Moreshwar Ashtvinayak श्री मोरेश्वर –
मोरगाव निजे भूस्वानंद जडभरत भूम्या परतरे । तुरीयास्तीरे परमसुखदेत्व निवससि ।।
मयुराया नाथ स्तवमसिच मयुरेश भगवान। अतस्त्वा संध्याये शिवहरिरणी ब्रह्मजनकम ।।
अर्थ : हे मोरगवच्या मयुरेशा, तू जडभरतमुनिच्या भूमीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, कऱ्हा नदीच्या तीरावरील | स्वतःच्या अत्यंत सुखदायी क्षेत्रात वास करतोस. निर्गुण, प्रणवाकृती, स्वयंभू, योगाच्या तुरिय अवस्थेत राहिल्यामुळे शिवशंकरांना ब्रह्मानंद देणाऱ्या मयुरेश्वरा, मयुर हे आसन असणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. ब्रह्मदेवाने असे तुझे हे देवालय उभारले आहे व त्याच्या रक्षणासाठी (दक्षिणेस) शंकर आणि (उत्तरेस) सूर्य यांना सिद्ध केले.
हा मयुरेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर वरील श्लोक लिहिलेला आढळतो . श्लोकात नमूद केल्याप्रमाणे मयुरेश्वराच्या या मोरगावास भूस्वानंदभुवन असे देखील मानले जाते. जसा विष्णूचा वैकुंठलोक, शंकराचा कैलास, तसा श्रीगणेशाचा स्वानंदलोक अशी ख्याती आहे .
अष्टविनायकात मोरगांव हे प्रमुख प्रथम स्थान मानले जाते. अष्टविनायकाची यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने करावयाची असेल तर ती प्रारंभी व शेवटी देखील मयुरेश्वराच्या दर्शनानेच केली पाहिजे. चला तर मयुरेश्वराला साष्टांग नमस्कार करून अष्टविनायकांची संपूर्ण व सचित्र माहिती मिळवूया.
Gudhipadwa 2024 गुढीपाडवा संपूर्ण माहिती व 3 पौराणिक कथा |
श्रीक्षेत्र मोरगावचे असलेले भौगोलिक स्थान व प्रवासाची माहिती Moreshwar Ashtvinayak:-
पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात, कन्हा नदीच्या काठावर हे भूस्वानंदभुवन म्हणजे मोरगाव क्षेत्र आहे. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे आणि एके काळी येथे खूप मोर होते म्हणून या गावाचे नाव मोरगाव असे प्रचलित झाले. या क्षेत्रास जाण्यास अनेक मार्ग आहेत.
१) पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरून एस.टी. गाड्या सुटतात. २) पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ५६ कि.मी. वर चौफुला फाट्यावरून उजवीकडे नीरामार्गावर मोरगाव क्षेत्र आहे. पुणे-हडपसर लोणी – चौफुला – सुपा – मोरगांव हे अंतर ७९ किमी. आहे. ३) पुणे – हडपसर-सासवड-जेजूरी-मोरगाव हा ६४ कि.मी. चा दुसरा मार्ग आहे. महाराष्ट्राचे आद्यदैवत जेजुरीचा खंडोबा याचे दर्शन घेऊन मग पुढे मोरगांवी जावे.
४) जेजुरी रेल्वे स्टेशनवर उतरून एस.टी. ने मोरगावला जाता येते. जेजूरी ते मोरगाव अंतर १५ कि.मी. आहे.
श्रीमयुरेश्वराच्या स्थापनेसंबंधित प्रचलित असलेल्या कथा (Moreshwar Ashtvinayak):
पूर्वी मिथिल देशामध्ये गंडकी नामक नगरीत महापराक्रमी आणि पुण्यवान असा चक्रपाणी नावाचा राजा होऊन गेला. त्याची पत्नी राणी उग्रा महापतिव्रता स्त्री होती. परंतु संतती नसल्यामुळे राजा-राणी अतिशय दुःखी होते. त्यांनी शौनक ऋषींच्या सांगण्यावरून सूर्योपासना केली. सूर्यदेवाच्या आशिर्वादाने राणी उग्रा गर्भवती झाली. त्या गर्भाचा तेज अत्यंत दाहक होते तो दाह सहन न झाल्यामुळे राणी उग्रेने तो गर्भ समुद्रामध्ये सोडला. राणीच्या या गर्भापासून महातेजस्वी आणि महाबलाढ्य असे एक सुंदर बालक निर्माण झाले. तेव्हा समुद्राने ब्राह्मणरूप धारण केले आणि त्या बालकास राजाकडे आणून पोहचते केले.
