Ozar Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक अष्टविनायक संपूर्ण माहिती व 2 कथा जाणून घ्या

Ozar Vighneshwar                             | ओझर चा विघ्नेश्वर विनायक

ओझर भक्तानुग्रह गजमुखो विघ्नेश्वरो ब्रह्मपः ।

नाना मूर्तीधरोऽ पि नैजमहिमाऽ खंडः सदात्मा प्रभु ।।

स्वेच्छाविघ्नहर सदासुखकर सिद्धः कलौ स्वेपुयः ।

क्षेत्रे चोझरके नमो स्तु सततं तस्मै परंब्रह्मणे ।।६।।

Ozar cha Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक

अर्थ – जो मुक्त हस्ते कृपा उधळतो, ज्याचे मुख गजासारखे आहे, जो विघ्ने नष्ट करतो (ज्याने विघ्नासुराला हरवले) जो साक्षात मोक्षरूप ब्रह्म आहे, जो सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे, जो नेहमी भक्तांना सुखाचे दान करतो, जो कलाप्रवीण आहे, जो ओझर क्षेत्री वास करतो अशा या परमेश्वरापाशी माझे चित्त सतत लागो.
कुकडेश्वरहून निघालेल्या कुकडी नदीचं भाग्य थोर आहे. तिथून पंधराएक किलोमीटर अंतरावर तिच्याच काठी ओझरच्या विघ्नेश्वराचं  (Ozar Vighneshwar) मंदिर उभं आहे. गिरिजात्मज कुकडीच्या काठापासून काही अंतरावरच्या डोंगरावर असला तरी विघ्नेश्वर मंदिराला मात्र तिच्या पाण्याचा स्पर्श होतो. अष्टविनायकापैकी सोन्याचे शिखर व कळस असलेले हे एकमेव रमणीय स्थान.

श्री क्षेत्र ओझरचे (Ozar Vighneshwar) भौगोलिक स्थान व मार्ग :

पुणे जिल्हयात, जुन्नर तालुक्यात नारायणगावपासून ८ कि.मी. अंतरावर ओझर गाव आहे. (पुण्यापासून एकूण अंतर ८५ कि.मी.) १) कुकडी नदीवर पुल झाल्यामुळे गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.
२) मुंबई- ठाणे – कल्याण – बापसई – सरळगाव ओतूरमार्गे लेण्याद्रि १७९ कि.मी. व ओझर १८२ कि.मी. आहे.
जुन्नरला जाण्यास पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून एस.टी. गाड्या सुटतात. सकाळच्या बसने जुन्नरला जावे आणि प्रथम ओझरला जाऊन विघ्नेश्वराचे दर्शन घ्यावे. संध्याकाळी शिवनेरी किल्ला पहावा. दुसऱ्या दिवशी गिरिजात्मज लेण्याद्रिच्या दर्शनास जावे.

Ozar cha Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक

विघ्नेश्वराची कथा :-

फार प्राचीन काळी हेमवती नगरात अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला इंद्रपद मिळवण्याची इच्छा झाली. ती बातमी इंद्राला समजताच, अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी त्याने काळाचे स्मरण केले. अक्राळविक्राळ असा काळपुरूष तत्क्षणी प्रकट होऊन त्याने राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला. त्या काळपुरूषाला विघ्नासूर असे नाव लाभले.
त्या विघ्नासुराने राजाचाच यज्ञ नष्ट केला असे नाही तर पृथ्वीतलावरील सर्वच वैदिक कर्मांचा नाश केला. धर्माचा लोप झाला. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली. त्यावेळी गजानन पराशर ऋषींच्या आश्रमात होते. त्यांनी प्रसन्न होऊन विघ्नासुराचे पारिपत्य करण्याचे वचन दिले.

Ozar cha Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक
गजाननानी पार्श्वपुत्र व त्यांची पत्नी दिपवत्सला यांचेकडे जन्म घेतला. त्यानंतर पार्श्वपुत्राच्या ह्या पुत्राशी विघ्नासुराचे तुंबळ युद्ध झाले. गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुर शरण गेला व त्याने अभय मागितले. गजाननाने त्याला अभय दिले पण एक अट घातली, “विघ्नासुरा यापुढे जिथे माझे भजन, कीर्तन, पूजन चालू असेल तेथे तू जायचे नाहीस.” विघ्नासुराने ते मान्य केले व गजाननाजवळ एक वर मागितला, “देवा, तुमच्या नावाआधी माझे नाव उच्चरिले जावे म्हणून विघ्नहर किंवा विघ्नेश्वर नाव आपण धारण करावे. गजाननाने तथास्तु म्हटले. विघ्नासुराला आपल्या गणसमुदायात स्थान दिले आणि स्वतः विघ्नेश्वर या नावाने ही घटना घडली तिथे म्हणजे ओझर येथे वास्तव्य केले. गणपतीने असेही वरदान दिले, “विघ्नेश्वर ह्या नावाने ते कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.
विघ्नासुराच्या पराभवामुळे देवांना आनंद झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्हकाळी देवांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझर येथे घडली आणि हाच तो ओझरचा श्रीविघ्नेश्वर विनायक.(Ozar cha Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक)

