Gudhipadwa 2024 गुढीपाडवा संपूर्ण माहिती व 3 पौराणिक कथा |

गुडीपडवा (Gudhipadwa) माहिती  :

चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा Gudhipadwa म्हणतात. वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरूवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदीत होते, हिरव्या रंगबिरंगी छटा झाडा- फुलांवर खुलून दिसतात, वसंतऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्तहस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरूवात होते. मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नंको का करायला ?

गुढीपाडव्याचे Gudhipadwa महत्व :

चैत्रचा अर्थ- नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्षप्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व हीच चैत्र शुध्द प्रतिपदा होय. पण ;चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते, तो चैत्रमहिना. चैत्र हा शब्द ;चित्र; या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे.

चित्र म्हणचे विविध. वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते. अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो.
हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहुर्तापैकी गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे ;गुढी; म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज.

याच दिवशी ब्रम्हदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली, प्रभु रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून, रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या-तोरणे उभारून दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस गुढीपाडवा.

Gudhipadwa
Gudhipadwa

पुराणांमध्ये दिलेली ६० संवत्सरे आहेत. त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजयदिन म्हणुन ओळखला जातो.

शालीवाहन राजाच्या विजयदिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला ‘शालीवाहनशक’ म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे.
प्राचीन काळी चेदी देशात वसु नावाचा राजा राज्य करीत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असतांना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला श्रृंगारून, भक्तिभावाने तिची पूजा करून, ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासुन गुढी उभारण्याची प्रथा सुरू आहे.


गुढी आपल्याला काय सांगते ?

मुलांनो नवीन वर्ष सुरू झालयं, नवीन विचार करा, संकल्प करा, सद्विचार – सदाचार यांची झेप, आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या, सेवेत सातत्य असू द्या.”
गुढीपाडवा Gudhipadwa पूजा विधी :

या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करून कडूलिंबाचा कोवळा पाला, फुले, स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोवळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहीत बांधावे त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचे कंकण, हार घालावे व पुढील ध्यानमंत्र म्हणावा.

ब्रम्हध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभिष्ट फलप्रद । प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू ।
हा मंत्र म्हणून झाल्यावर ‘ॐ ब्रम्हध्वजाय नमः।’

या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी.

पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी. नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे.

दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात एक व्यक्ती जेवण करेल एवढा नैवेद्य अर्पण करावा व नैवेद्य स्विकारण्याची प्रार्थना करावी, नंतर एक वडाची मुळी व रंगारी हिरडा कुटुंबप्रमुखाने हातात धरून त्यावर १ माळ सामुदायिक जप ।। श्री स्वामी समर्थ ॥ मंत्राचा करावा.

नंतर त्याची पंचोपचार पूजा करावी, त्या वस्तू लाल कापडात बांधुन घराचे प्रवेश द्वाराचे चौकटीच्या खिळ्यास टांगावे. यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व अनेक बाधा, संकटे यांपासून संरक्षण होते.


सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबांचा पाला खातात. तो फार कडु असतो म्हणुन त्याबरोबर गुळ खातात. हा पाला कडु असला तरी आर्युर्वेदशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. तो खाल्याने आरोग्य, बल, बुध्दी आणि तेज वाढते. कडुनिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहिसा होतो, मेंदुला तरतरी येते. खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास याच दिवशीसुरूवात केली तर उत्तम.

प्रगतीपथावर जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळ कडू घोट प्यावे लागतातच, याचीही त्यातुन प्रचिती मिळते.
मंदिरात मिळणाऱ्या कडुनिंबमिश्रित साखरेच्या प्रसादाच्या पाठीमागे अतिशय मधुर भावना लपलेली आहे. “जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही. सुखाच्या मागेच दुःख असते आणि दुःखामागुनच सुखाचे आगमन होते.” अस्मिता व समर्पणवृत्ती यांच्या समन्वयाने बनलेल्या या मानवाने न डगमगता हसत मुखाने विघ्नांचा सामना करावा व जीवनात येणाऱ्या सुखदु:खांनी निराश न बनता, गरज पडली तर अनंत कडू घोट पिऊनही प्रभुकार्यात कटिबध्द होऊन उभे रहावे. असा संदेश हा उत्सव आपणास देत असतो.


पूजेचे साहित्य-

गुढीकरिता पितळेचे, तांब्याचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाचा डगळा, साखरेची गाठीहार, जरीचा खण, कापड किंवा साडी, फुलांची माळ व वेळुची काठी इ. साहीत्य घेऊन गुढीला, हळदकुंकू वहावे दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा शेवग्याच्या शेंगाची कढी करावी. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन (सरस्वतीपूजन) करावे.


पाटीपूजनाची तयारी-

पाटीवर चंद्रसूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात. हळदकुंकू, अक्षता, पैसे, सुपारी, फुले, गुळ-खोबरे, उदबत्ती, फळ वाहून पूजा करावी. गुढी सायंकाळी ४ वाजेच्या आत केव्हाही उतरावी. गावात रामाचे देऊळ असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करवी.