राजाने त्या बालकाचे जातककर्मादि संस्कार करून, तो समुद्रामध्ये उत्पन्न झाला म्हणून त्याचे नाव “सिंधू” असे ठेवले. पुढे राजकुमार सिंधू मोठा झाल्यावर त्याने दैत्य गुरू शुक्राचार्यांच्या आदेशानुसार दोन हजार वर्षे सूर्योपासना केली. सूर्यदेव जेंव्हा त्याला प्रसन्न झाला तेंव्हा राजकुमार सिंधूने मात्र मला अमरत्व हवे आहे असा वर मागितला आणि तेव्हा भगवान सूर्यदेव म्हणाले, “मी तुला अमृताचे भोजन देत आहे . हे जो पर्यंत तू आपल्या उदरामध्ये धारण करून ठेवशील , तो पर्यंत तुला मरण येऊ शकणार नाही.” असा वर देऊन सूर्यदेव गुप्त होते झाले.
आपला पुत्र बुद्धीमान असून त्यास सूर्यदेवाने वर दिला, हे पाहून राजा चक्रपाणीने सर्व राज्य सिंधूस दिले व आपण वनवासात गेला. राज्याभिषेक झाल्यावर सिंधूने सैन्य जमवले व तो दिग्विजयास निघाला. सर्वप्रथम त्याने पृथ्वी जिंकली. नंतर इंद्राचा पराभव केला. सिंधूने आपल्या अतुलनीय पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला आपल्या गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. अशाप्रकारे सर्व देवांचा सिंधूराजाने पराभव केला आणि त्यांना आपल्या गंडकी नावाच्या नगरीत कैदखान्यात बंदिस्त केले गेले .
सिंधुराजाने सत्यलोक व कैलासाकडे आपली दृष्टी वळवल्यावर मात्र सर्व देवगण दुःखी झाले. सर्व देवांनी आपला अधिपती गणेश याची प्रार्थना केली. तेव्हा गणेशाने प्रसन्न होऊन सांगितले, “तुम्हाला त्रास देणाऱ्या सिंधु दैत्यांचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी आता लवकरच माता पार्वतीच्या उदरी अवतार धारण करणार आहे.
कृतयुगात मला विनायक म्हणतील. त्रेतायुगात मी मयुरेश्वर नाव धारण करीन. द्वापारयुगामध्ये मला सगळे गजानन या नावाने तर कलियुगामध्ये धुम्रकेतु या नावाने मला ओळखतील .”
सिंधुदैत्याच्या त्रासाने कैलासाचा त्याग केल्यावर शंकर-पार्वतीसह मेरूपर्वतावर गेले. देवी पार्वतीने गजाननाची एकाक्षर मंत्राने १२ वर्षांपर्यंत तपश्चर्या केल्यामुळे गजाननाने प्रसन्न होऊन मी तुझ्या पोटी जन्म घेईन. असा वर दिला.
एकदा भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वती गजाननाची मृत्तिकेची मूर्ती करून तिचे यथाविधि पूजन करत होती, इतक्यात तीच मूर्ती सजीव होऊन पार्वतीपुढे उभी राहिली. नंतर तो फालक तिला म्हणाला, “माते, तू ज्याचे रात्रंदिवस चिंतन करत होतीस तोच मी गजानन. सिंधू . दैत्याच्या वधासाठी मी हा अवतार धारण केला आहे.
* शिवशंकरांनी आपल्या मुलाचे नाव गणेश असे ठेवले. कार्यारंभी त्याचे स्मरण केल्यावर ती निर्विघ्न सिध्दीस जातील, असा शंकरांनी त्या नावाला आशिर्वाद दिला. गणेश दिवसेंदिवस मोठा होत होता. बालवयातच | त्याने अनेक दैत्यांचा संहार केला. विश्वकर्म्याने गणेशास पाश, अंकुश, कमल आणि परशु अशी चार आयुधे दिली आणि त्याला शस्त्रसज्ज केले.
अजून नवनवीन माहिती साठी नक्की पाहा विडिओ
गणेश जेंव्हा दहा वर्षाचा असताना दैत्यांच्या त्रासाला कंटाळून शंकर, गणेश व पार्वतीसह मेरूपर्वत सोडून दुसरीकडे जात असता मध्येच त्यांचा सामना कमलासूर नावाच्या दैत्याशी झाला. कमलासूर घोड्यावर बसून व गणेश मोरावर बसून युध्द करत होते. परंतु गणेशाला कमलासुराला मारण्यात यश येईना कारण त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून नवीन कमलासूर निर्माण व्हायचा. तेव्हा गणेशाने सिध्दी-बुध्दीचे स्मरण केले व त्यांना कमलासूराच्या रक्तापासून उत्पन्न झालेले राक्षस खाऊन टाकण्याची आज्ञा केली.
