ,
९) देवदत्त ,
१०) धनंजय .
सर्वात शेवटी धनंजय हा वायु शरीरातुन बाहेर पडतो कारण हा वायु देहाला अग्नी स्पर्श होई पर्यंत देहात असतो असे गरूड पुराणात (Garudpuran) सांगितले आहे. त्यानंतर आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो , तेंव्हा या देहाला पूर्ण मरण येते. आत्मा तर अजरामर आहे. देहा भोवतीच तो आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करण्यासाठी न्यावे लागते , सर्व लोक जमा झाल्यावर शांततेणे व प्रसन्न वातावरणात प्रेत यात्रा काढावी.
प्रथम प्रेताला कोमट पाण्याने स्नान घातले गेळे पाहिजे शरीर स्वच्छ करावे कारण ते अग्नीच्या मुखात द्यायचे असते.
आपल्या जीवनातला हा शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी असे म्हणतात.
अंत म्हणजेच् शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ.
स्नान घालुन शरीर स्वच्छ कपड्याने पुसावे, शरीरास सुगंधी अत्तर लावावे, त्याच्या गळ्यात चंदनाची किंवा तुळशीची माळ घालावी,
सपूर्ण शरीर शुभ्र वस्राने गुंडाळावे फक्त चेहरा व पाय उघडे ठेवावेत, उरलेले वस्त्र हे उत्तरीय वस्त्र म्हणून अग्नी देणाऱ्याने अग्नी संस्काराच्या वेळेस गळ्यात घालायचे असते.
याच वस्त्रात अश्मा बांधुन त्या दहा दिवस घराबाहेर ठेवायचे असते, कारण याच अश्म्यावर जीवात्मा दहा दिवस बसलेला असतो. हे उत्तरीय वस्त्र बाराव्या दिवसा पर्यंत क्रिया कर्म करताना वापरायचे असते, बारा दिवसा पर्यंत या उत्तरीय वस्त्राची गाठ सोडायची नसते .
प्रेताला ताटीवर सुतळीने घट्ट बांधावे, प्रेतावर फुले व तुळशी वहाव्या तसेच गंगा ठेवावी. प्रेत चौघांनी खांद्यावरून न्यावे किंवा गाडीतून न्यावे सर्वात मोठ्या मुलाने किंवा धाकटयाने अग्नी शिंकाळ्यात घेवुन सर्वात पुढे चालावे, मागे वळुन पाहु नये, प्रेत व अग्नी याच्या मधुन कोणी जावु नये.वृद्धास पुढे करून प्रेता मागे वृद्ध मंडळींनी चालावे आणि मागुन बाकीच्या मंडळींनी चालावे. आणि ज्यांना स्मशानात जाणे शक्य नसेल त्यांनी चार पावलेतरी प्रेताच्या मागुन चालाले पाहिजे . हे एक सत्कर्मच असते .
अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या youtube Channel श्रवण तरंग ला Subscribe करा
अर्ध्या रस्त्यात गेल्यावर किंवा जिथे विसावा असतो तिथे जमिनीवर एक नाणे व सुपारी ठेवुन क्षणभर प्रेत खाली ठेवावे,
पुढील खांदेकरांनी मागे यावे व नंतर मागच्यांनी पुढे जावे.
ज्यांच्या पत्नीला दिवस गेले असतील त्यांनी मात्र खांदा देवु नये हे लक्षात ठेवावे .
स्मशानातील भूमी शेणाने प्रोक्षण करावी, दहन भूमीच्या वायव्य दिशेस अग्नी ठेवावा.पाच हात लांब व तीन हात रूंद चिता रचावी.
व पुढील संस्कार करावेत.