Travel Ashtvinayak 2024 |श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक जाणून घ्या इतिहास मूर्ती व मंदिर ची संपूर्ण माहिती

  Travel Ashtvinayak :              श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 

वैदे : संस्तुतवैभवो गजमुखो भक्ताभिमानीति यो ।

बल्लाळारव्य सुभक्तपाल नरतः ख्यातः सदा तिष्ठती //

क्षेत्रे पल्लिपुरे यथा कृतयुगे चास्मिस्तथा लौकिके ।

भक्तैर्भावितमूर्तीमान गणपती सिद्धीश्वर तं भजे ॥७॥

( Travel Ashtvinayak ) श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 
अर्थ :- वेदांमध्ये ज्याची स्तुती गायलेली आहे. ज्याचे मुख गजासारखे आहे, जो भक्ताच्या नावाने (बल्लाळेश्वर) म्हणून प्रसिध्दी पावलेला आहे, जो आपल्या भक्तांच्या पालनामध्ये मग्न आहे. या कृतयुगामध्ये पल्लिपूर म्हणजे पालीमध्ये जो वास करतो ज्याची मूर्ती भक्तांना आवडणारी आहे अशा सिद्धीश्वर गणेशाला मी पूजितो । पूजिते ।

एका बाजूला इतिहास प्रसिद्ध सरसगड उभा आहे तर दुसऱ्या बाजूला अंबा नदी वाहत आहे आणि त्या दोघांच्या सान्निध्यात एक गाव वसला आहे पाली आणि त्या गावच्या बल्लाळ नावाच्या गणेशभक्त बालकाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन त्या फ्रालकाने पुजलेल्या शिळेत कायम वास्तव्य करून राहिलाय तो पालीचा बल्लाळेश्वर. हा एकमेव असा अष्टविनायक आहे जो भक्ताच्या नावाने प्रसिद्धी पावलेला आहे आणि उपरण, अंगरखासारखी वस्त्रे नेसलेला आहे .भक्त बल्लाळाला विनायकाने ब्राह्मणाच्या वेषात दर्शन दिल्यामुळे इथली विनायक मूर्ती वस्त्रे नेसलेली आहे. ( Travel Ashtvinayak ) श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक

( Travel Ashtvinayak ) श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 
हे स्थान अत्यंत प्रसिद्ध व फार जागृत आहे. असं म्हणतात की पेशवेकाळात या देवस्थानाला कौल लावून न्यायनिवाडे होत.
सिंधुदेशेऽतिविख्याता पल्लीनामाऽभुवत्पुरी असा उल्लेख आलेला आहे. यातील पल्ली म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर विनायक.

श्री क्षेत्र बल्लाळेश्वराचे भौगोलिक स्थान व मार्ग :-

श्री बल्लाळेश्वर हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात नागोठणे गावाजवळील पाली या गावी आहे.
१) मुंबईहून पनवेल-खोपोलीमार्गे पाली १२४ कि.मी. अंतरावर आहे किंवा मुंबईहून पनवेल-पेण-वडखळ, नागोठणे-वाकणमार्गे पाली १२० कि.मी. अंतरावर आहे.
२) पुण्याहून लोणावळा – खोपोलीमार्गे पाली हे अंतर १११ कि.मी. आहे.
३) मुंबई पासून पाली पर्यन्त तसेच पुणे ते पाली अशी थेट एस.टी. बसची सोय आहे.
४) मुंबई ते कर्जत रेल्वेने यावे. कर्जत ते पाली बसची सोय आहे. ५) खोपोली, पनवेल, कर्जत येथून एस.टी. बसेसची सोय आहे.

श्रीबल्लाळेश्वराच्या स्थापनेसंबंधी प्रचलित कथा :-

फार प्राचीन काळी म्हणजेच कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या म्हणजे पाली गावात कल्याणशेठ नावाचा एक व्यापारी होता. त्याची पत्नी इंदूमती तर मुलगा बल्लाळ बल्लाळ लहानपणीच गणेशभक्त होऊन त्याने शेजारच्या मुलांनाही भक्तिमार्गाला लावले. बल्लाळाच्या संगतीमुळे आमची मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याणशेठ कडे जाऊन बल्लाळानेच आमच्या मुलांना बिघडवले. अशी तक्रार करू लागले.