Ozar cha Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक
श्री विघ्नेश्वराचे मंदिर व मूर्ती :-

श्री विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या चारही बाजूंना संरक्षणार्थ दगडी तट आहे. तटावरून चालण्यास पायवाट आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या देवळाच्या तटबंदीवरून लेण्याद्रि दिसतो आणि किल्ले शिवनेरीही नजरेत येतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दगडात खोदलेले भालदार – आहेत. महाद्वारातून आत जाताच दोन्ही अंगांना ओक्या लागतात. ओक्यांच्या दगडी कमानी ओक्यांच्या भव्यतेची कल्पना देतात. जुन्या धाटणीच्या मंदिराप्रमोण या मंदिराच्या दर्शनी भागावर दोन ऋषी कोरलेले आहेत. मंदिराचे आवार फरसबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दगडी दीपमाळा आहेत. उत्सवदिनी या दीपमाळा प्रज्वलित करतात.

देवालयाचा सभामंडप २० फूटांचा आहे. याच्या दक्षिणेला व उत्तरेला दरवाजे आहेत. या मंडपात धुडीराजाची मूर्ती आहे. पुढे आणखी एक दहा फूटी मंडप आहे. या मंडपाच्या प्रवेशद्वाराशी संगमरवरी पाषाणाचा एक उंदीर पळण्याच्या तयारीत आहे. देवळाच्या भिंती रंगीत व आकर्षक चित्रांनी सजवलेल्या आहेत.

यानंतर देवाचा गाभारा लागतो. गाभाऱ्यात चारही बाजूंना पंचायतनांच्या मूर्ती आहेत. मंदिरातील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. श्रीविघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, पूर्णकृती व आसनमांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा बसवलेला आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस ऋद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. देवाची मूर्ती डौलदार महिरपी कमानीत आहे.

Ozar cha Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक

देवालयाच्या कळसावर कोरीव कलाकुसर केली असून शिखर व कळस सोनेरी आहे. असे म्हणतात की बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगिजांना हरवून वसई जिंकल्यावर ह्या मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि सुवर्ण कळस कासवला. मंदिराच्या जिर्णोद्धारासबंधी एक कथा ऐकायला मिळते. वसईच्या मोहिमेवर जाताना चिमाजी अप्पा ओझरला आले होते. विघ्नेश्वराच्या मंदिरात शिरताना दाराची उंची कमी असल्यामुळे दाराला अडकून त्यांच्या डोक्यावरचा टोप खाली पडला. त्यांच्या मनात पाल चुकचुकली. “वसई मोहिमेत विजय मिळाला तर तुझे नवीन मंदिर बांधेन ” असा त्यांनी नवस केला. आणि मोहिमेतल्या विजयानंतर दिल्या शब्दाप्रमाणे विघ्नेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला.
हे देऊळ इ.स. १७८५ मध्ये बांधलेले असावे. मंदिराचा जिर्णोद्धार १९६७ साली महान गणेशभक्त स्वानंदवासी अप्पा शास्त्री जोशी यांनी समस्त गावकरी व अनेक गणेशभक्तांच्या मदतीने केला. नवीन सुधारणा करून अलीकडे हे मंदिर अधिक आकर्षक केले आहे.

श्रीविघ्नेश्वराचा उत्सव :-

भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थी हे दोन प्रमुख उत्सव येथे साजरे होतात. याशिवाय त्रिपुरीपौर्णिमेपासून (कार्तिक पौर्णिमा) चार दिवस मोठा उत्सव असतो. तेव्हा पटांगणातील दोन्ही दीपमाळा दिव्यांनी उजळून निघतात. येथे म्हटल्या जाणाऱ्या आरत्यात चिंचवडच्या मोरया गोसावींच्या आरत्यांना विशेष महत्व दिले जाते.
अन्य उपयुक्त माहिती :-
१) मंदिराचा कारभार ट्रस्टमार्फत चालतो. राहण्याची, धार्मिक विधींची व्यवस्था ट्रस्टमार्फत केली जाते. पूजा, अभिषेक, सहस्त्रावर्तन इत्यादीसाठी देणगीची निश्चित रक्कम ठरलेली आहे. मंदिराच्या जवळच कुकडी नदीच्या काठावर देवस्थानने एक कोटी रूपयांचं यात्री – निवास बांधले आहे.

Ramnavami Puja Vidhi 2024 | रामनवमीला घरीच करा रामललाची पूजा : अडीच तास चालणार अभिजीत मुहूर्त, जाणून घ्या राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांकडून रामनवमी संपूर्ण पूजा विधी

Ramnavami Facts श्रीरामांची मोठी बहीण ते लक्ष्मणाचा मृत्यू तुम्हाला माहीत नसलेले रामायणातील 9 तथ्य

Moreshwar Ashtvinayak मोरगावचा श्री मोरेश्वर का म्हणतात 1 ला अष्टविनायक गणपती व त्यामागच्या 2 कथा

Holi Festival होळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आणि 1 कथा |

Chaitra Amavasya 2024 चैत्र महिन्यातील अमावस्या कधी असते? तारीख जाणून घ्या

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

Leave a Comment

EMAIL
Facebook