संक्रांतीचा उत्सव संपूर्ण माहिती |सांस्कृतिक माहिती :
संक्रांतीचा उत्सव संपूर्ण माहिती संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणुन तर या उत्सवाला ‘मकरसंक्रांत’ असे म्हणण्यात येते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणुन त्या काळाला ‘उत्तरायण’ ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्यादेखील महत्व आहे.