त्यांनीही सर्व दैत्यांना खाऊन त्यांचा फन्ना उडवला. इतक्यात गजाननाने त्रिशूळ उगारून त्या राक्षसावर फेकला. त्याबरोबर त्या राक्षसाचे दोन तुकडे झाले. नंतर त्याच ठिकाणी विश्वकर्म्याने नगर बसवून गणेशाचे एक देवालय बांधले व त्याचे नाव ठेवले तेच आजचे मोरगाव.
पंधराव्या वर्षी गजाननाने नंदी, वीरभद्र, पुष्पदंत, कार्तिकेय अशा व इतर शिवगणांना घेऊन सिंधुदैत्याच्या गंडकीनगरीवर हल्ला केला. या युध्दात सिंधूराजाचा पराभव झाला, त्याचे दोन्ही पुत्र मारले गेले. सिंधूराजा युध्दभूमील पळून गेला.
सिंधूराजाचा पिता चक्रपाणीने तू देवांना बंदिगृहातून मुक्त कराव गणेशास शरण जा. असा उपदेश केला, पण पुत्रवधाचा सूड घेण्यासाठी सिंधुदैत्याने पुन्हा गणेशावर आक्रमण केले. तेव्हा गणेशाने आपला परशू सिंधुदैत्याच्या नाभीवर नेम धरून सोडला. परशूने नाभीकमलाच छेद करताच, नाभीतील वरदअमृत बाहेर पडले व तो राक्षस रक्त ओकत खाली पडला आणि गतप्राण झाला. मोरावर बसून गणेशाने दैत्याचे पारिपात्य केले म्हणून मयुरेश्वर हे नाव गणेशास प्राप्त झाले.
मोरेश्वर या नावामागे प्रचलित दुसरी कथा (Moreshwar Ashtvinayak):
कश्यप ऋषींच्या दोन बायका होत्या, कद्रु आणि विनिता. कडुच्या मुलांनी म्हणजे सर्पांनी विनितेच्या मुलाला म्हणजे श्येन, संपत्ती व जटायू यांना बंदीत टाकले, पुढे कश्यपांच्या कृपेने विनितेला आणखीन एक मुलगा झाला. परंतु तो एका मोठ्या अंडयाच्या रूपात असतानाच, छोटया गणेशाने ते अंडे फोडले. तेव्हा त्यातून मोर बाहेर पडला. जन्मतःच मयुराचे व गणेशाचे युध्द झाले. अखेर विनितेने मध्यस्ती केली आणि मयुराने गणेशाचे वाहन होण्यास मान्यता दिली.
परंतु देवा तुझ्या नावाआधी माझे नाव उच्चारिले जावे, माझ्या नावाने तू प्रख्यात हो अशी अट मोराने घातली. तेव्हा गणेशाने तथास्तु म्हणून मयुरेश हे नाव धारण केले. पुढे गणेशाने पाताळात जाऊन मोराच्या साहयाने विनितापुत्रांची बंदीतून मुक्तता केली.
श्री मयुरेश्वराचे मंदिर कहा नदीच्या काठी असलेले मोरगावचे मयुरेश्वराचे (Moreshwar Ashtvinayak)मंदिर म्हणजे एक गढीच म्हणायला हवी. उत्तराभिमुख असलेलं हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या भोवती पन्नास फुट उंचीची काळ्या दगडाची तटबंदी असून चार दिशेला चार मिनारासारखे स्तंभ आहेत. त्यामुळे लांबून मंदिर मशिदीसारखे दिसते. गावातून मंदिराकडे निघालं की प्रथम लागते ती दगडी, वेगळ्या बांधणीची एक दीपमाळ. दीपमाळेच्या पुढे नगारखाना आणि नगारखान्यापाशी पुढच्या दोन पायात लाडू घेतलेला उंदीर पाहायला मिळतो. मंदिरच्या पायऱ्या चढून दगडी चौथऱ्यावर पोहोचलो की. तटबंदीला असलेल्या मुख्य दरवाज्यासमोर एक मोठा दगडी कासव नजरेत येते. तसेच महादरवाज्यासमोरचा काळ्या पाषाणाचा गणपतीसमोर तोंड करून बसलेला नंदी हे या देवळाचे वैशिष्ट आहे. गणपतीसमोरील नंदी रेखीव असला तरी काहीसा अर्धवट कोरल्यावर काम तसेच राहिले आहे.