( Travel Ashtvinayak ) श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 

आधीच कल्याण शेठजींना बल्लाळ अध्ययन, व्यापार उदिमात लक्ष न घालता भक्तिमार्गाला लागला आहे याची चीड होती. त्यात लोकांच्या तक्रारीने त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. क्रोधाने बेभान झालेले कल्याणशेठ तरातरा ज्या रानात बल्लाळ सवंगड्यासह जात असे तिथे गेले आणि त्यांनी तेथे जाऊन त्याची पूजा मोडली, गणेशाची मूर्ती फेकून दिली आणि ध्यानस्थ बल्लाळाला आपल्या सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला. तरीसुद्धा कल्याणशेठना त्याची दया आली नाही. त्यांनी बल्लाळाला तशही अवस्थेत एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले व उपहासाने म्हणाले, “येऊ देत तुझ्या गणेशाला आता तुला सोडवायला. तुझा नी माझा संबंध कायमचा तुटला.”

थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे सारे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. बल्लाळाचा धावा ऐकून विनायक ब्राह्मण स्वरूपात प्रगट झाला. त्याने बल्लाळाला बंधमुक्त केले. केवळ कृपादृष्टीने बल्लाळाचे शरीर पूर्ववत झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, “ तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. तू यापुढे माझ्या भक्तीचा प्रवर्तक म्हणून , श्रेष्ठ आचार्य तसेच दीर्घायुषी असा होशील. आता तुला हवा तो वर तू मागू शकतो .

तेव्हा बल्लाळ असे म्हणाला की , “मला असे वाटते की तू कायम याच ठिकाणी वास्तव्य करावेस आणि सर्व भक्तांच्या इच्छा तू पूर्ण कराव्यास. ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.
बल्लाळाची विनंती मान्य करून श्रीगणेश हे एका शिळेमध्ये अंतर्धान पावले.आणि ती शिळा म्हणजेच आजचा पालीचा नसवाला पावणारा बल्लाळेश्वर. आणि त्या कल्याण शेटजींनी जो गणपती भिरकावून दिलेला होता तो म्हणजेच बल्लाळेश्वराच्या मंदिराजवळच दुसऱ्या मंदिरात असलेला श्रीधुंडीविनायक असा आजही आहे .

( Travel Ashtvinayak ) श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 

श्रीबल्लाळेश्वराच्या स्थापनेसंबंधी प्रचलित दुसरी कथा :-

स्वस्ति श्री गणनायक या श्लोकात बल्लाळं मुरूडं असा उल्लेख आहे. त्यावरून मूळ देऊळ समुद्र तीरावर असलेल्या पल्ली नावाच्या गावात असावे असे दिसते. त्यालाच हल्ली मुरूड म्हणतात. हा मुरूड गाव जंजिरा संस्थानच्या हद्दीत आहे. तेथे सांप्रत बल्लाळ विनायकाच्या देवळाचा चौथरा दाखवतात. असे सांगतात की, मुसलमान लोक जेव्हा मुरूडच्या देवळात शिरू लागले तेव्हा हा बल्लाळ विनायक एका वैश्यांच्या तांड्यातील बैलाच्या पाठीवरील धान्याच्या गोणीत बसून पालीत गेला. ज्या बैलाच्या गोणीतून तो गेला तो बैल चालताना वारंवार वाटेत बसे. म्हणून लमाण्याने गोण तपासून पाहिला तर त्या गोणीत त्याला एक पाषाण सापडला. तो त्याने गोणीतून बाहेर फेकून दिला, तर तो पुनः गोणीत येऊन बसे. अखेर तो पाषाण पाली गावात कायमचा स्थिरावला आणि त्या बैलाच्या पाठीवरची गोणी सोन्याची झाली. अशी एक आख्यायिका आहे

श्रीबल्लाळेश्वराचे मंदिर व मूर्ती :

मूळच्या लाकडी असलेल्या देवालयाचा जीर्णोद्धार केला गेला आणि फडणीसांनी सध्याचे पाषाणी देवालय इ.स. १७६० च्या सुमारास तयार केले. देवालयाचा सभोवार फरसबंद असून देवालयाजवळ दोन तलाव खोदलेले आहेत. त्यातील उजवीकडील तळ्याचे पाणी श्रींच्या पूजा अर्चेसाठी राखून ठेवले
आहे.
मंदिर कारी धाटणीचे असून पूर्वाभिमुख आहे. दक्षिण प्राचीन अचूक साधल्याने दक्षिणायनात सूर्योदयी सूर्य-किरण नेमके श्री बल्लाळेश्वरावरच
पडतात.

