vehicle puja vidhi आपल्या अनेकांच्या आयुष्यात नवीन वाहन खरेदी अत्यंत आनंदाचा दिवस असतो आणि विविध लोक वेगवेगळ्या मार्गाने तो साजरा करतात परंतु नवीन वाहन घरी आणल्यावर आपण सर्वात आधी त्याची पूजा करतो तर आपण विधिवत पूजा कशी करावी हे अनेकाना माहिती नसते तर आज आपण या लेखातून याविषयी माहिती जाणून घेऊ नवीन वाहन खरेदी केल्यानंतर, किंवा जुनी गाडी ची पुजा आणी गाडीचा ऊतारा कसा करावा त्याची परीपुर्ण माहिती :
♦️ वाहन पूजा कशी करावी (vehicle puja vidhi) :
आपल्या प्राचीन परंपरेनुसार तसेच नवीन किंवा जुने वाहन खरेदी केल्यावर त्या वाहनाची पूजा सर्वप्रथम अवश्य केली जाते. मान्यतेनुसार वाहन आपल्या भाग्याशी थेट जोडलेले असते. वाहन खरेदी केल्यानंतर अनेक लोकांचे नशीब उजळते.अनेकांना त्यांच्या व्यापारात लाभ होऊ लागतो. एखाद्या व्यक्तीसाठी गाडी शुभ नसल्यास धनहानी होऊ शकते नवीन वाहनाची व्यवस्थित पूजा केल्यास अशुभ प्रभावापासून दूर राहणे शक्य होते . चला तर मग पाहुया पूजेची कृती :
♦️ गाडीची पूजा (vehicle puja vidhi) करण्याच्या १० सोप्या स्टेप्स :
१ } पूजेसाठी आपल्याला लागणारी आवश्यक सामग्री– नारळ, कापूर, फुलांचा हार, फुल, पाण्याचा कलश, गूळ किंवा मिठाई, कलावा { लाल धागा } कुंकू, तूप, दिवा, दुर्वा, आंब्याची पाने.
२ } एखाद्या शुभ दिवशी किंवा मुहूर्तावर वाहन खरेदी करून घरी घेऊन यावे वाहन खरेदीसाठी शुभ दिवस कोणता हे तुम्ही गुगल वर देखील सर्च करून शोधू शकता आणि त्या वाहनाची पूजा करावी. पूजा करताना सर्वात आधी तुम्हाला एका कलशामध्ये पाणी भरून दुर्वा च्या किंवा आंब्याच्या पानांनी वाहनावर तीन वेळेस पाणी शिंपडुन घ्यावे . यामुळे वाहनाची योग्य प्रकारे शुद्धी होते आणि वाईट दृष्टी चा प्रभाव नष्ट होतो.
जाणून घ्या कथा महाशिवरात्रीची | महाशिवरात्रीची सेवा कोणती व कशी करावी ?
३ } त्यानंतर कुंकू घेऊन कुंकुवामध्ये तूप मिसळून वाहनावर स्वस्तिक काढावे. आपल्या धर्मात स्वस्तिक चे चिन्ह अत्यंत शुभ आणि प्रथम फलदायक मानले असून हे ऊर्जेचे प्रतीक आहे त्यामुळे शुभ प्रभावाने प्रवासात येणारी नकारात्मकता नष्ट होते. पुढे अडचणी येत नाहीत .
४ } वाहनाला फुल अर्पण करून फुलांचा हार नक्की घालावा.
५ } गाडीवर कलावा म्हणजे लाल रंगाचा दोरा बांधावा. किंवा केशारी बांधणे याला रक्षासूत्र म्हणतात. हा दोरा वाहनाचे रक्षण करतो.
६ } कर्पूर आणि दिवा लावून गाडीची आवर्जून आरती करावी.
७ } आरती केल्यानंतर कलशाने गाडीच्या दोन्ही बाजूला ( त्याच्या चाकांवर टाकले तरी चालेल ) पाणी टाकावे.
८ } मिठाईच्या नैवेद्य दाखवून गायीला ही मिठाई खाऊ घालावी.
९ } एक नारळ घेऊन गाडीवरून सात वेळेस उतरवून घ्यावे. उतारा करतांना (ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम:मंत्र बोलणे) त्यानंतर गाडीच्या चाकाखाली ठेवून फोडावे.
वाहनाच्या सर्व महत्वपूर्ण कागदपत्रांची तपासणी करा, जसे की रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स, आणि सर्व सेव्हिस रेकॉर्ड्स.
नवीन वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे एकत्र ठेवा आणि सुरक्षित ठिकाणी संग्रहित करा.
सुरक्षितता नियमांचे पालन:
वाहनाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करा.
वाहनाच्या नियमित देखभालीसाठी एक वेळापत्रक तयार करा.
सामाजिक कार्य:
आपल्या प्रियजनांसोबत किंवा समाजातल्या गरीब आणि गरजू लोकांसोबत एक छोटासा कार्यक्रम आयोजित करा.
पूजेनंतर आपली खुशी आणि आशीर्वाद इतरांमध्ये वाटा, हे एक शुभ विचार मानले जाते.
ध्यान आणि प्रार्थना:
वाहनाच्या वापराच्या दरम्यान, नियमितपणे वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि यशस्वी वापरासाठी प्रार्थना करा.
वाहन चालवताना शांत आणि मनःस्वास्थ्य राखण्यासाठी ध्यान किंवा साधना करा.
वाहनाचे सेवेची नोंद:
वाहनाच्या सर्व सेव्हिस वेळापत्रकांची नोंद ठेवा आणि नियमितपणे सेवा मिळवा.
इंधन, तेल, टायर इत्यादींच्या नियमित तपासणीसाठी एक नोटबुक तयार करा.
आनंद साजरा करा:
नवीन वाहन खरेदी आणि पूजा समाप्त झाल्यावर, परिवार आणि मित्रांसोबत एक आनंददायक संध्याकाळ किंवा विशेष भोजन आयोजित करा.
हा आनंद आणि उत्साह आपल्या जीवनात एक सकारात्मक ऊर्जा आणतो.
या सर्व टिप्स आणि उपायांचा पालन करून, आपल्या नवीन वाहनाचे सुखद वापर सुनिश्चित करू शकता आणि त्याच्या दीर्घकालीन उपयोगासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू शकता.
तर अशा प्रकारे साध्या आणि सरल पदहतीने तुम्ही तुमच्या आवडत्या नवीन वाहनाची पूजा (vehicle puja vidhi) नक्की करू शकता आणि योग्य रीतीने पूजा केल्याचे मानसिक समाधान मिळवू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा लेख आम्हाला नक्की सांगा .