गणपतीसमोर नंदी कसा? या आश्चर्याचे उत्तर एका आख्यायिकेत आहे:-
जवळच्याच एका शिवमंदिरात बसवण्यासाठी हा नंदी गाड्यावरून घेऊन जात होते. परंतु मोरेश्वराच्या देवळासमोर गाडा मोडला आणि नंदीराज मोरेश्वरासमोर जे बसले ते तिथून हालेचना. शेवटी त्या कारागिरीकी एकाच्या स्वप्नात येऊन नंदीने सांगितले, “मला येथेच मोरेश्वरासमोर बसायचे आहे. मला बळेच दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करू नका. मी येणार नाही.” तेव्हा लोकांचा नाईलाज झाला व त्यांनी हया अर्धवट कोरलेल्या नंदीला मोरगावी गणपतीसमोर बसवले.
मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपण तटबंदीच्या आतल्या भागात येतो. आता रंग दिलेले हे देऊळ मुळात मात्र सुरेख आशा काळ्या पाषाणातून घडवलं आहे. बिदरच्या पातशहाकडे असलेल्या गोळे या हिंदू अधिकाऱ्याने हे मंदिर बांधून घेतलं असावं असं म्हणतात. मंदिराच्या आवारात संगमरवरी फरशी आहे. मंदिराच्या सभोवती आठ कोपऱ्यात आठ गजाननांच्या म्हणजे एकदंत, महोदर, गजानन, लंफ्रोदर, विकट, विघ्नहर, धुम्रवर्ण । • आणि वक्रतुंडाच्या मूर्ती आहेत, त्याशिवाय ३४ परिवार मूर्तीही आहेत. तसेच या मंदिराच्या आवारात गणेशाचे आवडीचे शमी व मंदाराचे वृक्ष आहेत. पश्चिमेला तरटीचे झाड आहे, यालाच कल्पवृक्ष म्हणतात. या झाडाखाली बसून अनुष्ठान केल्यास इच्छित फलप्राप्ती होते अशी भक्तांची श्रध्दा आहे. मंदिराच्या
बाजूच्या पडवीत श्रीमदयोगींद्राचार्यांचा पुतळा आहे.
मोरेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी डाव्या बाजूलाच असलेल्या नग्नभैरवाचे दर्शन घेऊन त्यांना गूळ व नारळाचा नैवेद्य दाखवून मगच मुख्य मंदिरात प्रवेश करावा. देवळाच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन लांबूनच मोरेश्वराचे दर्शन घेता येते. इथे पुजाऱ्यााखेरीज अन्य कोणालाही स्वहस्ते श्रींची पूजा करता येत नाही.
मयुरेश्वराची मूर्ती ठेवण (Moreshwar Ashtvinayak) :
गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मूर्ती बैठी डाव्या सोंडेची व पूर्वाभिमुख आहे. ह्या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात आणि बेंबीत हिरे चमकत असतात. डोक्यावर नागराजाचा फणा आणि बाजूला सिध्दी – बुध्दीच्या पितळी मूर्ती आहेत. मूर्तीच्या पुढे मूषक व मयूर आहेत. पूजा केलेली दुर्वा फुले वाहिलेली मयुरेश्वराची मूर्ती प्रसन्न दिसते. ह्या मोरेश्वरावर अभिषेक केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. देवस्थानच्या कार्यालयात अभिषेकासाठी देणगी दिल्यावर, देवस्थान अभिषेक करून, प्रसाद व अंगारा पाठवून देते. सर्व देवस्थानांमध्ये ही सोय आहे
मयुरेश्वराची मूळ मूर्ती जरा लहान आकाराचीच आहे मात्र तिच्यावर शेंदराचे अनेक असे लेपावर लेप चढवल्याने ती आकाराने मोठी दिसते. केव्हातरी शे सव्वाशे वर्षांनी हे शेंदराचे कवच निखळून पडते व आतील मूळची रेखीव मूर्ती दिसते. मोरगावच्या मोरेश्वराचे कवच अशाप्रकारे सन १७८८ व सन १८२२ मध्ये पडल्याची माहिती समजते. या मूर्तीसंबंधी एक आख्यायिका आहे:- सध्या जी मूर्ती आहे ती मूळ मूर्ती नव्हे. मूळ मूर्ती मृत्तिका, लोह व रत्न यांच्या अणूपासून बनवली असून ती सध्याच्या मूर्तीच्या मागे अदृश्य आहे. तिची स्थापना ब्रम्हदेवाने केली होती. सिंधुरासुराने तिचा विध्वंस केल्यावर ब्रह्मदेवाने दोन वेळा तिची प्राणप्रतिष्ठापना केली. पुढे काही काळानंतर पांडव तीर्थयात्रेनिमित्त येथे आले असता मूळ मूर्तीला