गुढी उतरवण्यापुर्वी हळद कुंकू अक्षता वाहुन पूजा करून मग उतरावी.
आजच्या दिवशी सेवेकऱ्यांनी महाराजांच्या सेवा कार्यातील खरे सैनिक बनण्याचा संकल्प करायचा आहे.

तसेच मिळालेले जीवन हा महाराजांचा प्रसाद आहे आणि मिळत असलेले वैभवही महाराजांचे पादोदक आहे, ही भावना श्रध्दा दृढ करायची आहे व महाराजांच्या सेवा कार्याला लागायचे आहे. असे झाले तरच गुढीपाडवा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखा होईल.

पौर्णिमेला करावयाची सत्यनारायण पूजा संपूर्ण विधी व माहिती |Paurnima puja vidhi satyanarayan puja|

या सणाविषयी रामायणातील कथा आहे की-
कथा – १: Gudhipadwa

प्रभु रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी १४ वर्षे वनवासात काढली. यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्राच्या येण्याचीच वाट पहात होता. १४ वर्षे पूर्ण झाली.

उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभु रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळुन घ्यायचे असे त्याने ठरवले, तशी तयारी पण केली व मनोमन राम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला एवढ्यात नवल घडले महाबली वीर हनुमान पुढे आला, भरतास वंदन करून त्याने श्रीराम येत असल्याची सूचना दिली.
भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा, श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा, सर्वत्र आनंदी-आनंद झाला नंदीग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुंगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांचे पुष्पक विमानखाली उतरले. श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते. श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण अयोध्या नगरी दणाणुन गेली. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली ते दृश्य पाहुन अयोध्या वासियांच्या डोळ्यात आनंदाश्रुंचा पुरच लोटला


रामाने उचलोनी ते समयी ।
भरत दृढ धरिला हृदयी ।
तो देखावा काय वर्णावा ।।


लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे “गुढीपाडवा’ तेव्हापासुन ही परंपरा सुरू झाली.

कथा २ : Gudhipadwa

चेदी नावाचा एक देश होता. तेथे वसु नावाचा राजा राज्य करीत होता. राजा मोठा गुणी आणि धार्मिक होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी समाधानी होती. पण पुढे त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले, त्याने राजवाडा सोडला, राज्य सोडले अरण्यात गेला व तपश्चर्या करू
लागला.
राजाची तपश्चर्या पाहुन परमेश्वर प्रसन्न झाले. त्यांनी राजाला वैजयंतीमाळा, विमान आणि वेळुची एका काठी दिली व सांगितले “राजा परत आपल्या राज्यात जा सुखाने राज्य कर, प्रजेला सुखी ठेव. ही पूजाच मला आवडेल. कर्तव्य मन लावून प्रामाणिकपणे करणे हीच परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा तुझे कर्तव्य कर!” परमेश्वराच्या कृपेने राजा आनंदी झाला. त्यांची आज्ञा मानून तो राज्यात आला.

राजाला प्रसन्न होऊन परमेश्वराने त्याला प्रसाद दिला; त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरिता राजाने त्या वेळुच्या काठीला शृंगारले, तिची पूजा केली ती या गुढीपाडव्याच्या दिवशी. तेव्हापासून ‘गुढीपाडवा’ हा सण प्रचारात आला असे मानले जाते.

कथा – ३ : Gudhipadwa

फार वर्षापुर्वीची गोष्ट. त्यावेळी पैठण ही महाराष्ट्राची राजधानी होती. प्रतिष्ठान असे या नगरीचे नाव होते. तिथे एक राजा होऊन गेला, शालिवाहन असे त्याचे नाव. राजा अतिशय पराक्रमी न्यायी आणि शूर होता. याच काळामध्ये असलेला राजा शक अणि त्याचे सैन्य वेळोवेळी राज्यावर स्वारी करीत होते. जनतेची लुट, अत्याचार हे प्रकार अनेकदा झाले.

शक राजावर शालिवाहनानेस्वारी केली व त्याचा पराभव केला त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले, लोकांना आनंद शालिवाहनाच्या पराक्रमाचा हाच विजयदिन म्हणजेच ‘चैत्र पाडवा दिवस.’

या दिवसापासूनच शालिवाहन शक वर्षाची सुरूवात झाली. दक्षिण भारतात हाच वर्षारंभ मानतात. या दिवशी ब्रम्हदेवाची वेगवगेळ्या पध्दतीने पूजा करतात. नवे पंचांग आणून त्याची पूजा करतात.

असे चरित्राचे श्रवण सेवा करण्यासाठी नक्कीच श्रवण तरंग या चॅनल ला फॉलो करू शकता आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवूण अनुभवू शकता .

     
     

    Leave a Comment

    EMAIL
    Facebook