( Travel Ashtvinayak ) श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 
देवालयात दोन गाभारे असून आंतर्गाभारा विस्तृत आहे. आंतर्गाभारा सहा बर्हिकोनी व पुढील गाभारा दोन आंतरकोनी मिळून अष्टदिशा साधल्या आहेत. आंतरगाभाऱ्याचे वरचे बाजूस अष्टदिशा साधीत अष्टकोनी कमळ असून घुमटाचा आकार घेतला आहे. मंदिराच्या आतील अंतर्गाभारा १५ फूट उंच आहे तर बाहेरील उंदीराचा गाभारा हा पूर्ण १२ फूट उंच आहे. उंदिर आपल्या दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहात आहे.
देवालयाच्या दगडी भिंती जाड असून भिंतीच्या चिंयामध्ये शिसे ओतून भिंती अतिशय मजबूत केल्या आहेत.

गाभाऱ्याच्या समोर सुशोभित अशी दगडी मखर आणि गोंड्याची झालर खोदलेली आढळते . देवालयाचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. शिखराचे काम चुना विटांचे असून शिखरात एक खोली तयार केली आहे. पुढील भागी एक गच्ची आहे.

चुना ज्या घाणीच्या चाकाने मळला आहे ते चाक आजही देवालयासंनिध पाहावयास मिळते.
सभामंडप हा एकूण ४० फूट लांब आणि रुंदीला २० फूट असून त्याचे काम पालीतील एक सामान्य परीस्थितीतील गणेशभक्त कै. कृष्णाजी रिगे यांनी श्री बल्लाळेश्वराच्या दृष्टान्ताने प्रेरित होऊन इ.स. १९१० च्या सुमारास रू. १८,०००/- खर्च करून केले.
आतील गाभाऱ्यात दगडी सिंहासनावर ३ फूट उंचीची श्रीबल्लाळेश्वराची पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची लुकणाची मूर्ती आहे.

मूर्तीच्या डोळ्यात बेंबीत चकचकीत हिरे असून मागील प्रभावळ चांदीची आहे. प्रभावळीवर ऋद्धी-सिद्धी चक्या हलवीत उभ्या आहेत. फक्त पूजेसाठी सकाळी ५ ते ११ ।। पर्यंत आंतर्गाभारा खुला असतो. बाहेरील उंदराच्या गाभाऱ्यातून रात्रौ १० । पर्यंत दर्शन घेता येते. मंदिराच्या आवारात एक प्रचंड घंटा असून ती पंच धातूंची आणि मूळची युरोपात ओतलेली आहे. वसई साष्ठी येथील फिरंग्याचा पाडाव करून चिमाजी अप्पांनी तेथील मोठमोठ्या घंटा आणल्या. त्यातली एक घंटा त्यांनी बल्लाळेश्वराला अर्पण केली.

आजही आरतीच्यावेळी त्याचा सुरेख आवाज येतो.
मंदिराच्या पाठीमागे श्रीधुंडीविनायकाचे मंदिर आहे. श्रीबल्लाळेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख आहे व श्रीधुंडीविनायकाची मूर्ती सहसा न आढळणारी अशी पश्चिमाभिमुख आहे. ही श्रीधुंडीविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे.

( Travel Ashtvinayak ) श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 

नित्य कार्यक्रम व उत्सव :-

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मोठे उत्सव येथे साजरे होतात. भाद्रपद चतुर्थीला रात्री महानैवद्य, पंचमीला दहीकाला व अन्नसंतर्पण असते. पाचही दिवस कथाकिर्तनाचा कार्यक्रम असतो. माघी उत्सवाची यात्रा फार मोठी असते. सुमारे १५ ते २० हजार लोक यात्रेला येतात.
माघी उत्सवात शुद्ध पंचमीला लळीत करण्याची फार जुनी प्रथा आहे. तृतियेला देवाची पालखी निघते.पालखीत नारळ व मूर्ती • ठेवतात.

पालखी पाली गावात घरोघरी जाते. लोक देवाची पूजा करतात. पालखीत नारळ व पैसे ठेवतात. पहाटे काकडआरती, मग
महापूजा व संध्याकाळी धुपारती व रात्री किर्तन असा कार्यक्रम असतो.
माघी चुतर्थीला श्रीगजानन मध्यरात्री येथे भोजनास येतात अशी श्रद्धा असल्याने त्यावेळी भाविकांची फार गर्दी होते. विजयादशमीला पालखी निघते.