कोणी धक्का लावू नये म्हणून त्यांनी त्या मूर्तीला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त केले. मंदिरातील दररोजचे कार्यक्रम व उत्सव श्री मयुरेश्वराची नित्य त्रिकाळ पूजा होते. पहाटे पाच वाजता प्रक्षाळपूजा होते. ही पूजा गुरवपुजारी करतो. नंतर सकाळी सात वाजता व दुपारी बारा वाजता षोडषोपचारे पूजा असते. ह्या पूजा ब्राम्हण पुजारी करतात. यावेळी गणपती अथर्वशिर्षाची आवर्तने म्हणण्यात येतात. त्रिकालपूजेत नैवेद्य असतो. सकाळच्या पूजेच्या वेळी खिचडी व पोळी, दुपारच्या पूजेच्यावेळी संपूर्ण जेवण आणि रात्रीच्या पूजेच्यावेळी दूध-भात हे पदार्थ असतात. रात्री आठ वाजता पंचोपचार पूजा होते. पहाटे पाच ते रात्रौ १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. नंतर शेजारती होऊन मंदिर बंद होते. येथे भाद्रपद शुध्द चतुर्थी आणि माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. याशिवाय विजयादशमी व सोमवती अमावस्या हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. विजयादशमीला रात्री ११.०० वा. मोरेश्वराची (Moreshwar Ashtvinayak )पालखी निघते. पालखीचा सोहळा मोठा पाहण्यासारखा असतो. गावातच फटाके बनवतात व मोठ्या प्रमाणावर फोडतात. ठराविक स्थानी फिरून पालखी पहाटे दक्षिणेकडील सोमेश्वराच्या मंदिरात येते. त्यावेळी क्षेत्रातील सर्व पुरूषांची नावे परंपरागत मानाप्रमाणे वाचली जातात. त्यानंतर पालखी मंदिरात येते. तेथे धुपारती झाल्यावर कार्यक्रम संपतो. माघ शुध्द पंचमीला अन्नसंतर्पण होते. अन्नसंतर्पण म्हणजे प्रत्येक घरातील थोडा, थोडा नैवेद्य गोळा करतात व मग तो भाविकांमध्ये वाटतात. या यात्रांना सुमारे १० ते १५ हजार लोक येतात.
मोरगावचे थोर व दिव्य सत्पुरुष (Moreshwar Ashtvinayak):
१) श्री मदयोगींद्राचार्य शालिवाहन शके १४९९ मध्ये मोरगावात प्रगट झाले व शके १७२७ मध्ये त्यांनी समाधी घेतली. त्यांनी २२८ वर्षांचे भक्तिभावपूर्ण जीवन गणेशयोगाच्या साधनेत घालवले. त्यांना
ब्राम्हणाच्या रूपात स्वतः मयुरेश्वरांनी मुदगल पुराणाचा एकएक असे नऊ खंड आणून दिले आणि त्यावर त्यांनी भाष्य लिहिले. यात गणपतीच्या योगस्वरूपाचे महात्म्य आणि योगगीता आहे.
२) कऱ्हा नदीच्या दक्षिण तीरावर असलेले श्रीगणेश योगिंद्राचार्याचे समाधी मंदिर प्रेक्षणीय आहे. त्याच मंदिरात श्रीमद अंकुशधारी महाराज व श्रीमद हेरंब महाराजांच्या समाध्या आहेत. या तीनही समाध्यांचे उत्सव, पुण्यतिथी वगैरे श्रध्दापूर्वक करतात. हया सांप्रदायाचा श्रीयोगिंद्रमठ मोरगावात देवळाजवळच आहे.
३) प्रसिध्द साधू मोरया गोसावी यांचे मोरगाव हे जन्मस्थान आहे. येथील ब्रम्हकमंडलु तीर्थात त्यांना एक गणेशमूर्ती सापडली. त्यांनी चिंचवड येथे सुंदर मंदिर बांधून तेथे मूर्तीची स्थापना केली. मोरया गोसावींची पालखी भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थीस चिंचवडहून मोरगावास येते. मोरया गोसावींनी चिंचवड येथे इ.स. १६५५ मध्ये त्यांनी समाधी घेतली.