पाली परिसरातील काही रम्य स्थळे :-

१) पालीपासून ४ कि.मी. अंतरावर असलेला भूगर्भातून भूपृष्ठावर असा वाहणारा गंधयुक्त गरम पाण्याचा झरा उन्हेरी गावी जाऊन नक्की पाहून शकता .

२) भोर संस्थानिकांची कुलदेवताश्रीभोराईदेवी येथून १५ कि.मी.अंतरावर सुधागड किल्ल्यावर असून देवीची स्थापना भृगू ऋषींनी केली आहे. १९४७ सालापर्यंत या गडावर १० दिवस मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव होत असेतो . देवीचे स्थान जागृत आहे असे मानले जाते .

३) गोमाशी येथील एका डोंगरात भृगू ऋषींचे स्थान असून जवळच ठाणाळे येथे कोरीव लेणी आहे.

४) देवालयातून दिसणारा २ कि.मी. अंतरावर, शिवाजी महाराजांचे काळातील ” सरसगड ” हा टेहाळणीचा किल्ला आहे.

५) राम दंडकारण्यात असताना, प्रत्यक्ष देवीने ज्या ठिकाणी वर दिला ते ” वरदायिनी ” हे अत्यंत निसर्गरम्य व जागृत स्थान पालीपासून ९ कि.मी. वर एका डोंगरावर आहे. सध्याचा पाली गावास होणारा
पाणी पुरवठा येथूनच केला जातो.

६) रावणाने जटायुशी युद्ध करून त्याचे पंख जेथे कापले आणि श्रीरामाने जटायूचा उद्धार जेथे केला ते ” उद्धर ” स्थान पाली येथून १४ कि.मी. अंतरावर आहे. तेथून वर गेल्यावर रामेश्वर येथे श्रीशंकराचे प्रसिद्ध असे स्वयंभू स्थान आढळते . येथे अस्थी कुंडात अस्थी पाण्यात विरघळतात.

७) ३५० वर्षापूर्वीचे पाषाणी स्वयंभू श्रीशंकराचे स्थान सिद्धेश्वर पालीपासून ३ कि.मी. अंतरावर आहे.

( Travel Ashtvinayak ) श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 

यात्रेकरूंसाठी अन्य उपयुक्त माहिती :-

१) यात्रेकरूंना पहाटे ५ ते ११ ।। पर्यंत सोवळ्याने देवाची पूजा स्वहस्ते करता येते. संपूर्ण मंदिर रात्री साडेदहाला बदं होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजल्याशिवाय उघडले जात नाही.

 

२) मंदिरात प्रतिदिनी सनई वाजवणे, धुपारती, नैमित्तिक गायन, कीर्तन, चतुर्थ्यांना पालखी, नित्य पूजा, नैवेद्य, कार्तिकात काकड आरती इ. कार्यक्रम होतात.

३) संस्थेतर्फे श्रीबल्लाळेश्वराचा रंगीत फोटो व संस्थेची पुस्तिका नाममात्र किंमतीने विकली जाते.

४) भक्तांना राहण्यासाठी संस्थानाने अद्यावत सोयींनीयुक्त अशी धर्मशाळा बांधली आहे.

५) देवाचे सोन्या-चांदीचे अलंकार आहेत. मुकुट, कर्ण, सेज हे रोज वापरण्यात येतात व चतुर्थीला पुतळींचा हार, कंठा वगैरे अलंकार
घातले जातात.

६) पाली कोकण प्रांतात येत असल्यामुळे इथे हिरवाई भरपूर आहे. नारळी, केळीची झाडे भरपूर आहेत. प्रत्येक दुकानात पोह्याचे, नाचणीचे पापड, करवंदाचा जॅम वगैरे घरगुती पदार्थ विक्रीस दिसतात.

पालीस जाऊन हिरवे व्हा आणि बल्लाळेश्वराचा आशीर्वाद घ्या. श्रीबल्लाळेश्वर (श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक ) नवसाला पावतोच पावतो असा अनेकांचा अनुभव आहे.

Ashtvinayak Lenyadri ganapti | अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती संपूर्ण माहिती

Gudhipadwa 2024 गुढीपाडवा संपूर्ण माहिती व 3 पौराणिक कथा |

krushnjanmbhumi history मंदिराचा इतिहास: तोडफोड आणि पुनरुज्जीवन

Holi Festival होळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आणि 1 कथा |

https://www.youtube.com/watch?v=R3NxAR60jlo&t=576s

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

Leave a Comment

EMAIL
Facebook