४ ) सुखकर्ता, दुःखहर्ता वार्ताविघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
समर्थ रामदास स्वामींना मोरेश्वराचे दर्शन घेताना मंगलमूर्तीची वरील आरती स्फुरली. ही आरती आरती संग्रहात अजरामर झाली आहे. Moreshwar Ashtvinayakमयुरेश्वराच्या डाव्या बाजूला विघ्नेश्वराची ओवरी आहे. या ओवरीत सतराव्या शतकाच्या अखेरीस गणेश योगिंद हे थोर गणेशभक्त राहत. त्यांनी तेथे बारा वर्षे गणेश उपासना केली. त्यांनी संस्कृत गणेशपुराणावर टीका लिहिली आहे. त्यांनी शके १७२७ च्या माघ वद्य दशमीला मोरगाव येथे समाधी घेतली.
मोरगाव येथील इतर धार्मिक स्थळे :-
मोरगाव कऱ्हा नदीच्या काठावर वसले आहे. या कन्हानदीच्या उत्पत्तीबद्दल एक आख्यायिका आहे : एकदा ब्रम्हदेवाकडून श्रीसरस्वतीचा विनयभंग झाला. त्या पातकाने तो अस्वस्थ झाला. चित्तशुध्दीसाठी जगातल्या सर्व तीर्थयात्रा त्याने विधिपूर्वक केल्या व सर्व तीर्थांतील उदक आपल्या कमंडलूत भरून आणले. तरीही त्याच्या चित्ताला शांतता लाभली नाही. तेव्हा तो मोरगावाला आला व त्याने श्रीमयुरेश्वराचे पूजन करून त्याच्यावर अभिषेक केला. श्रींना प्रदक्षिणा घालत असताना सर्व तीर्थांनी भरलेला कमंडलू ब्रम्हदेवाचा पाय लागून लवंडला. ब्रम्हदेवाला दुःख झाले. तो ते तीर्थ कमंडलूत भरू लागला. तेव्हा श्रीगणेशाने त्याला सांगितले ब्रम्हदेवा हा कमंडलू भरू नको. सर्व जगातील तीर्थ एकत्र होऊन जगातल्या पापक्षालनासाठी श्री ब्रम्हकमंडलू कहगंगा या नावाने नदीरूपाने येथे वाहू दे. यातले एक पळीभर तीर्थ तू घे आणि पावन हो.” अशाप्रकारे कऱ्हागंगा मोरगावात अवतीर्ण झाली होती अशी कथा आहे . कऱ्हा नदीच्या पाच मैलांचे प्रवाहात श्रीगणेशतीर्थ, भीमतीर्थ, कपिलतीर्थ, व्यासतीर्थ, ऋषीतीर्थ, सर्वपुण्यतीर्थ आणि श्रीगणेशगया तीर्थ अशी सात तीर्थे आहेत.
जडभरत :-कन्हागंगेच्या उत्तरेला एका मैलावर श्रीजडभरताचे स्थान आहे. पूर्वी त्या ठिकाणी त्याचा मोठा आश्रम होता. आता त्याचे स्मारक म्हणून फक्त एक शिळा आहे. त्या शिळेवर महादेवाची पाच लिंगे आहेत. क्षेत्रांतर्गत यात्राविधानात श्रीजडभरत शिळेचे दर्शन हे देखील महत्वाचे मानले जाते .
नग्नभैरव :-मोरगावच्या पूर्वेला एका मैलावर देवागराचे सीमेवर नग्नभैरवाचे मुख्य स्थान आहे. त्याचे दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नसते असे मानतात . तेथे
गुळ समर्पण करून नारळ फोडावा लागतो, मोरगाव क्षेत्राचा तो क्षेत्रपाळ
असून तो गणेशभक्तांचे पालन करतो व त्यांचे धनधान्यादि वाढवतो. हया
ठिकाणी जाणे शक्य नसल्यास देवळाच्याजवळ गाभान्यावाहे र श्रीनग्नभैरवाचे
जे छोटे देऊळ आहे तेथे हे विधी पूर्ण करता येतात.
2 thoughts on “Moreshwar Ashtvinayak मोरगावचा श्री मोरेश्वर का म्हणतात 1 ला अष्टविनायक गणपती व त्यामागच्या 2 कथा”